Skip to main content

अति सर्वत्र वर्ज्ययेत....

लेखक Pearl यांनी मंगळवार, 04/09/2012 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
( अति सर्वत्र वर्ज्ययेत.... याबद्दल जे काही विस्कळीत विचार मनात आले. ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चू.भू. द्या. घ्या.) आपल्या संस्कृत भाषेत फार छान छान कोट्स आणि सुंदर अर्थपूर्ण अशी सुभाषिते आहेत. त्यातलं 'अति सर्वत्र वर्ज्ययेत' हे वाक्य पण फार छान आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट अति करू नये. अति राग, अति लोभ, अति काटकसर, अति द्वेष, अति चिंता ..... अशी कोणतीच गोष्ट अति करू नये. एवढचं काय तर अति प्रेम(आंधळं प्रेम), अति काळजीही करू नये. अति चिंता: चिंतेबद्दल तर काय सांगावं. असं म्हणतातच ना की चिता मनुष्याला मेल्यानंतर जाळते, तर चिंता जिवंतपणी जाळते.

आर्बीटेज

लेखक सदानंद ठाकूर यांनी सोमवार, 03/09/2012 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
आर्बीटेज आर्बीटेजर म्हणजे अशा व्यक्ती ज्या अशा प्रकारच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये पोसिशन घेतात कि ज्यामुळे कोणतीही जोखीम न स्विकारता फायदा मिळवता येतो. जेव्हा बाजारात अनियमीतता असते अशा वेळी हे एका मार्केटमधून खरेदी करतात व दुस-या मार्केटमध्ये त्याचवेळी विक्री करतात. म्हणून आर्बीटेजर बाजारातील अशा संधीची नेहमीच वाट पहात असतात. फ्युचर्समध्ये (वायदे बाजारात) कमी किंमतीत स्टॉक/शेअर्स किंवा इंडेक्स विकत घेऊन भविष्यातील जास्त किमतीला विकून तुम्ही आर्बीटेज संधीचा फायदा उठवू शकता. यासाठी इंडेक्सची स्पॉट प्राइज व फ्युचर प्राईजमध्ये व्याजापेक्षा जास्त फरक असताना हा फायदा मिळवता येतो.

गोडाची कमळफुले.

लेखक ज्योति प्रकाश यांनी सोमवार, 03/09/2012 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
हि कमळफुले लहान मोठे सगळ्यांनाच आवडतात्.बाहेरचे खाणे आणण्यापेक्षा घरगुती खाणे केव्हाही चांगले.

जन्मकुंडलीत नोकरी, करीअरचे स्थान कोणते? सहावे की दहावे?

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 03/09/2012 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
(१) जन्मकुंडलीत नोकरी, करीअरचे स्थान कोणते? सहावे की दहावे? (२) तसेच, सहावे स्थान शतृ, रोग दर्शवते. त्यानुसार जर सहाव्या स्थानात सिंह राशी असून त्याचा मालक रवी बाराव्या स्थानात कुंभ राशीत बुधासोबत असेल तर त्याचे फळ काय मिळेल? (३) आणि दहाव्या स्थानात धनू राशी असून त्याचा मालक गुरू हा तिसर्‍या स्थानात चंद्राबरोबर वृषभ राशीत असेत तर त्याचे फळ काय?

माझेच मी....

लेखक डॉ अशोक कुलकर्णी यांनी सोमवार, 03/09/2012 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
माझेच मी..... * कुणी भेटता, ठाव माझेच मी विचारतो शहरात या, नाव माझेच मी विचारतो * असा दूर आलो, कळेना कुठे पोहोचलो प्रवासात या, गाव माझेच मी विचारतो * काढले विकाया माझेच सर्वस्व मी दुकानात या, भाव माझेच मी विचारतो * तो बैसला समोरी, हार माझी नक्कीच आहे शत्रूस माझ्या, डाव माझेच मी विचारतो * जायबंदी शरपंजरी, शेवटी युद्धात मी किती जाहले, घाव माझेच मी विचारतो * -अशोक

एक डोक्यातला किडा

लेखक अस्वस्थामा यांनी सोमवार, 03/09/2012 02:31 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा काही काही कर्तृत्ववान लोकांच्या गोष्टी ऐकतो तेव्हा कधी कधी थोडी बोलीवुडी गोष्ट होते असं वाटत रहातं. हुमायून भारत सोडून पळून गेला तरी पण भली मोठी फौज घेउन परत येतो आणि दिल्ली काबीज करतो.. आणि शिवाजी राजे सगळे आयुष्य अस्तित्त्वाची लढाई करत बसतात. परागंदा राजे, नेते परत येवून मिरवतात, परत नेते बनतात आणि लोकं पण त्यांना दारात उभे करतात (उदा. नवाज शरीफ यांचा पाकिस्तानात परत प्रवेश ) नव्हे त्यांना पूर्वीचे स्थान पण देऊ करतात..