Skip to main content

अवचित

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 14/08/2012 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
झुलले मार्दव झरल्या अगणित; झुळझुळल्या पागोळ्या एकांती निश्वासांचे झाले अवचित स्वर गोळा ओठात कुणी पोटात कुणी हृदयात सजविल्या कुणी गंधमय रांगोळ्या अपघातच हे सुखस्वप्नांचे गतकाळाची ही शाळा रे कुणी बांधले झोके विसरुन वास्तवातले धोके,.. वडवानळ झाली पाणी जाळित अंतरातली ज्वाळा पुंकरले बावरले आठवल्या निखार्‍यातल्या वेळा पावलांत घुटमळले भिजलेले मन कातर वय सोळा ..........................अज्ञात
काव्यरस

गृहमंत्री माझा लाडका

लेखक चेतन माने यांनी मंगळवार, 14/08/2012 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
गृहमंत्री माझा लाडका हल्लीच मुंबईत झालेल्या हिंसाचारच्या पार्श्वभूमीवर (भलतीच जागा आठवली!) काही उल्लेखनीय गोष्टींचा इथे उल्लेख करावा वाटतो. वारंवार "कडक कारवाई " मुळे टिकेच लक्ष ठरलेल्या गृहमंत्र्यांनी यावेळेस मात्र हा शब्द वापरणे टाळले त्यामुळे थोड्याफार टीका कमी झाल्यात. दुसरी उल्लेखनीय कामगिरी हि पोलिसांनी बजावली. संयम हा पोलिसांचा उगाचच जनतेने नाकारलेला गुण दिसून आला. पण संयम पाळल्यामुळे बऱ्याच पोलिसांना मार खावा लागला.

बेसुमार -

लेखक विदेश यांनी मंगळवार, 14/08/2012 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
. उद्या आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन ! रोज आपण मारे बेंबीच्या देठापासून ओरडत आहोत.. भ्रष्टाचार - - बेसुमार महागाई -- बेसुमार भाववाढ - - बेसुमार वाहने -- बेसुमार लोकसंख्या - - बेसुमार अनाधिकृत बांधकामे -- बेसुमार घुसखोर -- -बेसुमार रोगी, व्यसनी, कुपोषित -- बेसुमार रस्त्यात खड्डे .. ! ! ! आता आपल्या देशाला स्वतंत्र होऊन इतकी वर्षे लोटली .. "बेसुमार" म्हणून ओरडणारे.. मतदानाच्यावेळीच आपला "अबाधित मतदानाचा हक्क" विसरून - घरातच का बरे गप्प बसून रहातात - ? बेसुमारीला बराचसा आळा घालणे, आपल्या बोटाच्या शाईवर अवलंबून आहे - असे मला तरी वाटते . तुम्हाला ? ? ? .

रंगीत पेन्सिल्स - केळफुलावरील सूर्यपक्षी (सनबर्ड ओव्हर बनाना ब्लॉसम) आणि कॉमन किंगफिशर

लेखक वर्षा यांनी सोमवार, 13/08/2012 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
केळफुलावरील सूर्यपक्षी (Sunbird over banana blossom) "बर्ड्ज - अ व्हिजुअल गाईड" मधून 7" x 10", माध्यमः ग्रॅफाईट पेन्सिल, कलरलेस ब्लेंडर, कॅम्लिन प्रीमीयम, प्रिझमाकलर आणि Staedtler watercolor pencils (पाणी न वापरता :)) कॉमन किंगफिशर "बर्ड्ज - अ व्हिजुअल गाईड" मधून माध्यमः Prismacolor आणि कॅम्लीन प्रिमीयम रंगीत प

एट बिलो - एक सुंदर अनुभव

लेखक सांजसंध्या यांनी रविवार, 12/08/2012 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
गद्यातलं हे माझं पहिलं (आणि आवडलं नाही तर एकमेव ) लिखाण आहे. साधारण वर्षभरापूर्वी नॅशनल वर मदर इंडिया चालू होता. कदाचित १५ ऑगस्ट असावा. बघायचा होता. पण सतत फोन, घरातली कामं यात तो सलग पाहता आलाच नाही. बाहेरून येईपर्यंत सिनेमा संपला होता. असंच सर्फिंग करतांना झी स्टुडिओ या चॅनेलवर एट बिलो हा सिनेमा चालू होता. मी पुढे जाणार इतक्यात बाबांनी मला थांबायची खूण करत हा सगळं काम सोडून हा सिनेमा पहा अशी आज्ञा केली... सुरूवात चुकली होती. ती बाबांकडून कळाली. अंटार्क्टिकामधे मोहीमेसाठी एक अमेरिकन पथक गेलेलं असतं. स्टेशनपासून लांब बर्फात फिरतांना नायक बर्फाच्या घळईत अडकतो.

चावडीवरच्या गप्पा - असुरक्षित भारत

लेखक सोत्रि यांनी शनिवार, 11/08/2012 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
“आता भारत अजिबात सुरक्षित राहिलेला नाही, पुण्यात बॉम्बस्फोट... चक्क पुण्यात!”, चिंतोपंत, उत्तर भारत सहलीमुळे बर्‍याच दिवसांनी कट्ट्यावर हजेरी लावत. “काय म्हणता!