Skip to main content

मिरचीचे रुचकर लोणचे

लेखक जागु यांनी शुक्रवार, 30/11/2012 23:59 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १) पाव किलो मिरच्या २) २ चमचे धणे ३) २ चमचे जिरे ४) २ चमचे बडीशेप ५) १ चमचा राई ची डाळ ६) अर्धा चमचा हळद ७) पाऊण वाटी मिठ ८) अर्धी वाटी तेल ९) ३ लिंबू पाककृती : १) मिरच्या धुवुन, पुसून घ्याव्यात.

शब्द - अर्थहीन

लेखक विश्वेश यांनी शुक्रवार, 30/11/2012 23:47 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द - अर्थहीन (अनुवाद) प्रसंग - राधा कृष्णाला जाब विचारते कि तू मला का सोडून गेलास, त्यावर कृष्ण तिला बरेच समजावू पाहतो, कर्म, धर्माच्या गोष्टी सांगतो त्यावर राधाचे उत्तर - शब्द - अर्थहीन ========== हि सार्थकता तू मला कशी समजावणार ... कान्हा ... शब्द शब्द शब्द माझ्या करता सगळे अर्थहीन असते, जर ते माझ्या समीप बसून माझ्या निर्जीव कुंतलात हात गुंफून तुझ्या कापऱ्या ओठांतून आले नसते ... शब्द शब्द शब्द कर्म, स्वधर्म, निर्णय, दायित्व .... मी देखील घरो घरी ऐकले आहेत हे शब्द अर्जुनास यात काहीही सापडो ... मला बापडीला यात काही सापडत नाही प्रिया ... मी फ़क़्त त्यांच्या मार्गात अडखळून तुझ्

तुम्ही चंगळ वादी आहात का?

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 30/11/2012 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही चंगळ वादी आहात का? ब्रांडेड कपडे...महागडे आफ्टर शेव्ह ..शूज व अक्सेअसरिज .. उंची हॉटेल मध्ये पार्ट्या ..मोल मध्ये खरेदी ...इत्यादी..इत्यादी .. चंगळ वाद पूर्वी आमच्या लहान पणी पण होता पण स्वरूप निराळे होते .. केळीचे शिकरण व मटार उसळीचा बेत म्हणजे चंगळ ..

सचिनचे क्रिकेट

लेखक रणजित चितळे यांनी शुक्रवार, 30/11/2012 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
..नमस्कार ..ब-याच दिवसांनी येथे येत आहे. आता रेग्युलर राहीन. माझी बदली दिल्लीला झाली बंगळूर सोडले त्यामुळे मध्यंतरी मिपावर नव्हतो.............. हल्लीच इंग्लंड बरोबरच्या झालेल्या क्रिकेट कसोटीत भारताला हार मानावी लागली व सचिन सामन्यात धावा काढू शकला नाही म्हणून विविध बातम्या देणाऱ्या वाहिन्यांनी दिवसभर व मध्य रात्री पर्यंत ह्या घटनेला अक्षरशः कुटून काढले. सचिनने संदीप पाटिलला केलेला फोन, त्यावर तो काय बोलला असेल ह्याच्या अटकळी ह्या वाहिन्या लावीत बसल्या होत्या. दुसऱ्या दिवशी वर्तमान पत्रात सुद्धा मोठाल्या बातम्या आल्या होत्या.

ढोकळ्याचा अगदी काही मिनीटात होणारा प्रकार.

लेखक गौरीबाई गोवेकर यांनी शुक्रवार, 30/11/2012 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
ढोकळ्याचा अगदी काही मिनीटात होणारा प्रकार. साहित्य: १ वाटी दही (अमुलचे तयार दही असल्यास उत्तम), १ वाटी दुध, १ वाटी रवा (नेहमीचा गव्हाचा रवा. आपण सांजा/शि-यासाठी वापरतो तो.), ईनो फ़्रुट सॉल्ट्चा १ पाउच (१ ते दीड चमचा) , अर्धा ईंच आल्याची पेस्ट, १ चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट. मीठ. फ़ोडणीचे साहित्य. सर्वप्रथम ढोकळा वाफ़वण्यासाठी कुकर मधे पाण्याला उकळी येउ देणे. ज्या पात्रात ढोकळा वाफ़वायचा असेल त्याला आतून तेलाचा हात लावून तयारे ठेवणे व नंतर उर्वरीत कृति करावयास घ्यावी. एका दुस-या भांड्यात रवा घ्यावा. दही छान मोडुन घ्यावे पाणी घालू नये.

कांदा मुळा भाजी.......

लेखक अनघा आपटे यांनी शुक्रवार, 30/11/2012 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणापासून मंडईत जाणे हि माझ्या आवडीची गोष्ट! तेंव्हा घरी फ्रीज नसल्याने २/२ दिवसांची भाजी घरी येत असे. भाज्यांचे नीट रचून ठेवलेले ढीग. सर्वत्र जाणवणारा ताजेपणा, रसरशीतपणा इतका मोहवणारा असतो की .....नंतर कॉलेजला जावू लागले तो पर्यंत घरी फ्रीज चे आगमन झाले होते, त्यामुळे मी खूप आनंदाने रविवारी भाजी घेऊन येत असे, नुसती भाजीच नव्हे तर फळे, देवपूजेसाठी आठवडभर पुरतील इतकी फुले असं सारं घेऊन आले कि मग मला खूप छान वाटत असे. नंतर त्या घरी नेलेल्या भाजीची निवडा निवडी करण्यासाठी आईला काय कष्ट पडतात याची तेंव्हा कल्पनाच नव्हती.

बाळाराम-बुवा

लेखक इरसाल यांनी शुक्रवार, 30/11/2012 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
"गुरुजी, तुमच्या पोराला गणित येत काय हो" ? असा प्रश्न विचारुन मला रिंगणात घ्यायचा प्रयत्न करणारे बुवा हे आमचे शेजारी. शिक्षण ६/७ वी पर्यंत झालेले. त्यांना हो हे उत्तर मिळाले की विचारायचे सहा सहा ढुंगणाला ढुंगण सांग किती ? त्यावेळेस काही वर्षांपुर्वीच वडिलांची बदली त्या गावात झाली होती. त्यामुळे आम्ही नवेच होतो गावाला आणी असणार्‍या शेजार्‍यांना सुद्धा. बुवांचे वय साधारण २७/२८ असावे.

You Must See..

लेखक मुरलीधर परुळेकर यांनी शुक्रवार, 30/11/2012 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
तो आणि ती आज दोघेही घरात आहेत. Week End आहे ना आज ! तिचा खरं तर मुड होता outing ला जायचा, मस्तपैकी हिंडायचा. पण तो जाम कंटाळलाय, त्याला आज घरीच थांबायचय. त्यामुळे ती जाम फ़ुगलिये. त्याला माहिती आहे, उगाच लाडी-गोडी करायला लागलो तर फ़क्त भांड्यांचाच आवाज येइल आणि आपल्या अरसिकतेवरच्या व्याख्यानाचा !! त्याच्या डोक्यात वीज चमकते ! तोही गुश्श्यातच सांगतो, “मी आलो पेपर आणतो corner वरुन !” बाहेर पडतो तसा तो १५ मिनिटात घरीही येतो पण अतिशय घामघुम झालेला… छातीवर हात, वेदनाग्रस्त चेहरा “अगं इकडे ये” म्हणून असहाय्यपणे ओरडतोय. “काय झालं?” ती पळत बाहेरच्या खोलीत येते, घाबरते “पाणी आणते” म्हणत आत पळते.

रिफ्राईड बीन्स टॅकोज

लेखक सानिकास्वप्निल यांनी शुक्रवार, 30/11/2012 06:23 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य रिफ्राईड बीन्ससाठी: १ वाटी राजमा किंवा पिंटो बीन्स (रात्रभर भिजवून ठेवणे, सकाळी कुकरला शिजवून व पाणी गाळून घेणे.