Skip to main content

टोमॅटो साल्सा/ चटणी

लेखक खादाड अमिता यांनी बुधवार, 19/12/2012 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
tomato salsa सामग्री: १ किलो टोमॅटो ५ लसुन पाकळ्या, बारीक चिरलेल्या १ टेबलस्पून टोमॅटो केचप १ टीस्पून काश्मिरी मिरची पाउडर १ लवंग १ टीस्पून ड्राईड हर्ब्स १ टेबलस्पून साखर मीठ आणि मिरपूड चवीनुसार कृती: - टोमॅटो उकडून/ ब्लांच करून, त्याची साले काढून ते मिक्सर मध्ये वाटून घ्या. - एका जाड बुडाच्या भांड्यात सर्व सामग्री आणि टोमॅटो चा गर एकत्र करून थोडं उकळा, हे मिश्रण उकळून जर दाट झालं कि गार करून एका काचेच्या बाटलीत भरून फ्रिज मध्ये ठेवा.

मनातलं जनांसाठी

लेखक समयांत यांनी बुधवार, 19/12/2012 14:10 या दिवशी प्रकाशित केले.
एच आर वाले म्हणवणारे सध्या कॉल करुन उमेदवार्‍यांना आशा लावत आपली मक्तेदारी गाजवत आहेत. खरेतर त्यांना सद्य परिस्थिती सांगता का येत नाही, प्लेसमेंटची साठेबाजारी करत मंदीची पळमात्र शंका येऊ न देणारे हे भविष्यातले गुन्हेगार आहेत, पण काय त्यांची आत्ताची रोजीरोटी त्या साठेबाजारीतूनच चालत असते. आज गोजिरवाण्या शहरात राहणारे आणि आपली ख्यालीखुशाली सांभाळणारे दारांत उभ्या माणसांना हलके हसून बोळवण करायलाही विसरले आहेत, इथेच ती मंदी वर डोके काढत आहे. मला जाचणारे बरेच काही आहे, पण इथे लिहावे कि नाही याचा विचार करतो आहे. असो, या संस्थळाविषयी आत्मयिता असल्याने मी नक्कीच लिहिणार..

मुसळधार पाऊस आणि मि एक एकटा

लेखक श्रीमत यांनी बुधवार, 19/12/2012 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
मुसळधार पाऊस आणि मि एक एकटा शांत बससेला... मुसळधार पाऊस आणि सोबतीला त्या दळकाळी फोडणाऱ्या विजांचा कडकडाट पावसाच्या सरी कधी या कुशीवर कधी त्या आणि मि एकटा शांत बससेला......... वाटले मलाही कि जावे त्या पावसात स्वचंद भिजावे, नाचावे, मनमुक्त खेळावे, गाणे गावे....... पण मी एकटाच त्या भयानक पावसात............... सखे येशीलका तू माझ्य्ब्रोबर त्या पावसात .. नाही म्हणू नकोस ... पाऊस थांबेल , विजा नाहीशा होतील , माझ्या आश्या-आकांश्या नष्ट होतील नाही म्हणू नकोस ............ *कृपया संभारून घ्या मराठी प्रथमच लिहितो आहे*

टाकाऊतून टिकाऊ

लेखक त्रिवेणी यांनी बुधवार, 19/12/2012 08:54 या दिवशी प्रकाशित केले.
आईच्या घराशेजारच्या काकू पिको फॉल करायच्या, ते करत असताना साडीला फॉल करताना साडी सरळ रेषेत थोडी कापून घ्यावी लागते त्या कापलेल्या चिंद्यांचे हे बस्कर मला आत्याने करायला शिकविले होते.स्वेटर विणायच्या सुयानी ये विणले आहे.

भूक

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 19/12/2012 01:40 या दिवशी प्रकाशित केले.
आला तेव्हा होता नंगा, त्याले कपडे घातले सोन कांतीचिये रंगा, त्याचे रुपडे झाकले कपड्यांच्या अंगा अंगा, सदा लागलेली भूक जिव्हा खादाडीचा दंगा, डोया हवे दृष्टीसूख कान मागती सुराले, त्वचा आसुसली स्पर्शा नाक सुवासा हुंगते, सारी शोधताती हर्षा पंचेद्रियांचे चोचले, पुरविता पुरे नाही किती ह्यांना भरविले, देह वखाखला राही कपड्यांच्या अंतर्भागा, वसे सोनेरी झळाळी त्याची भूक भागेना गा, मारी आक्रोशाने हाळी सारे देहाचे चोचले, पुरे होती त्याचे लाड तेज भुकेने गांजले, पाच गजांचिये आड पंचेंद्रिये अंग अंग खाउ खाउनी खंगले जीर्ण होताची तुरूंग तेज मोक्षाशी धावले
काव्यरस

तुम्ही खोटं बोलता का : एक सर्वेक्षण. :)

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी मंगळवार, 18/12/2012 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. समाजजीवनात वावरतांना मला कधी कधी वाटतं की काही माणसं थोडं थोडं खोटं बोलत असतात, अर्थात अशा विधानाला कोणताही अधिकृत विदा नाही आणि काही संदर्भही नाही. आणि मग माझ्या मनात विचार आला की माणसं खोटं बोलतात ही गोष्ट खरी आहे, पण हे खोटं बोलण्याचं प्रमाण काय असावं ? आणि ते मोजण्याचं माप कोणतं ? आणि अशा खोटं बोलण्यानं माणसाचा समाजजिवनात फायदा होतो की तोटा होतो, असा एक विचार हा सर्वेक्षण घेतांना मनात आला. प्रतिसाद समजून घेण्यासाठी 'मिसळपाव' आणि 'अ ते ज्ञ' या दोन संकेतस्थळ सदस्यांच्या प्रतिक्रियांची नोंद घेणार आहे.

जपानी कलात्मकता

लेखक neeta यांनी मंगळवार, 18/12/2012 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
जपानी लोक कलात्मकता (creativity) साटी प्रसिध्द आहेत. प्रत्येकामध्ये काही ना काही तरी कला असतेच, आपण त्याच्याकडे लक्श देत नाही , संलग्न केलेले फोटो पाहून तुम्हाला देखील काही नवीन युक्त्या सुचतील ज्या तुमच्या घरासाठी धंद्यासाठी उपयोगी पड्तील.

ईमली - तील के चावल

लेखक दिपक.कुवेत यांनी मंगळवार, 18/12/2012 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
Bhat साहित्यः १. शीजवलेला मोकळा भात - २ वाटया २. पांढरे तीळ - २ मोठे चमचे (हलकेसे सोनेरी परतुन घेणे) ३. चींचेचा कोळ - १/२ वाटि ४. कडिपत्ता - ४ ते ५ पानं ५. साधं लाल तिखट - १ चमचा ६. हळद - १/२ चमचा ७. आलं / लसुण पेस्ट - १ चमचा ८. चवीनुसार मीठ ९. तेल - १ पळि १०. डिप फ्राय केलेले कांदे - २ (थोडा सजावटिसाठि बाजुला ठेवावा) ११. कोथिंबीर कृती: १. प्रथम भात मोकळा शीजवुन घ्यावा (फ्राईड राइस ला घेतो तसा) किंवा शीळा भात उरला असेल तर तो घ्यावा २.

तुम्ही जात मानता का: एक सर्वेक्षण

लेखक ऋषिकेश यांनी मंगळवार, 18/12/2012 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाववरील बढतीमध्ये आरक्षणावरील चर्चेत अनेकांनी जाती-पातींच्या निराकरण करण्यावर भर दिला आहे, जे स्तुत्य आहेच. यातून आपण जाती किती मानतो याबद्दल एक सर्वेक्षण करायचे मनात आले. त्यासाठी प्रतिसाद-गट म्हणून ऐसीअक्षरे आणि मिसळपाव.कॉम या दोन संस्थळांवरच्या सदस्यांमध्ये एकत्रितपणे हे सर्वेक्षण करत आहे. या सर्वेक्षणात भाग घ्यायची इच्छा असेल तर पुढील नियम पाळावेतः १. पुढे जे प्रश्न विचारले आहेत, त्यात तुम्हाला योग्य वाटणारा एकच पर्याय निवडायचा आहे. शक्य होईल तितके प्रामाणिक उत्तर द्यावे २. 'इतर' हा पर्याय निवडल्यास समर्पक स्पष्टीकरण द्यावे ३.

शासकीय नितीमत्ता

लेखक जानु यांनी मंगळवार, 18/12/2012 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
नितीमत्ता हा विषय तसा बराच चर्चला गेलेला असला तरी काही अनुभव आले की पुन्हा जाग्रुत होतोच. माझेही आज तसेच झाले. आटपाट नगरात एक अधिकारी रुजु झाले. यापुर्वीचा त्यांचा अनुभव व तेथील लोकांच्या माहितीनुसार साहेब अतिशय कडक. शिक्षण आणि आरोग्य हे त्यांचे अति जिव्हा़ळ्याचे विषय आहेत हे त्यांनी आल्या आल्या सांगून टाकले. कारण काय तर तिर्थरुप शिक्षक. मंडळी धास्तावली. मागील अनुभव पाहता अशी सुरुवात ही धोक्याची घंटा. आल्या आल्या साहेबांनी भराभर भेटीचा धडाका सुरु केला. प्राथमिक शब्दाला फारच महत्व मग ती शाळा असो की आरोग्य केंद्र. दोन महिन्यात जवळ जवळ सर्व तालुका पिंजला गेला.