Skip to main content

द विनर टेक्स इट ऑल........

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 09/08/2012 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
द विनर टेक्स इट ऑल........ काही गाणी जगावेगळीच असतात. त्यातलं नक्की काय आवडतं ते नक्की सांगता येत नाही. पण ती आतमधे कुठेतरी थेट भिडतात . हे गाणं ही त्यातलच एक . ७० आणि ८० च्या दशकात स्वीडीश ग्रुप " ABBA " खूप गाजत होता त्यांची गाणी मेलडी आणि हार्मनी यांचे एक मजेदार मिश्रण असायची. Björn Ulvaeus आणि Benny Andersson यानी लिहीलेले Agnetha Fältskog ही गायलेले. खरतंर ही एका विभक्त होत असलेल्या जोडप्याची कहाणी. गाणे जेंव्हा लिहीले गेले तेंव्हा Björn Ulvaeus आणि Agnetha Fältskog हे दोघेही याच अवस्थेतुन जात होते.

ऑलंपीक - अविस्मरणीय क्षण.

लेखक मोदक यांनी गुरुवार, 09/08/2012 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
ऑलंपीक - अविस्मरणीय क्षण. "ऑलंपीक" हा शब्द जरी उच्चारला किंवा कानावर आला की खालच्या घटना डोळ्यासमोरून स्लाईड शो प्रमाणे झरझर सरकू लागतात, काळ वेळ ठिकाण सर्व विसरून!! १) डेरेक रेडमंड - १९९२ बार्सिलोना ऑलंपीक. ४०० मीटर धावण्याची सेमी फायनल सुरू झाली.. पूर्ण भरात असलेल्या डेरेक रेडमंड ने भन्नाट सुरूवात केली.. अर्धे अंतर पार केले न केले तोच त्याच्या मांडीचा स्नायू दुखावला. होणार्‍या वेदनांमुळे रेडमंड ट्रॅकवरच कोसळला. बाकीचे स्पर्धक पुढे निघून गेलेच होते. ऑलंपीकचे स्वप्न भंगल्याचे दु:ख इतके तीव्रपणे जाणवले की रेडमंड हमसून हमसून रडू लागला.

आचार्य बाळकृष्ण आणि इतर थोर राष्ट्रपुरुष आता एकाच रांगेत..!

लेखक कॉमन मॅन यांनी गुरुवार, 09/08/2012 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
देशाबाहेरील काळा पैसा, भ्रष्टाचार या विषयांकरता बाबा रामदेवांचे आजपासून दिल्लीच्या रामलीला मैदानावर आंदोलन सुरू झाले आहे.. मैदानात ठिकठिकाणी त्या संदर्भातील फलक लागले आहेत. त्यातील एका फलकावर भगवान श्रीकृष्ण, सीतामाई, म.

केळ्यांचे वेफर/माहीती

लेखक इरसाल यांनी बुधवार, 08/08/2012 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
मसु. ही पाकृ माझी नाही. सध्या केरळात पडिक असल्याने रोजचा भर मसाला डोसा, वडा सांबार, इडली चटनी, टिपीकल केरळा राइस (जाडा सफेद), मासे यांवर अधिक आहे. मी रहातो तिथे रस्त्यापलिकडे सुपर बेकरी आहे.मी त्याच्याकडुनच केळ्याचे वेफर किंवा तिखट शेंगदाणे घेत असतो.

Munich Massacre...

लेखक मोदक यांनी बुधवार, 08/08/2012 03:01 या दिवशी प्रकाशित केले.
3

आनंद सागर - शेगाव लई भारी...

लेखक सौरभ उप्स यांनी बुधवार, 08/08/2012 00:46 या दिवशी प्रकाशित केले.
नागपूरला काही कामासाठी जायचे ठरले घरच्यांचे, १ दिवसाचं काम होत फक्त पण त्यासाठी २-३ दिवस तरी सुट्टी घ्यावी लागणार होती जाताना मधेच शेगाव लागणार होत, खूप वर्षांनी सगळ्या घरच्यांचं एकमत झाल कि २ दिवस जास्त सुट्टी घेऊन शेगाव दर्शन करायचच यावेळी... प्लान ठरला आणि बुकिंगही आरामात झाल अगदी.... मंदिराच्या आवारात ५ इमारती आहेत भक्त निवासासाठी पण तो दिवस रविवार असल्याने बुकिंगही फुल आणि गर्दीही खूप... खूप चौकशी केल्यावर कळाल कि तिकडे आनंद विहार म्हणून अजून एक भक्त निवास स्थान आहे भक्तांसाठी खास, मंदिराच्या बाजूला असलेल्या निवासस्थानापेक्षा हे खूपच सही आहे.. उत्तम स्वच्छता आणि मनापासून करणारे काम(सेवा)

विलासराव देशमूख

लेखक कलंत्री यांनी मंगळवार, 07/08/2012 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भारतातील ज्येष्ठ राजकारणी विलासराव देशमूख यांची प्रकृती गंभीर आहे असे वाचण्यात आले. मला राजकारण्याबद्दल आणि चित्रपटक्षेत्रातील अभिनेते आणि कलाकारांबद्दल विलक्षण आत्मियता आहे हे अगोदरच नमूद करतो. विलासरावांचे मूंबई दंगलीबद्दल नेमकेच मूख्यमंत्रीपद गेले होते आणि त्याकाळातच त्यांचा पूण्यात एक सार्वजनिक समारंभात भाषण ऐकण्याचा योग आला होता. विलासरावांच्या चेहर्‍यावर विलक्षण असा ताण दिसत होता. मूख्यमंत्रीपदासारखे पद गमावल्यानंतर विलासराव बरेच कृद्ध अथवा निराश झालेले असतील आणि त्यांचा त्रागा भाषणात दिसेल असा कयास मला वाटत होता.

झूरिक मध्ये काकस्पर्श

लेखक भडकमकर मास्तर यांनी मंगळवार, 07/08/2012 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
काकस्पर्श या मराठी सिनेमाचा एक खेळ झूरिकच्या राईटबर्ग म्युझिअममध्ये ( तेच सध्या मुखपृष्ठावर असलेले) झाला. यासाठी उपस्थित राहण्याची संधी मला लाभली.या प्रसंगी सिनेमातील प्रमुख अभिनेते सचिन खेडेकर, मेधा मांजरेकर आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर उपस्थित होते.हा चित्रपट बर्लिन फिल्म फेस्टिवलसाठी सिलेक्ट झालेला असून पुढल्या आठवड्यात बर्लिनला दाखवला जाणार आहे. चित्रपटानंतर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम झाला.

अनोखे रक्षाबंधन

लेखक आनंद भातखंडे यांनी सोमवार, 06/08/2012 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
अनोखे रक्षाबंधन दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी माझ्या मुलीच्या विद्यानिकेतन शाळेत पालक सभेच्या निमिताने जाण्याचा योग येतो. एका चांगल्या आणि नावाजलेल्या शाळेत माझ्या मुलीला प्रवेश मिळाला आणि तिची शैक्षणिक प्रगती सुरु झाली. या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेचे सगळे सोपस्कार पूर्ण करून ज्यांना प्रवेश मिळतो त्यांचे पालक कृतकृत्य होतात आणि ज्यांना मिळत नाही ते नेहेमी प्रमाणे त्यांच्या कार्यप्रणालीला नावे ठेवतात. विद्यानिकेतन शाळा तशी डोंबिवलीच्या गजबजाटापासून लांबच.