Skip to main content

आर्थिक अनुदान काही अनुभव

लेखक जानु यांनी गुरुवार, 06/12/2012 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या आपल्या कडे आर्थिक अनुदाने रोख स्वरुपात देण्याचे धोरण शासन राबवणार असे दिसते. त्यावर मिपा वर चांगल्या चर्चा वाचतांना मला दिसलेले काही वेगळे अनुभव मांडत आहे. वेगळे म्हणजे आपण ज्या अपेक्षेने सदर योजनांकडे पाहत आहोत ती मला तरी भाबडी आहे असे वाटते. आपला विश्वास असा की जनतेला या योजना फायद्याच्या आहेत. मला प्रश्न पडतो की जनता यावर काय विचार करते किंवा ती कश्या प्रकारे याचा वापर करणार? आमचा एक मित्र जि. प. मध्ये प्रा. शि. म्हणुन गेल्या १५ वर्षा पासुन नोकरीस आहे.

शिव तांडव स्तोत्र - मराठी अनुवाद

लेखक नरेंद्र गोळे यांनी गुरुवार, 06/12/2012 21:37 या दिवशी प्रकाशित केले.
॥ १ ॥ जटाटवीगलज्जलप्रवाहपावितस्थले गलेऽवलम्ब्यलम्बितां भुजंगतुंगमालिकाम्‌ डमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं चकारचंडतांडवं तनोतु नः शिवः शिवम्‌ जटांमधून धावत्या जलांनि धूत-कंठ जो धरीत सर्पमालिका, गळ्यात हार शोभतो डुम्मूडुम्मू करीत या, निनाद गाजवा शिवा करीत तांडव प्रचंड, शंकरा शुभं करा ॥ २ ॥ जटा कटाहसंभ्रम भ्रमन्निलिंपनिर्झरी विलोलवीचिवल्लरी विराजमानमूर्धनि धगद्धगद्धगज्ज्वलल्ललाटपट्टपावके किशोरचंद्रशेखरे रतिः प्रतिक्षणं मम जटांतुनी गतीस्थ, गुंतल्या झर्‍यांपरी अहा तरंग ज्याचिया शिरी विराजती, शिवा पहा ललाट ज्योतदाह ज्या शिवाचिया शिरी वसे किशोर चंद्रशेखरा-प्रती रुचीहि वाढु दे ॥ ३ ॥ धरा धरेंद्र
काव्यरस

रंगावली प्रदर्शन - २०१२, ठाणे!

लेखक किसन शिंदे यांनी गुरुवार, 06/12/2012 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
मदनबाणाचा रांगोळी प्रदर्शनाचा धागा पाहिल्यानंतर मलाही इथे धागा टाकण्याचा मोह आवरता येत नाहीये. ;) ठाण्यातल्या न्यु गर्ल्स स्कुलमध्ये रंगावली गृपतर्फे दरवर्षी रांगोळी प्रदर्शन भरवले जाते, ते या वर्षीही भरवले होते. १५ च्या संध्याकाळी चहाबरोबर जोरदार शंकरपाळ्या हादडल्यानंतर भाचेकंपनीला सोबत घेतलं आणि प्रदर्शनात पोहचलो. गणरायाच्या सुरेख रांगोळीने सुरूवात झाली.सध्या घडणार्‍या विविध घडामोडींना लक्षात ठेऊन एकापेक्षा एक सुरेख रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. पैकी अ‍ॅपलचे जनक स्टिव्ह जॉब्स आणि भारताचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंह यांच्या रांगोळ्या दृष्ट लागण्याजोग्या होत्या.

ड्रॅगनच्या देशात ०४ - बायजींग : चांगलींग थडगी, चीनची महाभित्तीका (बदालींग) , पेकींग ऑपेरा, बायजींग शहर

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी गुरुवार, 06/12/2012 19:47 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४...

गजरा - एक प्रवास

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 06/12/2012 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
(ऐसीअक्षरे ह्या मराठी संस्थळाच्या दिवाळी अंक 2012 मध्ये पूर्वप्रकाशित) लहान असताना टी.व्ही. ही एक ठराविक वेळी पाहण्याची आणि चॅनल्सचा रतीब न घालणारी एक करमणूकीची सोय होती. त्यावेळी दूरदर्शनवर 'गजरा' नावाचा एक कार्यक्रम यायचा. त्या कार्यक्रमामुळे मला गजरा हा शब्द, तो खराखुरा फुलांचा गजरा प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायच्या आधी कळला. त्या कार्यक्रमात सुरुवातीला कॅलिडोस्कोपमधून दिसते तशी वेगवेगळ्या आकारांची हालणारी नक्षी दिसायची. त्यामुळे गजरा ही एक रंगीबेरंगी वस्तू असावी असेच मला वाटायचे.

काँग्रेसचे अभिनंदन

लेखक नाना चेंगट यांनी गुरुवार, 06/12/2012 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
अखेरीस एफडीआय ला लोकसभेत मंजूरी मिळाली :) भारतीय जनतेला समृद्धीकडे नेण्याचा राजमार्ग खुला झाला ! एका नव्या युगात लवकरच आपण जाणार आणि सगळीकडे आबदी आबाद होणार ! हे सर्व केवळ कॉग्रेसच्या आमआदमी साठी असलेल्या कळकळीमुळे शक्य झाले आहे. आर्थिक सुधारणांचे शिल्पकार, नव्या युगाचे मनु आधुनिक चाणक्य असे आपले पंतप्रधान श्री मनमोहन सिंग नक्कीच कौतुकास पात्र आहेत. हे सर्व केवळ सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या अथक परिश्रमानेच होऊ शकले आहे. मी कॉग्रेसचे या निमित्ताने मनःपुर्वक अभिनंदन करतो आणि असेच वेगवेगळे निर्णय त्यांनी लवकरात लवकर घ्यावे अशी विनंती करतो. जय हिंद ! जय महाराष्ट्र !!

जन्ता अनाडी और नेता खिलाडी!

लेखक हुप्प्या यांनी गुरुवार, 06/12/2012 06:49 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच भारतीय ऑलिंपिक संघटनेला जागतिक ऑलिंपिक संघटनेने निलंबित केले. कधी नव्हे ते सहा पदके मिळवणार्‍या भारतीय खेळाडूंना ऑलिम्पिकला कायमचे मुकावे लागणार की काय असे वाटू लागले आहे. ह्याचे कारण साधे सोपे आहे की क्रीडा क्षेत्रात नको इतका राजकीय हस्तक्षेप, भ्रष्टाचार ह्यांचा बुजबुजाट झाला आहे आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील संघटनेने भारताचे नाक कापले आहे.