Skip to main content

"जय जय सुरवरपुजित" विषयी

लेखक अस्वस्थामा यांनी शनिवार, 17/11/2012 या दिवशी प्रकाशित केले.
अजय अतुल यांच्या एका गीत संग्रहामध्ये हे गाणे ऐकले.. अतिशय सुंदर लय आणि शब्द अगदी भारून टाकतात.. परंतु प्रयत्न करून ही याचे बोल कुठे मिळाले नाहीत. कुठलीही माहिती देखील नाही.. अजय अतुल यांच्या एका कार्यक्रमात त्यांनी देखील याचे रचनाकार माहित नाहीत असे सांगितल्याचे आठवतेय.. तसा youtube वर एक audio सापडला.. मग बोल कसे-बसे लिहिले आहेत.. जाणकारांनी कृपया दुरुस्त्या सुचवाव्यात तसेच अर्थदेखील सांगू शकलात तर उत्तमच.. धन्यवाद.. --- जय जय सुरवरपुजित जित दानव कलभ । आस्वरवरलम्बोदर दर हर हर कलभ ॥ नवमी श्री भगवंतम् गणपती मति वरदम् । वरदंति मुखम् सुमुखम् सादर मे करदम् ॥ वरदम् विपदुधौतम् धौतमलम् शमलम् । शमलम् विदम् पिदतम् हत पापी शमलम् ॥ तरुणारुणरुचिरम् तरुणम् श्रीकांतम् । कांतम् कलितै कांतम् कलयेसुदुरम् ॥ करुणा वरुणा दयचरणम् दुजितरणम् शरणम् । या मोयमिरम् शरणम् द्रुतमतसुवितरणम् ॥ जय जय सुरवरपुजित जित दानव कलभ । आस्वरवरलम्बोदर दर हर हर कलभ ॥ ---

वाचने 3309
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

मीही बर्याच ठिकाणी गाणे शोधत होतो पण पूर्ण गाणे मिळाले नाही, बरच झाल तुम्ही लिहिलत ते शब्द खरच भारावून टाकणारे आहेत .

मीही बर्याच ठिकाणी गाणे शोधत होतो पण पूर्ण गाणे मिळाले नाही, बरच झाल तुम्ही लिहिलत, शब्द खरच भारावून टाकणारे आहेत .

अनेकदा ऐकले आणि अजून ही ऐकेन. गणेशस्तुती अतिशय आवडली.

आस्वरवरलम्बोदर दल हर हर कलभ ॥ वरदम् विपदुदधौतम् धौतमलम् शमलम् । कांतम् कलितै कांतम् कलयेसुदुरंतम्

खूप आवडते गाणे आहे. गाण्यात बरीचशी विशेषणे वापरली आहेत गणपतीसाठी.. जय जय सुरवरपूजित जितदानवकलभ (देवांनी ज्याची पूजा केली आणि ज्याने दानवसैन्यावर विजय मिळवला अशा गणेशाचा जय असो) भास्वरवर लम्बोदर दरहर हरकलभ | (जो तेजस्वी आहे, लंबोदर आहे, भय दूर करणारा आहे आणि हराचा म्हणजे शिवाचा मुलगा आहे) नौमि श्री भगवन्तं गणपतिमतिवरदं वरदन्तीमुखं सुमुखं सादरम् एकरदं तम् | (जो वर देणारा आहे, गजमुख, सुमुख आणि ज्याला केवळ एक दात आहे अशा गणेशाला माझा नमस्कार असो) ह्यापुढचे गाण्याचे शब्द आणि त्यांचा अर्थ जरा अजून शोध घेऊन देईन.