Skip to main content

एक काथ्याकुट कसा असावा?

लेखक मराठमोळा यांनी मंगळवार, 17/07/2012 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, काथ्याकुट - म्हणजे काथ्या कुटणे - काथ्या म्हणजे काय? हे किती जणांना माहित आहे? असो... तर काथ्याकुटात तुम्हाला नक्की काय अपेक्षित आहे हे जाणण्यासाठी हा धागा (कदाचित वांझोटा) काथ्याकुटाचा: पहिला मुद्दा : विषय कसा असावा? तर माझ्या मते हा एखादा ईमेलप्रमाणे असावा..( आलेल्या ईमेलप्रमाणे एका वाक्यातच तो उघडावा की नाही हे सांगणारा) दुसरा मुद्दा: आषय: आषय हा नेहमी विषयाला अनुसरुन असावा. यात प्रेषकाने स्वतःचे विचार नीट आणि मुद्देसूद मांडावेत. यात अधिक आणि उणे दोन्ही बाजू नीट प्रेषकाने मांडावेत. तिसरा मुद्दा: वरील विषयावर प्रेषकाने स्वतःचे विचार मांडावेत.

यशाची सप्तपदी लिहिणारे लेखक स्टिफन कोवे यांचे दुखःद निधन.

लेखक कलंत्री यांनी मंगळवार, 17/07/2012 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. स्टिफन कोवे या प्रसिद्ध लेखकाचे आज वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाल्याचे वृत्त वाचले. स्टिफन कोवे यांचे "The 7 habit of effective people" नावाचे जगविख्यात असे पुस्तक आहे. आजपर्यंत २ कोटी इतक्या प्रतींची विक्री या पुस्तकाची झालेली आहे. जगातील ३७ भाषांमध्ये याचे भाषांतर झालेले आहे.व्यक्तिगत परिणामकारकता गाठण्यासाठी या पुस्तकाने अनेकांना मदत केलेली आहे. या पुस्तकातील यशस्वी होण्याची सप्तपदी खालील प्रमाणे. व्यक्तिगत विजयाच्या ३ पायर्‍या. सवय क्र. १ : भविष्याकाळासाठी सक्रिय व्हा. ( Be proactive). सवय क्र. २ : आपण जे काय करणार आहोत त्याचा शेवट कसा असेल याचा अदमास घ्या.

हुस्ना.

लेखक इरसाल यांनी मंगळवार, 17/07/2012 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
४/५ दिवसांपुर्वी असच चॅनल बदलता बदलता एमटीव्ही वर गेलो असताना काही ओळी कानावर पडल्या आणी एक गायक वैविध्यपुर्ण हातवारे करत गाताना दिसला, त्या १०-१२ सेकंदाच्या अवधीत जे काही कानावर पडले त्याने मनमोहुन्,एक प्रकारे उद्विग्न करुन गेले. अधिक खोदकाम केले असता असे कळले की हा कोक स्टुडिओचा कार्यक्रम असुन गाणारी व्यक्ती ही पियुश मिश्रा आहे आणी ह्यानींच ह्या गाण्याची रचना व पुनर्लेखन केले आहे. वस्तुतः हे गाणे जावेद नावाच्या माणसाने फाळणीच्या वेळेस स्वतःच्या हुस्ना ह्या प्रेयसीच्या विरहापोटी लिहीले ज्यामधे त्याची तिला पुन्हा न भेटता येण्यामुळेची लाचारी व होणारे अगतिकतेचे दु:ख ह्याचा मिलाफ दिसुन येतो

सुवर्णक्षण

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 17/07/2012 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
मागल्या शनिवारी अर्थात ७ जुलैला आमचे नित्याचेच उद्योग चालू होते. त्यातच ऐन दुपारी मोबाइलने मान टाकली आणि तो दुरुस्तीला द्यावा लागला. रात्री मोबाइल ताब्यात घेतला आणि घराकडे कूच केली. साधारण रात्री १०.३० च्या सुमाराला मिस कॉल अ‍ॅलर्ट मिळाला की 'हे नराधमा तुला एकूण ३१ मिस कॉल येऊन गेलेले आहेत.' येवढी कोणा कोणाला बॉ माझी आस लागली आहे, असा विचार करून एकेका मिस कॉलला डायल करायला सुरुवात केली. पहिला फोन लावला तो आमचे मित्र कीर्तिकुमार ह्यांना मुंबईला. 'काय रे फोन करत होतास का ? माझा डब्बा दुरुस्तीला दिला होता, आत्ता चालू केला आहे.' "प्रसाद, अरे किती फोन लावायचे तुला?

मुक्तके

लेखक भरत कुलकर्णी यांनी मंगळवार, 17/07/2012 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी पहाटे पहाटे रात्र पेंगुळली शेवटी सुर्य उगवला अन मग ती झोपी गेली दुर कोठेतरी रानातला वारा कानात बोलला अरे बघ तरी किती छान पाऊस पडला नदी म्हटली बाळांनो वाळूसाठी खड्डे खणू नका हो न जाणो कधीतरी तुम्हीच त्यात पडाल

रुबाबदार हरिश्चंद्रगड…

लेखक सुहास झेले यांनी मंगळवार, 17/07/2012 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
१७ जुलै हा दिवस माझ्यासाठी एकदम खास. आज विविध मराठी संस्थळावर लिहिणारा, मुक्त वावरणारा मी मुळात एक ब्लॉगर होतो, आहे आणि राहीन. ब्लॉग सुरु केल्यावर साधारण ८ महिन्यांनी पहिला मराठी ब्लॉगर मेळावा दादर, मुंबई येथे पार पडला. विविध ब्लॉगच्या नावा मागे दडलेले चेहरे सर्वप्रथम एकमेकांसमोर आले आणि आयुष्यात असंख्य जिवाभावाची माणसे जोडल्याचे समाधान मनोमन मिळाले. ह्याच वेळी मराठी ब्लॉगर्स आणि ट्रेकर्स असलेले, आम्ही काही तरुण मंडळी एकत्र आलो.

संजीवक

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 17/07/2012 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
खुळी दालने प्राजक्तासम उलटुन गेली पाने फुलली राने; गूढ नभातिल झरले आषाढाने आभाळातिल गोत उतरले; धुके दंवात नव्याने भुलले अंकुर; पक्षी किलबिल आरव एक रवाने मुके तेवढे सरलेले पळ संजीवकसे मेणे अश्वासक संवाद कळ्यांचे स्नेह भारले गाणे .....................अज्ञात
काव्यरस

दोन बहिणी

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 17/07/2012 09:07 या दिवशी प्रकाशित केले.
दोन बहिणी शाळेत ह्या दोन्ही बहिणी सगळ्यानाच प्रीय! दोघींच्या स्वभावात केवढे अंतर होते! मोठी शांत, सुविचारी, सुशील. लहानी धसमुसळी, तडकफडक, बाणेदार मोठी कलाप्रवीण. संगीत, लेखन, हस्तकला, चित्रकला. शिक्षकांचा आदर करणारी. कधी उलटून बोलणार नाही. सगळ्याना मदत करायला तत्पर. तेवत्या मन्द ज्योतीसारखा तिचा सहवास, सुगन्धी पारिजातकासारखी तिची संगत. लहान बहीण नेहमी घोड्यावर स्वार! येणार आणि झंझावाताप्रमाणे जाणार. आपल्या पाउलखुणा सर्वत्र सोडून. तिला कोणी विसरूच शकत नाही! तिचे धाडशी विचार ऐकले की समोरचा भारावूनच जाणार!

शांताराम - ग्रेगरी डेव्हीड रॉबर्ट्स

लेखक शुचि यांनी मंगळवार, 17/07/2012 03:36 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या "ग्रेगरी डेव्हीड रॉबर्ट्स" या लेखकाचे "शांताराम" हे आत्मचरीत्रात्मक पुस्तक वाचते आहे, अर्धे झाले आहे. पहीली काही प्रकरणे, भारतातील अनुभवांबद्दल एखादी पाश्चात्य व्यक्ती इतके सकारात्मक लिहू शकते हे वाचून, आश्चर्यमिश्रीत आनंदाचा धक्का बसला. हातातून पुस्तक खाली ठेववेना. विशेषतः पुस्तकातील मराठी संवाद आणि मराठी पात्रांनी भुरळ घातली. लेखकाची नीरीक्षणशक्ती देखील अफाट, खरच अफाट आहे हे जाणवले. पण पुढे पुढे लेखकाची जीवनशैली, चरस, हशीश घेणे आदि सवयी बघता, मुंबईचे अतिरेकी कौतुक, लोकांची स्तुती सर्व अतिरंजित वाटू लागले. खरं तर पुस्तक काही काळ दूरच ठेवले.