Skip to main content

“ पुणे ते पानिपत ” भाग २ : सिंदखेड राजा - बऱ्हाणपूर - शाही किल्ला

लेखक सारथी यांनी बुधवार, 24/10/2012 05:05 या दिवशी प्रकाशित केले.
“पुणे ते पानिपत” भाग १-शनिवारवाडा–अहमदनगर–घृष्णेश्वर: http://www.misalpav.com/node/22952 तिसरा दिवस : ०५ जानेवारी २०१२ सिंदखेड राजा – मलकापूर मार्गे बुलढाणा – मुक्ताईनगर आज देखील सकाळी ६ वाजता उठलो, आज चक्क अंघोळ केली. सर्व काही आवरून ७ वाजता गुरुद्वारा मध्ये जाऊन आलो. आज गाडीमध्ये सामान चढवण्यासाठी ५ जण गेलो. २०० जणांचे सामान चढवताना अक्षरशः घाम निघतो. लोक पण अगदी मुंबई-न्यूयॉर्क प्रवास करत असल्यासारखे सामान घेऊन आले होते. अर्थात सर्वजण नाही पण बरेचजण. नाश्ता म्हणून फोडणीचा भात होता, एकदम मस्त झाला होता.

इतकच!

लेखक जेनी... यांनी बुधवार, 24/10/2012 02:47 या दिवशी प्रकाशित केले.
भावनांच्या आधारे केलेले वार सगळेच रिकामे नव्हते, जखमा भरुन यायला वेळ लागला इतकच ! 'हळव्या' शब्दालाहि हसण्यामागे अर्थहिन बनवलं, हसरि म्हणुन मिरवलं इतकच! मनात का कोण जाणे, बरच दडलं होतं ,लाव्हाच थोडक्यात, कधीतरी आसवानी मदत केली इतकच! नातं काहिच नव्हतं, तरिहि आपल्यात बरच काहि, मी बहुतेक जपलं इतकच!
काव्यरस

बंदी आणि संशोधन

लेखक मंदार कात्रे यांनी मंगळवार, 23/10/2012 20:37 या दिवशी प्रकाशित केले.
cannabis for peace या संस्थेचे एक पत्रक नुकतेच वाचनात आले. त्यात cannabis च्या औषधी गुणधर्मा बाबत सखोल आणि शास्त्रशुद्ध माहिती दिली होती. मग उत्सुकता चाळवली म्हणून युट्युब वर cannabis सर्च केले ,तर एकापेक्षा एक नामवंत डॉक्टर cannabis च्या औषधी गुणधर्माची भलामण करताना दिसले. जगभरात अनेक देशात cannabis वर बंदी आहे. भारतात "भांग "नावाचा प्रकार उत्तर भारतात सर्रास सर्वत्र उपलब्ध असतो, त्याला कायद्याने परवानगी आहे,म्हणजे दारू दुकानांचे जसे परवाने दिले जातात तसे भांगेच्या ठेक्यांचे परवाने दिले जातात.

’तिच्यामुळे’

लेखक ह्रषिकेश चुरी यांनी मंगळवार, 23/10/2012 20:11 या दिवशी प्रकाशित केले.
पेन होतं, कागद होता त्या रात्री तो जागत होता रात्र चढू लागली त्याला आशा वाटली चंद्र गोजिरा झाला गार वारा झाला मन कोरं होतं, कागदही कोरा होता तरी पेन कागदाला भिडला पाच मिनीटं तसाच राहीला, एक ठिपका करून वर आला रात्रभर हेच चालू राहीले श्वास चालू राहीले, आयुष्य चालू राहीले की नाही हे कळत नव्हते घड्याळाचे काटे सरकू लागले आज कविता होणार नाही हे कळू लागले रात्र संपू लागली पेनातली शाई सुकू लागली झोप येऊ लागली त्याने अखेर पेन उचलला आणि ’तिच्यामुळे’ एवढंच लिहून झोपी गेला ह्रषिकेश चुरी
काव्यरस

ऐलोमा पैलोमा गणेश देवा.

लेखक अनघा आपटे यांनी मंगळवार, 23/10/2012 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
ऐलोमा पैलोमा गणेश देवा. परवा गाडीत माझी आई, आणि माझा अडीच वर्षाचा भाचा होता. बरोबरचे भरपूर समान बाजूच्या सीटवर ठेवून त्या दोघांना मागे बसू दिले. थोड्या वेळाने गडी गाऊ लागला. आधी शाळेत शिकवलेल्या "पोएम्स" झाल्या. मग गाडी घसरली "शिवाजी अमुचा राणा" वर . हे ऐकून मी चकित. पूर्ण गाणे त्याला म्हणता येत होते. मधेच अडले तर शेजारी आजी होतीच. त्याला विचारले "कोणी शिकवले तुला हे?" "माज्या आईला येतं हे गाणं, तिला खूप खूप गाणी येतात." "हुशारच आहे तुझी आई. अजून काय शिकवले तुझ्या आईने?" "जिलेबीचे गाणे, कारल्याचे गाणे, लाडूचे गाणे आणि शिवाजीचे" (आम्ही सारे खवय्ये!

परीक्षणांचा काथ्याकूट

लेखक सहज यांनी मंगळवार, 23/10/2012 16:09 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी आपल्यापैकी बर्‍याच जणांना सिनेमे पहायला आवडतात. काहींना लगेच त्यावर परीक्षण(लेख) लिहायला त्याहून जास्त आवडते. कोणताही सिनेमा पहायच्या आधी त्या सिनेमा बद्दल थोडे भले-बुरे वाचायला मिळाले तर मला बरे वाटते. मुख्य म्हणजे हा सिनेमा बघायचा की नाही हा मुख्य हेतू. पण बरेचदा परीक्षणाचे धागे व त्यातल्या चर्चा पाहून, मतभिन्नता पाहून गोंधळायला होते खरे. म्हणून वाटलं परीक्षणांच्या धाग्यांचाच काथ्या कुटावा. इतर लोकांना परीक्षण चर्चा वाचून काय आकलन होते हे तरी बघूया. मला लक्षात आलेले काही मुद्दे खाली. तुम्हा लोकांना काय वाटते ते देखील येउ द्या. १) बरेचसे सदस्य अक्षरश: आलेला प्रत्येक सिनेमा बघतात.

देस-परदेस!

लेखक मंदार कात्रे यांनी मंगळवार, 23/10/2012 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
कुवेत एअरवेज चे फ्लाईट ३११ मुंबईच्या छत्रपती शिवाजी विमानतळावरून आकाशात झेप घेत होते ,तसतसे आशिष चे विचारही मणामणाचे ओझे उतरावे तसे हलके होत होते . गेले१० महिने आणि त्या काळातल्या घडामोडी एखाद्या चित्रपटासारख्या त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागल्या .गेले एकदोन दिवस नव्हे,तर चक्क १० महिने आपण असे झपाटल्यागत कसे काय वागत होतो? याचा वचार करूनही त्याला उत्तर सापडेना ! रचना ! एखाद्या स्वप्नातल्या परीसारखी ! गोव्याला कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात असताना पहिल्याच दिवशी एक नवीन चेहरा दृष्टीस पडला .नजरानजर झाली ,आणि तिने चक्क स्माईल दिलं!

सूर्योदय

लेखक सुखी यांनी मंगळवार, 23/10/2012 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
काही सूर्योदयाचे काढलेले फोटु a a