मिसळपाववरील बढतीमध्ये आरक्षणावरील चर्चेत अनेकांनी जाती-पातींच्या निराकरण करण्यावर भर दिला आहे, जे स्तुत्य आहेच. यातून आपण जाती किती मानतो याबद्दल एक सर्वेक्षण करायचे मनात आले. त्यासाठी प्रतिसाद-गट म्हणून ऐसीअक्षरे आणि मिसळपाव.कॉम या दोन संस्थळांवरच्या सदस्यांमध्ये एकत्रितपणे हे सर्वेक्षण करत आहे.
या सर्वेक्षणात भाग घ्यायची इच्छा असेल तर पुढील नियम पाळावेतः
१. पुढे जे प्रश्न विचारले आहेत, त्यात तुम्हाला योग्य वाटणारा एकच पर्याय निवडायचा आहे. शक्य होईल तितके प्रामाणिक उत्तर द्यावे
२. 'इतर' हा पर्याय निवडल्यास समर्पक स्पष्टीकरण द्यावे
३. सर्वेक्षणातील प्रश्नांची उत्तरे व्यनीतून कळवायची आहेत. उत्तरे माझ्या म्हणजे 'ऋषिकेश' या सदस्याला व्यनीतून पाठवावीत. आपली उत्तरे प्रतिसादातून जाहिरपणे देऊ नयेत ही विनंती.
४. सर्वेक्षणाचा कालावधी एक आठवडा आहे. सदर सर्वेक्षण २५ डिसेंबर रोजी भाप्रवे रात्री १२:०० वाजता संपेल. त्यानंतर (मला :) ) उपलब्ध वेळेनुसार निष्कर्ष जाहिर केले जातील.
ज्यांना सर्वेक्षणात भाग घ्यायची इच्छा नाही, त्यांनी हे प्रश्न स्वतःच्या मनाला विचारावेत आणि स्वतःपुरता काय तो आरसा धरावा. मात्र कृपया २५ डिसेंबरच्या आधी याप्रश्नांवर अशी जाहीर चर्चा करू नये ज्यामुळे लोकांना प्रामाणिक उत्तरे देणे कठीण जाईल किंवा त्यांच्या उत्तरांवर प्रभाव पडेल.
चला तर सुरू करूया! ज्यांना सर्वेक्षणात भाग घ्यायचा आहे त्यांनी यापुढील प्रश्नांची उत्तरे मला व्यनीतून कळवायची आहेत
===============
सर्वेक्षणपूर्व समज: तुम्ही 'जात' अजिबात मानत नाही असे तुम्हाला वाटते का?
अ. होय
ब. नाही
बेटी व्यवहारः
१. तुम्ही विविहीत असल्यास तुम्ही आंतरजातीय विवाह केला आहे काय?
अ. होय
ब. नाही
क. गैरलागू (अविवाहीत)
२. तुम्ही अ. लग्नेच्छुक असल्यास ब. 'अरेन्ज्ड मॅरेज' असल्यास क. केवळ तुमच्या वैयक्तीक निर्णयावर लग्न ठरेल अशी मुभा असल्यास तुम्ही तुमच्या जातीबाहेरच्या जोडीदाराला प्राधान्य द्याल का?
अ. होय
ब. नाही
क. सांगता येत नाही
ड. गैरलागू (सध्या एका विवाहबंधनात आहे)
ई. जातीच्या तथाकथित उतरंडीवर आमच्यापेक्षा उच्च जात असेल तरच चालेल
३. तुम्ही अ. लग्नेच्छुक असल्यास ब. 'अरेन्ज्ड मॅरेज' असल्यास क. केवळ तुमच्या वैयक्तीक निर्णयावर लग्न ठरेल अशी मुभा असल्यास तुम्ही तुमच्या जातीबाहेरच्या जोडिदाराचा विचार कराल का?
अ. होय
ब. नाही
क. सांगता येत नाही
क. गैरलागू (सध्या एका विवाहबंधनात आहे)
ई. जातीच्या तथाकथित उतरंडीवर आमच्यापेक्षा उच्च जात असेल तरच चालेल
४. तुम्ही अ. लग्नेच्छुक असल्यास ब. 'अरेन्ज्ड मॅरेज' असल्यास क. तुमच्या कुटुंबाच्या एकत्रित निर्णयावर लग्न ठरेल अशी परिस्थिती असल्यास तुम्ही जातीबाहेरच्या जोडिदाराचा विचार कराल का?
अ. होय
ब. नाही
क. सांगता येत नाही
क. गैरलागू (सध्या एका विवाहबंधनात आहे)
ई. जातीच्या तथाकथित उतरंडीवर आमच्यापेक्षा उच्च जात असेल तरच चालेल
५. जर ३/४/५ प्रश्नांपैकी एकाचे उत्तर जातीबाहेरच्या जोडिदाराचा विचार करणार नाही / काही अटींसहीत करू असे असेल तर तसे का?
अ. रोजच्या व्यवहारातील सवयी प्रत्येक जातीत वेगळ्या असतात.
ब. खाण्याच्या सवयी जातीनुसार बदलतात.
क. आम्हाला शेवटी याच समाजात रहायचे आहे. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही हो पण मग लोक आम्हाला बाजूला सारतील
ड. इतर
ई. गैरलागू
६. जर तुमच्या अपत्याने अ. स्वेच्छेने आंतरजातीय विवाह करायची इच्छा व्यक्त केली ब. अरेन्ज्ड मॅरेज करायचे असेल तर तुम्ही आंतरजातीय जोडीदार शोधायला परवानगी देऊन त्या प्रक्रियेत स्वतः सहभागी व्हाल का?
अ. होय, आनंदाने
ब. होय पण नाखुशीने
क. परवानगी देऊ पण स्वतः प्रक्रीयेत सहभागी होणार नाही
ड. नाही
७. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानूसार दोघांपैकी एक जोडीदार अनुसुचित जाती किंवा जनजातींपैकी असेल तर अपत्यास आरक्षण मिळू शकते. या कारणास्तव तुम्ही स्वतः अनुसूचित जातीपैकी नसूनही जोडीदार अनुसुचित जाती किंवा जनजातींचा असला तर चालेल का?
अ. नाही
ब. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाशी संबंध नाही, तसेही चालेल
क. असा जोडीदार शोधायला जाणार नाही पण या निकालामुळे आता मिळाला तर चालेल असे वाटते
ड. गैरलागू (स्वतः त्या जातीतला असल्याने)
ई. इतर
८. जातीच्या उतरंडीवर स्वतःच्या जातीपेक्षा वरच्या जातीचा जोडिदार चालेल का?
अ. होय
ब. नाही
क. गैरलागू (सध्या एका विवाहबंधनात आहे)
रोटी व्यवहार
९. तुम्ही घरी जेवण करायला एखादी व्यक्ती ठेवलीत तर त्या व्यक्तीची जात / धर्म विचारात घेता का?
अ. होय
ब. अजिबात नाही
क. जात नाही पण धर्म घेतो
ड. धर्म नाही पण जात घेतो
१०. जर प्र क्रं ९ चे उत्तर 'ब' नसेल तर, तसे का?
अ. हरेक जाती/धर्माशी निगडीत अशा माझ्या काही स्वच्छतेच्या कल्पना आहेत.
ब. काही जाती / धर्माच्या व्यक्ती सामिष भोजन करतात जे आमच्या घरी वर्ज्य आहे
क. माझ्या कुटुंबियांपैकी काहिंचा अजूनही जातींच्या उतरंडीवर / शिवाशिवीवर विश्वास आहे. त्यांची मने दुखवायची माझी इच्छा नाही
ड. जेवणातून 'संस्कार / विचार' झिरपतात असा माझा समज आहे
ई. इतर
फ. गैरलागू (प्र. ९ चे उत्तर ब)
११. हॉटेलात जाताना तुम्ही मालकाची जात बघता का?
अ. होय.
ब. नाही.
क. सहसा नाही.
ड. सहसा होय.
१२. तुम्ही तुमच्या लहान अपत्याला सांभाळायला एखाद्या पाळणाघरात ठेवत असाल किंवा एखाद्या व्यक्तीला तुमच्या घरी ठेवत असाल तर तुम्ही त्या व्यक्तीची जात/धर्म बघता का?
अ. होय
ब. अजिबात नाही
क. जात नाही पण धर्म घेतो
ड. धर्म नाही पण जात घेतो
१३. जर प्र क्रं १२ चे उत्तर 'ब' नसेल तर, तसे का?
अ. हरेक जाती/धर्माशी निगडीत अशा माझ्या काही स्वच्छतेच्या कल्पना आहेत.
ब. काही जाती / धर्माच्या व्यक्ती सामिष भोजन करतात जे आमच्या घरी वर्ज्य आहे. त्याव्यक्तीने माझ्या अपरोक्ष माझ्या अपत्याला तसे भोजन दिलेले मला चालणार नाही.
क. सतत सोबत असणार्या व्यक्तीकडून काही 'संस्कार / विचार' झिरपतात असा माझा समज आहे. मला इतर धर्माचे किंवा जातीचे विचार माझ्या अपत्यावर झालेले नको आहेत.
ई. इतर
फ. गैरलागू (प्र. ९ चे उत्तर ब)
इतर व्यवहार
१४. समजा तुमचे एखाद्या व्यक्तीशी भांडण झाले तर तुम्ही त्या व्यक्तीला जातीवरून हिणवता किंवा शिव्या देता का?
अ. होय, बहुतांश वेळा
ब. क्वचित पण होय
क. अजिबात नाही
१५. एखाद्या व्यक्तीची वर्तणूक खटकली किंवा तुमच्यापेक्षा वेगळी वाटली तर तुम्ही त्याचा संबंध (किमान मनातल्या मनात) त्या व्यक्तीच्या जातीशी लावता का?
अ. होय, बहुतांश वेळा
ब. क्वचित पण होय
क. अजिबात नाही
१६. जातींचा आणि आर्थिक परिस्थितीचा, शिक्षणाचा संबंध आहे असे तुम्ही मानता का?
अ. होय, बहुतांश वेळा
ब. क्वचित पण होय
क. अजिबात नाही
१७. जातींमुळे काही व्यक्तींना शिक्षणापासून, नोकर्यांपासून, बढतीपासून वंचीत रहावे लागते असे तुम्हाला वाटते का?
अ. होय, काही वेळा
ब. होय, अनेकदा
क. अजिबात नाही
ड. बढतीमध्ये नाही, बाकी होय
ई. शिक्षणात नाही, बाकी होय
फ. इतर
सर्वेक्षणानंतर आरसा: तुम्ही जात अजिबात मानत नाही असे तुम्हाला वाटते का?
अ. होय
ब. नाही
===============
वाचने
10946
प्रतिक्रिया
64
मिसळपाव
प्रतिक्रिया
जर एखादा जात मनत नसेल तर
यात फरक आहे. जात मानणे / न
In reply to जर एखादा जात मनत नसेल तर by बाळ सप्रे
इथे "जात मानतो का?" याचा अर्थ
In reply to यात फरक आहे. जात मानणे / न by गवि
प्रश्नकर्त्याच्या प्रश्नाच्या
In reply to इथे "जात मानतो का?" याचा अर्थ by ऋषिकेश
हम्म.. बरोबर म्हणताय.
In reply to प्रश्नकर्त्याच्या प्रश्नाच्या by बाळ सप्रे
बायनरी उत्तर नसते म्हणूनच ..
In reply to हम्म.. बरोबर म्हणताय. by गवि
+१
In reply to बायनरी उत्तर नसते म्हणूनच .. by बाळ सप्रे
सहमत
In reply to बायनरी उत्तर नसते म्हणूनच .. by बाळ सप्रे
छान कल्पना आहे
In reply to बायनरी उत्तर नसते म्हणूनच .. by बाळ सप्रे
ऋषिकेश, उपक्रम चांगला आहे. पण
बरोबर आहे, सगळ्या समाजाचे हे
In reply to ऋषिकेश, उपक्रम चांगला आहे. पण by सस्नेह
शिवाय
In reply to ऋषिकेश, उपक्रम चांगला आहे. पण by सस्नेह
हे लिखाण जातिवाचक लिखाण या
आदरणिय पैसाजी
In reply to हे लिखाण जातिवाचक लिखाण या by ५० फक्त
ओ भौ
In reply to आदरणिय पैसाजी by खटासि खट
असं झालं का ?
In reply to ओ भौ by पैसा
+१ तसंही काल रात्रीपर्यंत वेळ
In reply to ओ भौ by पैसा
जाती व्यवस्था > जाती भेद > जाती-द्वेष...
व्यक्तिशः
इन्व्हेस्टमेंट अॅडव्हाईस.
In reply to व्यक्तिशः by इरसाल
माहित नाही
पोटजात?
In reply to माहित नाही by पैसा
हाहाहा!
In reply to पोटजात? by नितिन थत्ते
लो कल्लो बात!
In reply to पोटजात? by नितिन थत्ते
कोकणस्थाच्या दृष्टीने कोकणस्थ हे ब्राह्मण
In reply to पोटजात? by नितिन थत्ते
हे कोकणस्थ लोक
In reply to माहित नाही by पैसा
अरे ए
In reply to हे कोकणस्थ लोक by Nile
आमी काय करावं?
या पाहनीचा निकाल कवा वाचावा बरं?
In reply to आमी काय करावं? by तर्रीबाज
जातीपाती संबंधित धागे मिपावर
निवडणु़कीतली घोषणा
हौ ना जी!
In reply to निवडणु़कीतली घोषणा by विकास
ह्म्म... ज्यांच्या
In reply to निवडणु़कीतली घोषणा by विकास
हाण्ण!
In reply to ह्म्म... ज्यांच्या by मृगनयनी
+१
In reply to हाण्ण! by दादा कोंडके
आपले आई-वडील, भाऊ-बहीण,
In reply to ह्म्म... ज्यांच्या by मृगनयनी
अरे रे !!!
In reply to आपले आई-वडील, भाऊ-बहीण, by llपुण्याचे पेशवेll
पंचमातल्या राहूचा विचार करावा का ?
In reply to ह्म्म... ज्यांच्या by मृगनयनी
प्रणयस्थानातला राहू या
In reply to पंचमातल्या राहूचा विचार करावा का ? by रामदास
ह्म्म... ज्यांच्या
In reply to ह्म्म... ज्यांच्या by मृगनयनी
पूर्ण सहमत!!!! (चक्क)
In reply to ह्म्म... ज्यांच्या by सुहास..
@ सुहास.. इयर एन्डिन्ग'ची
In reply to ह्म्म... ज्यांच्या by सुहास..
जातीत किन्वा जातीबाहेर लग्न
In reply to ह्म्म... ज्यांच्या by मृगनयनी
यार,
त्यांना वाट्टेल ते करून मोकळे होतात.
In reply to यार, by आनंदी गोपाळ
मी जातीच्या पलीकडे गेलेलो आहे
आर्य आणि आर्यवंश वैग्रे
In reply to मी जातीच्या पलीकडे गेलेलो आहे by निनाद मुक्काम …
एखाद्याचा धाग्याने शतक पार
In reply to आर्य आणि आर्यवंश वैग्रे by बॅटमॅन
च्यायला !
In reply to एखाद्याचा धाग्याने शतक पार by निनाद मुक्काम …
ऋ, तुझा वेळ जात नाहीये का?
आंतरजातीय लग्नाला विरोध नसल्याचे लक्षात येते
असे वाटत नाही
In reply to आंतरजातीय लग्नाला विरोध नसल्याचे लक्षात येते by पंकज
शाळाप्रवेशापासून
'जात' हा क्लॉज काढला की
In reply to शाळाप्रवेशापासून by सस्नेह
जोपर्यंत बौध्दिक, आर्थिक,
मला थोडे अधिक सांगायचे
इतिहास
In reply to मला थोडे अधिक सांगायचे by दीपा माने
मुलाला माहित नसलेली जात शाळेत कळ्ली.
..शिर्के..
In reply to मुलाला माहित नसलेली जात शाळेत कळ्ली. by अनन्न्या
हो..
In reply to ..शिर्के.. by गवि
हो.. आठवण आली शाळेची खूप त्या
In reply to हो.. by अनन्न्या
नावावरुन धर्म अन आडनावावरुन जात..
आभार!
निकालातूर
In reply to आभार! by ऋषिकेश