मंगला
मंगला
“अग तू बस आता बाहेर. इथली आवरा आवरी जवळ जवळ झालीच आहे. मंगलला बाकीचे सांगून मीही येते. मग बसू निवांत गप्पा मारीत.” पूजाने विशाखाला म्हटले. कालच तिची नणंद विशाखा, विनयसोबत दोन-तिन दिवसासाठी आले होते. दुपारची जेवणे नुकतीच आटोपली होती. चिपळूणमधले ऐन हिवाळ्यातले दिवस. बाहेर हिरवळीवर उन्हं खात बसण्यात वेगळीच मजा येणार होती. हॉलमधे पुष्कर आणि विनयच्या जुन्या आठवणी रंगात आलेल्या होत्या.
विशाखाला बाहेर पाठवून पूजाने निरीनिपटी केली. मंगलाला ओटा स्वच्छ करायला सांगून पूजा हॉलमधे आली. थोडा वेळ गप्पांमधे मस्त गेला.
“बाहेर उन्हात बसायचे कां?” पूजाने विचारले.
मिसळपाव