Skip to main content

(मी कॉपी केली नाही, मी पेस्टही केले नाही)

लेखक अमोल केळकर यांनी मंगळवार, 12/02/2013 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
खुप दिवसांनी काही ओळी सुचल्या आणि ते ही कॉपी पेस्ट न करता . अस्सल स्वतःच्या .
काव्यरस

पाच आदमी... एक उस्सल... और पाव नही... ?

लेखक तुमचा अभिषेक यांनी मंगळवार, 12/02/2013 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
"चल ए छोटूss त्या तीन नंबरवर फडका मार... ए बब्बन, त्या दोन पोरी केव्हाच्या बसल्यात बे, ऑर्डर घे ना बेटा त्यांची... हा बोलो साब..??", "एक चिकन हंडी... पार्सल", मी मेनूकार्डवर नजर न टाकताच ऑर्डर केली. "बस..." बस? च्यायला ह्याला काय पडलीय आम्ही एक डिश मागवू नाहीतर दहा.. गुमान ऑर्डर घे आणि निघ ना.. पण त्याचीही काही चूक नव्हती. आज वर्षाची अखेरची रात्र होती, ३१ डिसेंबर.. सारे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, रस्त्यावरील चायनीजच्या गाड्या देखील हाऊसफु्ल होत्या. लोक फॅमिलीच्या फॅमिली घेऊन घराबाहेर जेवायला पडले होते. तिथे माझ्या एका चिकन हंडीच्या ऑर्डरवर त्याची प्रतिक्रिया अगदीच अनपेक्षित नव्हती.

खजूराची चटणी ..(पाणी पुरीसाठी)

लेखक स्मिता चौगुले यांनी मंगळवार, 12/02/2013 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: १) खजूर (बिया काढून) २) चिंच (जेवढे खजूर घ्याल त्याच्या १/४, जास्त आंबट नको) ३) गूळ (खजूराच्या १/२) ४) चाविपूरत मीठ आणि लाल तिखट ५) चिमूटभर हिंग (हिंगाने चटणीला छान वास येतो) कृती - वरील सर्व साहित्य एका पसरट भांड्यात घेवून पाण्याबरोबर जवळपास २०-२५ minutes मंद आचेवर शिजवावे जेणेकरुन खजूर आणि चिंच एकदम मऊ शिजून निघतील. थंड झाल्यानंतर mixer मधून बारीक करून घ्यावे...आणि आवश्यक तेवढे पाणी मिसळावे . झाली खजुराची चटणी तयार. जास्त झाली तरी Refrigerator मध्ये ठेवू शकता, बरेच दिवस टिकते सॉस- जॅम सारखी. पाणी पुरी, भेळ पुरीच्या गाड्यावर, गोड चटणी म्हणून वापरतात ती हीच चटणी असते

कच्च्या पपईची कोशींबीर / सॅलेड

लेखक दिपक.कुवेत यांनी मंगळवार, 12/02/2013 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
Salad साहित्यः १. किसलेला कच्चा पपई - १ मध्यम (चित्रात दाखवल्यापेक्षा अजुन बारीक किसता/चीरता आला तर उत्तम) २. १/२ लिंबाचा रस ३. वरिल लिंबाचीच किसलेली साल - १/२ चमचा ४. सुख्या लाल मिरच्या - २/३ (भरडसर वाटुन) किंवा ओल्या लाल मिरच्या - २ बारिक चीरुन ५. खारे शेंगदाणे मुठभर (सालं काढुन १/२ करुन) ६. चवीनुसार मीठ, साखर किंवा मध ७. कोथिंबीर / पुदिना एच्छिक (बारिक चीरुन) कॄती: १.

आयुष्य राजयोगी (तरही गझल)

लेखक जयवी यांनी मंगळवार, 12/02/2013 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य राजयोगी,उपभोगता न आले माझे असून “माझे” संबोधता न आले आभाळ पापण्यांना सांभाळता न आले मज दोन आसवांना हुलकावता न आले राशी अनेक होत्या गाठीस पातकांच्या गंगेस पाप सारे स्वीकारता न आले बरसात तू सुखाची, केली सदैव देवा झोळीच फाटकी मज सुख झेलता न आले जखमा असंख्य होत्या अन्‌ वेदना पुरेशा वणव्यास का मनाच्या सुलगावता न आले सोडून दूर सुख मी दु:खात चूर झाले दु:खातल्या सुखाचे "सुख" टाळता न आले जयवी - जयश्री अंबासकर
काव्यरस

बुद्धी आणि मन….

लेखक स्मिता चौगुले यांनी मंगळवार, 12/02/2013 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
बुद्धी आणि मन…. आपल्या अंतरी नेहमीच अस घडत असत बुद्धी आणि मनाचं बरयाचदा पटत नसत एकदा असंच त्याचं पटेनास झाल या ना त्या कारणावरून सारखच भांडण होवू लागल भांडता भांडता बुद्धीने घेतला पवित्रा नि दुषणे लावत बोलू लागली मनाशी असा कसा रे तू नेहमी वागतोस .. स्वप्नांच्या दुनियेतच का तू राहतोस स्वप्न आणि सत्य यातील फरक तुला कधी कळणार जादूनगरीतून अखेर बाहेर तू कधी येणार मान्य..

आणखी एक टायटॅनिक

लेखक लॉरी टांगटूंगकर यांनी मंगळवार, 12/02/2013 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या वर्षीची गोष्ट आहे, जानेवारीचा दुसरा पंधरवडा.. मुळचा मुंबईचा रहिवासी असलेला केविन रिबेलो समुद्रात अर्धवट बुडालेल्या अजस्त्र धुडाकडे आशेने बघत बसला होता...कोणत्याही क्षणी रेस्क्यू टीम आपल्या भावाला , रसेल ला घेऊन येईल या आशेत गेला आठवडा तसाच काढला होता.”या क्रुझ असाइनमेंट मधून चांगले पैसे मिळतील, थोड्याच वेळचा प्रश्न आहे” असे त्याच्या भावाचे क्रुझवर जाण्याच्या आधीचे शब्द त्याला आठवत असावेत...रेस्क्यू टीमला आता कोणी जिवंत असण्याची शक्यता वाटत नव्हती... दुसरीकडे सर्वत्र अपघाताच्या बातम्या टी.व्ही.

हिंदी चित्रपट सृष्टीचा "प्राण"

लेखक jaypal यांनी मंगळवार, 12/02/2013 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
prN जेष्ट अभिनेते श्री. प्राण सिकंद याचा ९२ वा वाढदिवस.(जन्म १२/०२/१९२०). या बुलंद अभिनेत्या बद्दल मी काय लिहीणार? आपली तर लेखणी बंद. त्यांना मिपा परिवारा तर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा. मिपाकर मित्रांना विनंती करतो की त्यांना आवडलेल्या प्राणसाहेबांच्या भुमिका, अनुभव फोटो ई. चर्चा / शेअर करावेत. प्राण यांच्या कारकिर्दीचा आढावा

थँक्यू डॉक्टर देशमुख

लेखक रामबाण यांनी मंगळवार, 12/02/2013 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
मना कधी नव्हे ते २-३ तास खूप रडली. आत्ताच झोपी गेल्याचं अंजलीनं सांगितलं. तिचं रडणं थांबत नव्हतं. विजयसोबत अंजली मनाला एका प्रथितयश डॉक्टरकडे दाखवून आलेली. विजय त्याच्या मुलीला त्याच डॉक्टरकडे घेऊन जायचा.म्हटलं बरं झालं, लहानांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करुन उपयोग नाही. त्या डॉक्टरीनबाईनं मनाला कसलं तरी इंजेक्शनही दिलं होतं. त्या गुंगीतच ती कदाचित रात्रभर झोपली असावी. मी सकाळीच ऑफीसला निघून गेलो. त्यावेळेस मोबाईल सर्वसामान्यांच्या हातात यायचा होता. त्यामुळे घरी टचमधे राहण्याचा प्रश्नच नव्हता.

आठवणीतले ग्रीस - भाग ३

लेखक nishant यांनी मंगळवार, 12/02/2013 05:23 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ दिवस दुसरा: सकाळी लवकरच जाग आली. नाश्ता उरकुन १० च्य सुमारास बाहेर पडलो आणि Acroplois च्या पायथ्याशी पोचलो. टेकडी खाली तिकिटघरात २ तिकिटे घेतली आणि चढायला सुरवात केली. वर चढायला चांगला रस्ता आहे, त्यामुळे चढाई सोपी असली तरी ऊन प्रचंड जाणवत होते. जागोजागी दिसत होत्या उत्खननात सापडलेल्या वस्तु, कुठे मातीची भांडी, कुठे दगडावर केलेले नक्षीकाम, कुठे मार्बलच्या कमानी. या सर्वांमधील उठुन दिसणारे म्हणजे, Dionysus Eleuthereus चा रंगमंच.