हात जोडुन विनंती करतो. हे असले शेंडा बुडखा नसलेले धागे टाकु नका हो. काहितरी लिहा. त्या आकाशदिव्याकडे बघुन काय करु नाहितर आम्ही. आणि तो फ्रोक (फ्रॉक म्हणायचे असावे बहुधा तुम्हाला) नक्की कुणाचा आहे? सन्नी लिओन, कॅटरिना, करीना कपूर वगैंरेंचा असेल तर आम्ही किमान आशाळभूतपणे बघु तरी. हे नुसतेच असले फोटो काय टाकताय?
लहानपणी दोन पैशाच्या छोट्या पतंगाला मारुतीएवढी लांब शेपटी लावून उडवायचो, त्याची आठवण झाली.
वो तेरी यादमें अब याद आया!
शंका: आकाशदिव्यांत दिवा का नाही ?
स्वतीश्रीबापट, तुम्ही आकाशदिव्यावर घेतलीत तशीच थोडी अजून मेहनत शुद्धलेखनावर आणि ज्याचा फोटो टाकाल ती वस्तू कशी कशी बनवली, ही माहिती लिहिण्यावर घेतलीत तर धाग्यात अर्थ निर्माण होईल.
हा आकाशदिवा कसा केला ते सांगा ना ताई! आम्हालाही ट्राय करता येईल. असे एकोळी धागे टाकण्याची परवानगी मिपावर नाही हे धोरणांमध्ये लिहिले आहे. नवीन असल्यामुळे जर आपणास टंकण्यास अडचण येत असेल तर आधी सराव करावा ही विनंती. फारतर दोनेक दिवसांच्या सरावाने साधे लिहिणे जमून जाते. अगदी काही वेगळी अक्षरे टंकणे लक्षात ठेवण्यासाठी आठ पंधरा दिवस लागतात. आधी इतरांच्या धाग्यांवर प्रतिसाद द्या. तुमची ओळख इतरांना होईल. आता जी चेष्टा होत आहे ती होण्याची 'शक्यता' कमी होईल. तरीही राग मानू नका.
धोरणांमध्ये याबद्दल उल्लेख आहे व ती नव्या सदस्यांनी वाचणे अपेक्षित आहे. शिवाय नवीन असताना आधी दुसर्यांना प्रतिसाद द्याल की नाही? अनेकदा नवे सदस्य येतात आपले चार दोन फोटू टाकून, कौतुक करून घेऊन पुन्हा फिरकत नाहीत. बरं, हजारो सदस्यांमध्ये कोण कुणाला शोधत बसणार? रेवति, रेवती, रेवती १, रेवतीमी अश्या नावाच्या सत्राशेसाठ सदस्या असल्या तर किती लक्ष द्यायचे? हे असे कुठे लिहिता येत नाही म्हणून मग आम्ही सदस्यांवरच सोडतो. ते हे काम बरोब्बर करतात. ;)
हे असे कुठे लिहिता येत नाही म्हणून मग आम्ही सदस्यांवरच सोडतो. ते हे काम बरोब्बर करतात. - आणि सदस्य हे काम जास्त उत्साहानं करायला लागले की त्यांना संपादक बनवता हो क्की नाही रेवतीआज्जी.
कोणीतरी संपादक हा विषय काढण्याची वाटच बघत होतो. धन्यवाद.
धोरणांमध्ये याबद्दल उल्लेख आहे व ती नव्या सदस्यांनी वाचणे अपेक्षित आहे.
आपण जेव्हा एखादे सॉफ्टवेअर इंस्टॉल करतो, अगदी गेला बाजार फ्लॅश प्लेयर किंवा रिडर ऑनलाईन अपग्रेड करतो तेव्हा कितीवेळा आणि कोण कोणत्या सॉफ्टवेअरची धोरणे आपण वाचलेली असतात ? आपल्यापैकी किती लोकांनी फेसबुक / ऑर्कुट / जीमेल वर सभासदत्व घेताना तिथली सर्व धोरणे वाचली आहेत ? ह्या प्रश्नांची उत्तरे मिळाली की मग संस्थळाची धोरणे वाचण्याची अपेक्षा धरणे किती गंमतीचे आहे ते लक्षात येईल.
शिवाय नवीन असताना आधी दुसर्यांना प्रतिसाद द्याल की नाही? अनेकदा नवे सदस्य येतात आपले चार दोन फोटू टाकून, कौतुक करून घेऊन पुन्हा फिरकत नाहीत. बरं, हजारो सदस्यांमध्ये कोण कुणाला शोधत बसणार? रेवति, रेवती, रेवती १, रेवतीमी अश्या नावाच्या सत्राशेसाठ सदस्या असल्या तर किती लक्ष द्यायचे?
सदस्यत्व नोंदवल्यावरती जी ऑटो इमेल जायची व्यवस्था करण्यात आली आहे, त्या इमेल बरोबरच काही महत्वाची धोरणे पाठवण्याची व्यवस्था करणे शक्य होईल काय ? किंवा 'सभासदत्व घ्या' वरती क्लिकल्यावरती आधी धोरणांचे पान येईल आणि तिथून मग सभासदत्वाकडे जाता येईल असे काही करता येईल का ?
हे असे कुठे लिहिता येत नाही म्हणून मग आम्ही सदस्यांवरच सोडतो. ते हे काम बरोब्बर करतात.
आणि मग अशा सदस्यांचे नावाने शिमगा करत काही संपादकच मालकांकडे धाव घेतात. :)
सर्व तांत्रिक कामांसाठी मालकांना भेटावे. जे सदस्य अतिदंगा करतात त्यांचे प्रतिसाद संपादकमंडळ अप्रकाशित करते. त्यापुढील आगावूपणा मालकांच्या कानावर घालण्याची सूचना मालकांकडूनच आहे त्याचे संमं पालन करते. ज्यांना हे मान्य नाही त्यांनी तर संपादकांविषयीच्या आपल्या तक्रारी घेऊन मालकांना लगोलग प्रत्यक्ष, फोनवर किंवा जसे जमेल तसे भेटावे. मी यापुढील कोणतेही एक्सप्लनेशन देणे लागत नाही हे स्पष्टपणे सांगू इच्छिते.
मी यापुढील कोणतेही एक्सप्लनेशन देणे लागत नाही हे स्पष्टपणे सांगू इच्छिते.
मी कधी आणि कुठे एक्सप्लनेशन मागितले बॉ ? मी तर उलट 'असे काही करता येईल का?' ह्या सदरात २/३ तांत्रिक चौकशा मिपाच्या पटलावरती ठेवल्या आहेत. संबंधीत (तांत्रिक विभागाशी) लोक्स ते वाचतील आणि विचार करतील. ते व्हायलाच पाहिजे, किंवा करायलाच हवे असा आमचा आग्रह नाही. रादर ज्यांना मिपावरती काय करता येईल ह्याची जाण आहे त्यांना ऑलरेडी त्यांचा संबंधीत पदभार मिळालेल आहे, ते त्याचा विचार करतीलच. त्यामुळे मालकांना वैग्रे भेटून त्यांच्या व्यस्त वेळात त्रास देण्याची इच्छा नाही. ह्या चौकशा फाट्यावरती मारल्या तरी आम्हाला काही अडचण नाही. आम्हाला फाट्यावरती मारले तरी देखील हरकत नाही.
बाकी शेवटच्या ओळीतील प्रतिसाद हा 'लेकी बोले सुने लागे' ह्या धर्तीवरती आहे हे सांगावे लागेल काय? ;) आणि मुख्य म्हणजे आम्हाला काय मान्य आहे आणि काय मान्य नाही, ह्याचा संबंधच कुठे येतो? आम्ही कोण मोठे टेकोजीराव लागून गेलो आहोत बॉ ?
आणि सगळ्यात महत्वाचे :- संपादकांच्या (दिव्य) दृष्टीने कोण सभासद अतिदंगा करणारा आहे किंवा आगाऊपणा करणारा आहे त्याच्याशी आम्हाला काय करायचे आहे ? मी कुठेही संपादकांनी काय करावे आणि काय करू नये असे सुचवलेले नाही. मी फक्त 'काही संपादक' काय करतात ते स्पष्ट भाषेत लिहिलेले आहे. ते योग्य आहे / चुक आहे/ त्यांनी तसे करावे / करु नये ह्या विषयी मी कुठलेही मतप्रदर्शन केलेले नाही.
मी यापुढील कोणतेही एक्सप्लनेशन देणे लागत नाही हे स्पष्टपणे सांगू इच्छितो. (विचारणार कोण आहे हा भाग वेगळा)
एक आकाशकंदिल काय लावला, केवढा उजेड पडला धोरणांवर, माताय आकाशदिवा नाही डायरेक माहितीअधिकाराचा अर्जच झाला.
नवे,जुने,वाचनमात्र,धागामात्र सर्व प्रकारचे सदस्य आणि सर्व संपादक व सल्लागार मंडळ तसेच मालक हा प्रतिसाद विनोदाने दिलेला आहे हे समजतील अशी अपेक्षा.
हात जोडुन विनंती करतो. हे
अप्रतिम !
(दुरूस्ती केल्या गेली आहे.)
In reply to अप्रतिम ! by परिकथेतील राजकुमार
पतंग
In reply to अप्रतिम ! by परिकथेतील राजकुमार
दिवा आकाशात असतो!
In reply to पतंग by तिमा
(No subject)
In reply to अप्रतिम ! by परिकथेतील राजकुमार
मिपाचे लवकरच चेपू होणार
स्वतीश्रीबापट, तुम्ही
बिच्चारीने ईन मीन तीन शब्द
In reply to स्वतीश्रीबापट, तुम्ही by कवितानागेश
प्रतिसादा बद्दल धन्यवाद. मी
अय्या खरच ???
In reply to प्रतिसादा बद्दल धन्यवाद. मी by स्वातीश्रीबापट
थोडासा उशीर झाला बघा
हेहेहेहेहेहे......
हा आकाशदिवा कसा केला ते सांगा
रेवती ताई आपल्या प्रेमळ
In reply to हा आकाशदिवा कसा केला ते सांगा by रेवती
वरील प्रतिसादाने आपल्या
In reply to रेवती ताई आपल्या प्रेमळ by स्वातीश्रीबापट
मिश्कीलपणाची हद्द आहे.
In reply to वरील प्रतिसादाने आपल्या by प्यारे१
सर्व संपादकांना विनंती
धोरणांमध्ये याबद्दल उल्लेख
In reply to सर्व संपादकांना विनंती by सस्नेह
हे असे कुठे लिहिता येत नाही
In reply to धोरणांमध्ये याबद्दल उल्लेख by रेवती
धन्यवाद.
In reply to धोरणांमध्ये याबद्दल उल्लेख by रेवती
सर्व तांत्रिक कामांसाठी
In reply to धन्यवाद. by परिकथेतील राजकुमार
आइंग !
In reply to सर्व तांत्रिक कामांसाठी by रेवती
मी 'अलिखित' नियमांविषयी
In reply to धोरणांमध्ये याबद्दल उल्लेख by रेवती
एक आकाशकंदिल काय लावला, केवढा
+१११११११
In reply to एक आकाशकंदिल काय लावला, केवढा by ५० फक्त
'आकाशदीवा' लागला (दि
In reply to +१११११११ by मोदक
मला तरी दिवा दिसत नाही.
हाण्ण!
In reply to मला तरी दिवा दिसत नाही. by तर्री
निषेध.
In reply to मला तरी दिवा दिसत नाही. by तर्री