Skip to main content

जागर

लेखक विश्वजीत दीपक गुडधे यांनी गुरुवार, 25/10/2012 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
जागर लोकांस आता जागवा पुन्हा विझल्या मशाली पेटवा पुन्हा डोक्यास टाळे लावती सदा सुस्तांस साऱ्या चेतवा पुन्हा आजन्म सोसे बापुडा इथे सोशीक लोकां जागवा पुन्हा झोपून कैसे चालणार हो ? बळ आपलेही दाखवा पुन्हा संधी न येणे विश्वजित अशी संदेश माझा पोचवा पुन्हा • विश्वजीत दीपक गुडधे, अमरावती. ==================================
काव्यरस

कुरुंदकरांची व्याख्याने: मदत हवी आहे

लेखक इष्टुर फाकडा यांनी बुधवार, 24/10/2012 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, कुरुंदकरांच्या संकेत स्थळावर त्यांची व्याख्याने जोडण्यासाठी मदत हवी आहे. मिपावरील संगणक धुरिणांची त्यासाठी मदत मिळाली तर एक महत्वाचा ठेवा सर्वांसाठी खुला होईल. या व्याख्यानांचा दुवा :http://www.esnips.com/thumbnails.php?album=4678391 संकेत स्थळ :http://www.narharkurundkar.com/ हि व्याख्याने संकेत स्थळावर टाकण्यासाठी मी संकेत स्थळाच्या व्यवस्थापकांना विनंती केली होती. पण या व्याख्यानांचा आकार मोठा असल्याने त्यांनी असमर्थता दर्शवित मदतीची अपेक्षा केली आहे.

गुजरात विधानसभा निवडणुक अंदाजांचे मॉडेल

लेखक क्लिंटन यांनी बुधवार, 24/10/2012 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, डिसेंबर महिन्यात गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होईल आणि २० डिसेंबरला मतमोजणी होईल.मी गेले कित्येक वर्षे म्हणजे १९८९ च्या लोकसभा निवडणुकीपासून निवडणुकींच्या राजकारणात रस घेतला आहे. दरम्यानच्या काळात माझा राजकारणातला इंटरेस्ट बराच कमी झाला तरी इतक्या वर्षांपासूनची सवय अशी सहजासहजी जात नाही. त्यामुळे निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर नक्की निकाल कसे लागतील याचा अंदाज बांधणे हा माझा अगदी आवडता खेळ आहे.कधी माझे अंदाज बरोबर येतात तर कधी चुकतात.

सफरचंद हलवा

लेखक अनन्न्या यांनी बुधवार, 24/10/2012 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
 साहित्य: सफरचंद १ किलो, खवा ३५०ग्रॅम, साखर १ ते सव्वा वाटी, वेलची पावडर स्वादानुसार,बदाम काप,बेदाणे,काजू तुकडे,तूप ३चमचे. कृती: प्रथम दोन दोन सफरचंदांची साले काढून घ्यावी.कढईत तूप तापत ठेवावे.गॅस बारीक ठेवावा. साले काढ्लेल्या सफरचंदाच्या फोडी करुन घ्याव्या. त्यातील बिया काढून फोडी किसाव्या, किस लगेच तुपात टाकून परतावा.याच प्रकारे सगळ्या सफरचंदांचा किस करुन तुपावर टाकावा. १० मिनीटे किस परतल्यावर त्यात साखर मिसळावी.

वेंकट

लेखक मंदार कात्रे यांनी बुधवार, 24/10/2012 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मी वेंकटेशन अय्यर . हस्तांदोलन करीत तो म्हणाला .आज तो नावाने आमच्या टीम मध्ये सामील होत होता . ओमान मधील “पी डी ओ “ या प्रथितयश कंपनीच्या आलिशान कार्यालयात आमच्या ग्रुप मध्ये आजपासून हा नवीन “मल्लू” जॉईन झाला होता. अशा अनेक “मल्लू”सोबत आजतागायत काम केले असल्याने त्यात विशेष काहीच वाटले नाही...आमच्या ग्रुप चा अन्वर नावाचा दुसरा एक मराठी सदस्य मला हळूच मराठीतून म्हणाला...”चला, आणखी एक यंडूगुंडू आले रे” ...मीही हसून अन्वर कडे पहिले आणि कामात गर्क झालो... लंचब्रेक मध्ये सगळेजण हास्यविनोद करत असताना अय्यर मात्र शांत आणि गंभीर होता ...

चावडीवरच्या गप्पा – ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया

लेखक सोत्रि यांनी बुधवार, 24/10/2012 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
आवशीचा घों ह्या रांडेच्या मॅथ्यु हेडनच्या!”, घारुअण्णा भयंकर चिडून आणि लालबुंद होऊन कट्ट्यावर हजेरी लावत. “काय झाले घारुअण्णा आज अचानक!”, नारुतात्या. “अहो शिंचा मॅथ्यु हेडन म्हणतोय सचिनला ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया ने सन्मानित करू नका”, घारुअण्णा रागाने थरथरत. “अहो घारुअण्णा का शिळ्या कढीला ऊत आणताय?”, इति भुजबळकाका. “नाहीतर काय! काय हो घारुअण्णा रद्दी काढलीत की काय वाचायला? आणि हो, तो तुमचा संध्यानंद सोडून ह्या कसल्या क्रीडा विश्वाच्या बातम्या वाचताय? खी खी खी...”, शामराव बारामतीकरांनी भुजबळकाकांची री ओढली. “हे बघा, अस्मितेचा प्रश्न आहे हा, बातमी जुनी असो की नवी!

शाही मशरुम मसाला

लेखक स्वाती दिनेश यांनी बुधवार, 24/10/2012 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्य- साधारण १५-१६ बटन मशरुम्स, ३ टोमॅटो किवा १.५ वाटी तयार टोमॅटो प्युरे, ३ मध्यम कांदे, १ मोठा चमचा गरम मसाला,१ मोठा चमचा धनेजिरे पूड,१ चहाचा चमचा तिखट,१ चहाचा चमचा कसूरी मेथी, ६-७ काजूबिया,साधारण अर्धी वाटी सुके खोबरे,१ मोठा चमचा हेवी क्रिम,२ मोठे चमचे तेल, मीठ चवीनुसार, १ चहाचा चमचा साखर कृती- बटन मशरुम्स अर्धे करुन घ्या. टोमॅटो व कांद्यापैकी २ कांदे चौकोनी चिरुन घ्या. १ कांदा उभा जरा जाडसर चिरा. सुके खोबरे जरा लालसर होईल इतपत कोरडेच भाजून घ्या. पळीभर तेलावर चौकोनी

बुद्धिभेद

लेखक तिमा यांनी बुधवार, 24/10/2012 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी सकाळी, मटा वाचून तोंड कडू झाले. त्याला कारण हा प्रताप आसबे, यांचा बुद्धिभेद करणारा ही लेख! http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/16934058.cms#write आज भ्रष्टाचाराविरुद्ध सगळ्या समाजाची एकजूट करण्याची गरज असताना असे जातीय लेख लिहून हे नवपत्रकार आपल्या अकलेचे तारे तोडत आहेत. (किंवा त्यांचा बोलविता धनी ते करवतो आहे, चार तुकडे फेकून). या लेखात बहुजन नेत्यांची बाजू घेऊन अभिजन कसे त्यांचे चारित्र्यहनन करत आहेत, हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.

अवतार

लेखक शैलेंद्रसिंह यांनी बुधवार, 24/10/2012 05:43 या दिवशी प्रकाशित केले.
महानता त्याच्या रोमारोमात भिनलेली आहे... अशक्य असं काही नाहीच....खरंतर जगाचे सगळे रेकॉर्ड्स त्याच्या नावावर व्हावे.... पण त्याचे त्याला काहीही अप्रुप नाही.......डेक्कन क्वीन फ़ुल स्पीडने डोंबिविली स्टेशनवर येत असते....त्याच दिशेच्या टोकाला हा उभा असतो....गाडी आली तेव्हाच हा रेस सुरु करतो....आणि पळत सुटतो....गाडी स्टेशन पार करण्याच्या आधी ह्याने दुसऱ्या टोकाचा ब्रिज चढुन....दुसऱ्या प्लॅटफ़ॉर्मवर जाऊन तिथुन धावत डेक्कन क्वीनच्या आधी प्लॅटफ़ॉर्म पार करुन....खाली रुळावर उतरतो आणि डेक्कन क्वीन जाण्याच्या आधी तिला क्रॉस करतो.... सांगा आता हा मनुष्य जगातला सर्वात वेगवान माणुस नाही का?