Skip to main content

सिटीबसमधले नाट्य

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 04/02/2013 06:15 या दिवशी प्रकाशित केले.
सिटीबसमधले नाट्य प्रवासी: आपलं हे एक द्या हो. कंडक्टर (वैतागून): हे म्हणजे काय? प्रवासी: अहो हे म्हणजे तिकीट द्या. एक सर्पोद्यान द्या. कंडक्टर: काय नागाचा नाच बघायला चालला वाटतं? प्रवासी: नाही हो. हे आपलं.. कंडक्टर: मग काय नागाला दुध पाजायला चाललात वाटतं? प्रवासी: नाही नाही. तसं काही नाहीये. कंडक्टर: मग तेथे नागाला तेथेल्या पाळणाघरात सोडायला चालले वाटतं? नाही म्हणजे पिशवी बरीच मोठी दिसतेय. गारूडी दिसताय अगदी. (कंडक्टर "मन डोले मेरा तन डोले मेरा दिलका गया खयाल..." या चालीवर नाचतो. प्रवासीही त्यात सहभागी होतो.) प्रवासी (भानावर येत): अहो नाही हो.

शाळा - दहावी.

लेखक तर्री यांनी रविवार, 03/02/2013 19:47 या दिवशी प्रकाशित केले.
10th ची exam declare झाली. आयुष्यातला beautiful period खल्लास. Fundoo मजा केली शाळेत. बंटीची बॉडी उतरली, तरी बरे बंटीने ९ वीत सिगारेट सोडली. मला पण जाम कंटाळा येतो आजकाल सिगरेटचा. पमी कधी कधी कंपनी देते, पण ली भित्री आहे, चोरून चोरून ओढते. पमी पहिली टायगरची compass होती. त्यानेच तिला सिगरेट ओढायला लावले. साला तिला घेवून सिनेमेक्स ला morning show जायचा. टायगर च्या बापूची transfer झाली , कोण म्हणतो uncle ला हाकलले. तो साला पाहिजे होता १० वीत. टायगरला रोबर्टपण घाबरायचा. Science period ला रोज पमी ला घेवून बसायचा बाजूला. कधी कायपण बोलला नाय रोबर्ट त्याला. तशी पमी सहावीतच upgrade झाली होती.

घोरणारा प्राणी

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 03/02/2013 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
बहुतेक परिवारात एखादा तरी घोरणारा प्राणी असतोच.. साथीदाराच्या घोरण्यामुळे तुमच्या झोपेचे खोबरे होत असेल तर त्याकडे तुच्छतेने दुर्लक्ष करू नका, घोरणे हे फक्त श्वासोच्छ्वासांतील अनियमितता नसून ते संभाव्य मोठ्या विकारांचे मूळ असू शकते. असे वाचण्यात आले.. इंग्लंड मध्ये तर नवरा जोरात घोरतो त्या मुळे घतस्फोटा पर्यँत प्रकरण गेले असे वाचल्याचे स्मरते.. एकदा लग्न घरात रात्री झोपण्याचा भयानक अनुभव घेतला.. सीमांत पूजन झाले कढिभाताचे जेवण तब्ब जेवून " भट्ट जेवुनि तट्टची फुगले" अशी अस्वस्था होती.....

किवी - अवकादो आईसक्रीम.....

लेखक दिपक.कुवेत यांनी रविवार, 03/02/2013 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
आईसक्रीम....लहानांनपासून म्हातार्या-कोतार्यापर्यतचा एक आवडता प्रकार. आईसक्रीम न आवडणारा बहूधा विराळाच. आता तर काय सगळ्याच गोष्टी सहज मिळतात पण लहानपणी मिळालेल्या प्रत्येक गोष्टीच अप्रुप असायच...त्यातलच एक आईसक्रीम. समुद्रावर मनसोक्त खेळल्यावर भेळ, शेवपुरी किंवा कधी कधी भाजलेलं मक्याचं कणीस हे तर असायचंच पण सांगता शेवटी आईसक्रीमनेच व्हायची. हि उत्सुकता / ओढ शेवटी घरी फ्रिज आल्यावर संपली.

वेडी आशा अनुदानाची -

लेखक विदेश यांनी रविवार, 03/02/2013 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
आशा मोठी वाईट असते कुणालाच ती सोडत नसते - पाऊसधार भुलवुन जाते धरा कोरडी पहात असते... गोठ्यामधली वैरण संपुन गुरेढोरे विकून झाली - डोळ्यामधल्या पाण्यामध्ये शिळीच भाकर भिजून गेली... दुष्काळाचे पडता सावट शासन सारे झोपी जाते - बळीराजाची वेडी आशा अनुदानाची वाट पहाते ! .
काव्यरस

वळवून मान तिने .मधाळ का हसावे?

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 02/02/2013 22:09 या दिवशी प्रकाशित केले.
वळवून मान तिने .मधाळ का हसावे? वेडे मन हे ,त्यात त्याने का फसावे ? कधी हो कधी नाही नेमके काय समजावे? कधी हसणे कधी रडणे तिचे तिलाच ठावे गुलाबी जिवणी.,का करावे विभ्रमी चाळे ?? होतो जीव चोळा मोळा, हे तिला का न कळे?? वेळी अवेळी भेटणे,वाट निसरडी,वय कोवळे कसे समजवू तिला ,मन मुळापासून उन्मळे खवळला तो सागर, सुटले पिसाट वारे तरी लोटतेस होडी वादळात ,हे आहे का बरे ?? अविनाश

हिंसा आणि अहिंसा...

लेखक श्रावण मोडक यांनी शनिवार, 02/02/2013 19:46 या दिवशी प्रकाशित केले.
मोहनदास करमचंद गांधी यांच्यासंदर्भात दोन-तीन धागे गेल्या काही दिवसांत मिपावर चर्चेत आले आहेत. काही गोष्टी ठळकपणे लक्षात आल्या. धाग्यांवरील चर्चेत काही जण गांधी यांच्या अहिंसावादाचे समर्थक आहेत. बाकी काही जण त्याचे विरोधक आहेत. ते असो. जे अहिंसेचे विरोधक आहेत, त्यांच्या मांडणीतून काही गोष्टी मला जाणवल्या (हे माझे आकलन, समज वगैरे आहे): १. गांधींनी मांडलेली अहिंसा ही एक प्रकारे कमजोरीच असते, तो भ्याडपणा असतो. २. गांधींची हत्या समर्थनीय ठरू शकते, कारण नथुराम गोडसे यांची (यांची, याची नव्हे) तशी राष्ट्रविषयक, मातृभूमीविषयक धारणा होती. ३.

आई

लेखक शुचि यांनी शनिवार, 02/02/2013 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
काल रात्री मैत्रिणीबरोबर "आई" या अथांग विषयावर खूप गुज बोलून झाले. सकाळी उठले तेच हुंदका गळ्यात दाटून. या विषयावर एक तर लिहाल तितके कमी आहे शिवाय कविता हा माझा प्रांत नाही. पण जे काही खरडले ते गोड मानून घ्यावे. आशा करते कवितेमागील भावना पोचतील. संस्कार, त्याग, गर्भाशय, ऊब, दिलासा, अंगाईगीत, उन्हात वणवणताना मिळालेली शीतल सावली व झुळूक सवयी, व्यक्तीमत्त्वाची जडणघडण आणि हो प्रार्थनादेखील. नाळ, रुजलेली पाळंमूळं व दाटून आलेला हुंदका सुद्धा या सार्‍या गोष्टींचा , लहान प्रेमळ देव आणि त्याला जोडलेले हात. माझं भलं तिला लागो, तिचं वाईट मला मिळो.
काव्यरस

नजीक किनारे

लेखक कौस्तुभ आपटे यांनी शनिवार, 02/02/2013 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
नजीक किनारे येता कैसी नावच बुडते रे पैशाच्या फुंकरीने जळते सुर्य विझती रे कसा पाऊस होतो छोटा अन पैसा होतो मोठा हे व्यस्त प्रमाणी अवघड मज ना समिकरण सुटते रे..... त्यांनी भुर्रकावे लोणि मी ताकच का प्यावे दुखणे ऐसे ठणकत रहाते , अवघड जागीचे ही खोड जीत्याची रे, त्या मरण कसे यावे. इथे हरल्या पोथ्याही, गीता,गाथा , ओव्याही. कसा मोहासाठी विवेक आपला गहाण पडतो रे नजीक किनारे ... गंजुन गेली शरपंजरी तरी विरक्ती ना आली जीव अडकला सत्तेसाठी मरणही वेशीशी ही शर्यत सत्तेची इथे अट ना अंताची, त्यां भय ना पापाचे दानव वा देवांचे जरी गर्दन मारा तरी अशांची शेपुट फडफडते नजीक किनारे ... गीत - कौस्तुभ