Skip to main content

माझ्या कुतुहलाची दीनगाथा!

लेखक आनन्दिता यांनी मंगळवार, 22/01/2013 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
आजतागायत मानवप्राणी जे काही साध्य करू शकलाय ते त्याच्या 'कुतुहल' या गुणामुळेच, असं अनेक विचारवंत म्हणतात. पण माझा मात्र यावर काडी इतकाही विश्वास नाही. खरंतर माझा 'विचारवंत' या जातीवरच विश्वास नाही. मुळात डोक्यावरचं जंगल अन दाढीचे खुंट अस्ताव्यस्त वाढवून लोकं विचारवंत होतातच कशाला?? हा प्रश्न मला नेहमी पडतो.हे असले अवतार करून लोकांची टरकवण्यापेक्षा स्वत:च्या डोक्याला अधून मधून 'कंगवा' दाखवून ते 'विंचारवंत' का होत नाहीत ? हे माझं आपलं एक कुतूहल आहे. असो...

स्वरमग्न - उस्ताद अमजद अली खाँ (१/२)

लेखक मूकवाचक यांनी मंगळवार, 22/01/2013 23:05 या दिवशी प्रकाशित केले.
amjad-ali-2 हिंदुस्थानी अभिजात संगीताची लोकांवर 'जादू' होते, याचं एक महत्वाचं कारण आहे - या संगीतात असणारी लोकसंगीताची झलक. एक परिष्कृत ('सॉफिस्टिकेटेड') तरीही सरळ, साधी, सच्ची स्वररचना. या संगीतात असे कित्येक 'शास्त्रीय' प्रकार आहेत ज्यात थक्क करून टाकणार्‍या चमत्कृती आणि अगाध सौंदर्य आहे.

भारत रत्न पूनम ताई पांडे आणि प्रतिक्रिया!

लेखक चिखल्या यांनी मंगळवार, 22/01/2013 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
(लेख इतरत्र पुर्व-प्रकाशित) या देशाला वस्त्रहरणाची प्राचीन परंपरा लाभली आहे. युद्धात विजय मिळाला कि एकतर स्वतःचे तरी कपडे काढायचे नाहीतर दुसर्याचे ओढायचे ही महान शिकवणूक इतिहासाने आपल्याला दिली आहे. महाभारतात विजयी उन्मादात द्रौपदीचे वस्त्रहरण योजिले होते, पण तो बेत फसला. असो, महाभारत आपला विषय नाही. आता काळ बदलला आणि पुनमताई पांडे यांनी वस्त्रहरण स्वतःच करायची संधी साधली. इथे द्रौपदीच तयारीतच बसलेली असल्यामुळे देवांना त्रास नाही झाला. नशीब त्यांचं. भारत विश्वचषक जिंकल्यानंतर काही विघ्नसंतोषी लोकांमुळे तो बेत एकदा फसला, पण ही बाई हार मानायला तयार नव्हती.

सुनिता

लेखक सुबोध खरे यांनी मंगळवार, 22/01/2013 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
ही १९८७ च्या हिवाळ्यातील गोष्ट आहे.हि १०० % सत्य घटना चक्षुरवै सत्यं आहे मी कमांड हॉस्पिटल पुणे मधल्या अति दक्षता विभागात २४ तासाच्या आपत्कालीन कामाला(emergency) होतो. साधारण रात्री ११ वाजता बाह्य रुग्ण विभागातून(casualty) एक बेशुद्ध रुग्णाला थेट अतिदक्षता विभागात आणले.त्याच कोणताही आगापिछा माहित नव्हता. वय साधारण २३-२४ असेल .अंगावर पँट शर्ट आणि स्वेटर.

लैंगिक शिक्षणाचे व्यावहारीक महत्त्व

लेखक शुचि यांनी मंगळवार, 22/01/2013 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
एक मुद्दा मांडायचा प्रयत्न करते - आम्हाला जेव्हा शाळेत लैंगिक शिक्षण मिळालं तेव्हा फक्त "मासिक धर्म" या विषयावर सांगीतले गेले. अजूनही भारतात तीच स्थिती आहे की आता गुप्तरोग/ एडस आदि रोगांची माहीतीदेखील सांगीतली जाते? कारण चित्रपट, कादंबर्‍या आदिंमधून सहजीवनाअची एक इमेज निर्माण केली जाते जी अतिशय रोझी असते, खरं तर वास्तवापासून दूर असते. सततच्या भूलभुलैय्याच्या भडीमारामुळे , हार्मोनल बदलांमुळेदेखील मुलामुलींचे मन भरकटू शकते. शाळा/ विद्यालयांमधून वास्तवाची जाण करुन देण्याचे किती प्रयत्न होतात? वास्तव म्हणजे 'सेफ सेक्स" काय, "लो रिस्क बिहेव्हिअर" कशाला म्हणतात.

कर्नाटक मंदिर भ्रमंती(हळेबीड-बेलूर-शृंगेरी इ.)

लेखक लई भारी यांनी मंगळवार, 22/01/2013 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
मंदिर भ्रमंतीच म्हटली पाहिजे कारण आमच्या वास्तुविशारद परम मित्रांनी आखलेल्या ह्या ट्रीपमध्ये बहुसंख्य देवळांचा समावेश होता; तरी मी नाराजी दर्शवल्यामुळे शेवटी आटोपते घ्यावे लागले. :) २७ डिसेंबरला सकाळी आम्ही निघालो NH4 ने दावणगिरीच्या दिशेने. थेट रानीबेन्नुरला थांबलो जेवणासाठी, तोपर्यंत ३ वाजून गेले होते. मेन रोडवरच स्टॅंडच्या पुढे डाव्या बाजूला छोटीशी खानावळ आहे - 'बसवेश्वर खानावळी'. ज्वारीची भाकरी आता इथून पुढे ४-५ दिवस मिळणार नाही याची कल्पना असल्याने २ घास जास्तच गेले! :) इथून पुढे आमच्याकडे होता तो मित्राच्या वडिलांनी आखून दिलेला मार्ग आणि कर्नाटकचा नकाशा(कागदावरील, online नव्हे)!

वन्ही तो चेतवावा रे .....

लेखक विटेकर यांनी मंगळवार, 22/01/2013 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
॥ श्रीराम समर्थ॥ वन्हि तो चेतवावा रे.......... www.samarthramdas400.in महाराष्ट्रदेशीं संताचा महान वारसा आहे. भागवत संप्रदाय, नाथ संप्रदाय, महानुभाव संप्रदाय अशा अनेक समॄद्ध परंपरा आहेत. सर्व प्रकारची आस्मानी आणि सुल्तानी संकटे पचवून या साऱ्या परंपरा महाराष्ट्रात आणि भारतवर्षात केवळ टिकूनच नव्हे तर दिवसेंदिवस वर्धिष्णु होत आहेत, हे महाराष्ट्राचे परम भाग्यच! असाच एक प्रखर संप्रदाय - रामदासी संप्रदाय!

मनाचिये गुंती..

लेखक यशोधरा यांनी मंगळवार, 22/01/2013 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
जीवनाचा अनादि, अनंत प्रवाह, त्यातून तुमच्या आमच्या ओंजळीत येणारे काही क्षण. कधी रेशीमलडींसारख्या उलगडणार्‍या तर कधी धारदार पात्यासारख्या लखलखणार्‍या जाणिवा. अवतीभवतीच्या जगातले आपणच लोक आपापल्या परीनं एकमेकांची सुखदु:खं वाटून घेत असतो, साथसंगत करत असतो, नातीगोती जपायचा मनापासून प्रयत्न करत असतो.

मनमुक्त

लेखक समयांत यांनी मंगळवार, 22/01/2013 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
परिधान केलेला घनक्लांत तो, मनमुक्त बोल उधळत आहे.. जीवाच्या काहिलीने मी शोधत राहतो त्याच्या घनविभोर परिश्रांतीसाठी युगुल युक्त नजारा.... पण दाटून येतो निव्वळ विरहनियुक्त किनारा.. ;) त्याच्या भेटीच्या असोशीने..... n
काव्यरस

अहमदाबाद मध्ये पुणे

लेखक रमेश आठवले यांनी मंगळवार, 22/01/2013 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यनगरी हि तेथील पुणेरी (खाष्ट ?) पाट्या साठी प्रसिद्ध आहे. हे लोण आता अहमदाबाद पर्यंत पोचले आहे असे वाटते. नुकतीच Times ऑफ इंडिया मध्ये छापलेली चार उदाहरणे उद्धृत करत आहे. १. शहराच्या मध्यभागात भद्र म्हणून एक विस्तार आहे. पुरातत्व विभागाने त्याची रक्षित स्थानांमध्ये गणना केली आहे. तेथील एका ४०० वर्षे जुन्या गणेश मंदिराबाहेर असा फलक लावला आहे. --मन्दिराच्य्या कोठेही शाखा नाहीत. भाविकांनी फसवणूक होऊ देऊ नये. २. एका लस्सीच्या दुकानाबाहेर मालकांनी वाटर कुलर बसवला आहे आणि त्याच्या शेजारी असा फलक लावला आहे. - शेजारच्या दुकानात दाबेली खाणार्यांनी या कुलरचे पाणी पिऊ नये. ३.