Skip to main content

जेम्स बाँडचं पडद्यावरचं अर्धशतक..

लेखक नानबा यांनी शुक्रवार, 18/01/2013 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
१८८० साली पहिल्या मोशन कॅमेर्‍याचा शोध लागल्यापासून जगात कित्येक सिनेमे बनले असतील. विविध विषय, माणसं, प्रेम, भय, युद्ध, विनोद प्रत्येक क्षेत्रात सगळ्या भाषांमध्ये हजारो सिनेमे आले, त्यांनी आपापल्या काळात लोकांवर अधिराज्य सुद्धा केलं असेल. पण एक काल्पनिक कॅरॅक्टर, जे फक्त कादंबरी रुपाने अस्तित्वात होतं, त्याने मात्र सिनेमात आल्यापासून गेली ५० वर्षे लोकांच्या मनावर अक्षरशः मोहिनी घातलीये, तो म्हणजे जेम्स बाँड. जेम्स बाँडचा जन्मदाता इयान फ्लेमींगला कधी स्व्प्नातसुद्धा वाटलं नसेल आपलं कारटं इतकं प्रसिद्ध होईल. आपली पहिली कथा लिहिताना त्याच्या मनात जेम्सबद्दल काही वेगळीच मतं होती.

ड्रॅगनच्या देशात १७ – यांगत्से क्रूझ : व्हाईट एंपरर सिटी, कुतांग गॉर्ज व शेनाँग स्ट्रीम

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शुक्रवार, 18/01/2013 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== ड्रॅगनच्यादेशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६...

बार का लावतात ?

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 17/01/2013 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
इमारतीतल्या जिन्याच्या कोपर्‍यात २-३ जोरदार पिचकार्‍या मारून मग "तंबाखू का खातात?" असे विचारल्यासारखा हा काथ्या आहे. पण काय आहे नं जर विचारलं नाही तर उत्तर कधीच कळणार नाही. तेव्हा विचारतोच. खूपदा या प्रश्नास सामोरे जावे लागते की "भारतातले पुरूष बार का लावतात?" मी बरेचदा, व्यक्ती आणि तिचा कल पाहून "विरंगुळा" हे उत्तर देऊन वेळ मारुन नेतो. तर काहींना सांगतो की "वयात आल्यानंतर मुलांनी बार लावायचाच" अशी परंपरा आहे. मग पुढचा प्रश्न येतो "काहीकाही बायका पण बार का लावतात?" आणि मी निरुत्तरसा होतो. पण काही मित्र मैत्रिणी हे जवळचे असतात.

निरक्षर

लेखक संजय क्षीरसागर यांनी गुरुवार, 17/01/2013 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
कधीही न भेटणार्‍या, पण जिवलग मित्रांची ही स्टोरी. न भेटता (किंवा भेटण्याची शक्यता नसताना) ते जिवलग कसे झाले? ...असले प्रश्न विचारायचे नाही. तो भेटणारच नाही म्हटल्यावर ‘मी येड्यासारखा चालतोय कशाला’? नाही, नाही ते पण विचारायच नाही.... फक्त वाचायच. _________________________________ मुक्कामाचं ठिकाण ठाऊक नाही पण चालयच,... वेड्यासारखं चालायच. आजूबाजूच्या गर्दीला जुमानतय कोण? उन्हातान्हातून वणवण त्यात सावली कुठली बोंबलायला ? आपलीच पावलं म्हटल्यावर झक मारत चालणारच आणि पावलं चालतायत म्हटल्यावर रस्ता न सरून सांगतोय कुणाला? अरे एक सांगायच राहिलं, वाळवंटातनं चालायच....फार मजा येते.

थुक्का का लावतात?

लेखक नाना चेंगट यांनी गुरुवार, 17/01/2013 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
रामायण वाचल्यानंतर "रामाची सीता कोण?" असे विचारल्यासारखा हा काथ्या आहे पण काय आहे नं जर विचारलं नाही तर उत्तर कधीच कळणार नाही. तेव्हा विचारतोच. रस्त्यात खूपदा या प्रश्नास सामोरे जावे लागते की "माणसं, व्यवहारात थुक्का का लावतात?" मी बरेचदा , व्यक्ती आणि तिचा कल पाहून "पद्धत" हे उत्तर देऊन वेळ मारुन नेतो. तर काहींना सांगतो की "व्यवहारात विश्वासानंतर थुक्का लावयची" परंपरा आहे. मग पुढचा प्रश्न येतो "माणसं विश्वास का ठेवतात?" आणि मी निरुत्तरसा होतो. पण काही मित्र मैत्रिणी हे जवळचे असतात मग त्यांना सविस्तर सांगतो की अर्थशास्त्राच्या तत्वज्ञानानुसार, व्यापारात अनेक प्रकारचे व्यवहार असतात.

लाईफ ऑफ पाय : मला भलताच आवडलेला चित्रपट

लेखक विसुनाना यांनी गुरुवार, 17/01/2013 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणजे काय आहे की - या समस्त जगातील कोणत्याही गोष्टीचे, वस्तूचे अथवा प्राणीमात्राचे समिक्षण करण्यास मी एक अत्यंत नालायक मनुष्य आहे (हेही समिक्षण त्यात आले असावे.) याचे कारण असे की एखादी गोष्ट /वस्तू / प्राणीमात्र मला आवडले की भलतेच आवडते आणि वाईसे वर्सा. मग त्यात उडदामाजी असलेले काळे-गोरे मला दिसत नाही.

सोलर मॅक्सिममच्या वातावरणावर होणार्‍या परीणामांबाबत

लेखक चैतन्यकुलकर्णी यांनी बुधवार, 16/01/2013 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
सोलर मॅक्सिममच्या वातावरणावर होणार्‍या परीणामांबाबत आपल्याकडे वर्तमानपत्रे व सरकारकडून कोणतीच माहिती दिली जात नाही. वस्तुतः सध्याच्या काळात वातावरणावर परीणाम करीणारी महत्वाची बाब म्हणून समोर येत असताना सरकार जनतेला स्पष्टपणे सांगताना दिसत नाही. मध्य-पश्चिम भारत, विषेषत: महाराष्ट्र, कर्नाटक भागात दर १० वर्षांनी दुष्काळाचे नवीन चित्र सामोरे येत असताना, सरकारने याविषयी संशोधन करून जनतेला त्याबाबत सावध करायला पाहिजे.

स्त्रीस श्रद्धांजली

लेखक सांजसंध्या यांनी बुधवार, 16/01/2013 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
डिसेंबर मधे बलात्कार झालेल्या एका आठ वर्षाच्या मुलीचं टाकून दिलेलं प्रेत मिळाल्याची बातमी नुकतीच वाचनात आली, पाठोपाठ लखनौजवळच्या गावात ट्रेनमधे सामूहिक बलात्कार करून विवाहितेला झाडाला फाशी दिल्याची बातमीही ! अशा दोन चार ओळीच्या अनेक बातम्या दिसू लागल्या..
काव्यरस

प्रकाशन सोहळा..

लेखक प्राजु यांनी बुधवार, 16/01/2013 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, नमस्कार, माझ्या सगळ्या मित्रमैत्रीणींना कळविण्यात अत्यंत आनंद होतो आहे की, माझी आई प्रख्यात लेखिका सौ. मंजुश्री गोखले, हीच्या २५ व्या पुस्तकाचे म्हणजेच, "ओंकाराची रेख- जना" या कादंबरीचा प्रकाशन सोहळा, शुक्रवार दि. १८ जाने २०१३ रोजी, संध्याकाळी ५.०० वाजता, चित्तरंजन वाटिका, मॉडेल कॉलनी, पुणे.. येथे संपन्न होणार आहे. आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती.