Skip to main content

जालावर खेळ चाले, हा गूढ.....

लेखक अधिराज यांनी गुरुवार, 21/02/2013 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
डिसक्लेमर: हि एक विडंबित कविता आहे. ह्या द्वारे कोणाच्याही (डूआयडी धारक,डूआयडी समर्थक आणि डूआयडी विरोधक) भावना दुखविण्याचा अथवा खतपाणी घालण्याचा हेतू नाही.
काव्यरस

राष्ट्रभक्त हिटलरला

लेखक अनिकेतदळवी यांनी गुरुवार, 21/02/2013 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
हिटलरचा इतिहास माहीत नसताना फक्त त्याने युद्धात केलेला संहार आणि ज्युंची केलेली कत्तल म्हणून त्याला शिव्या देणारे भरपूर जण आहेत. जर आपल प्रभुत्व गाजवायच असेल तर प्रथम त्या लायकीच व्हाव लागत आणि हिटलरने तेच केल.मी हिटलरने महायुद्धात नेमक काय जिँकल होत तेच सांगतो-: 1) फ्रान्सकडुन व्हर्सायच्या तहान्वये गेलेला RHINELAND प्रांत सार प्रांत, AUSTRIYA हा 70 लाख लोकसंख्येचा प्रदेश, त्याचप्रमाणे झेकोस्लोवहाकिया, हंगेरी हे देश फक्त धमकीच्या जोरावर रक्ताचा एकही थेंब न गाळता त्याने युद्धाआधीच मिळवले. 2) पोलंडचा तीन आठवड्यात फडशा पाडुन पोलंड मिळवला. 3) 15 दिवसात डेन्मार्क आणि नाँर्वेच्या राजांना बि

टाळ बोले माझ्य मनीं -

लेखक विदेश यांनी गुरुवार, 21/02/2013 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
टाळ बोले माझ्या मनीं नाद करी मृदुंग कानीं चिपळ्यातुनी येई ध्वनी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल || हाती झेंडा नाचवुनी स्मरण होई गजरातुनी नामाचा जप मुखातुनी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल || डोईवरी तुळशीवृंदावनीं पावलांच्या ठेक्यातुनी टाळ्यांच्या तालातुनी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल || भक्तीच्या या वाटेवरुनी जाऊ सगळे आनंदुनी गाऊ सगळे दंग होउनी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल || देहभान अपुले हरपूनी नाचू रंगूया कीर्तनी म्हणू सगळे वारीतुनी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल || .
काव्यरस

निघाली खाशी हो स्वारी ...

लेखक विदेश यांनी गुरुवार, 21/02/2013 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
निघाली खाशी हो स्वारी दुष्काळी त्या दौऱ्यावरी संगे घेउनिया लवाजमा फौजफाटाही तो भारी तिकडे नाही की पाणी कोरड्याच साऱ्या विहिरी संगे घेउनिया बिस्लेरी ट्रकमधे भारी भारी खाण्याला नाही बाजरी ना दाणा ना भाकरी संगे घेउनिया कारभारी कुशल सैपाकी आचारी डोईवर छत्री ती धरी सोबतचा चमचा कुणीतरी संगे घेउनिया गालीचा पायघडी ती कुणी अंथरी निघाली खाशी ती स्वारी पहा हो विमाने ती वरी संगे घेउनिया सामग्री दुष्काळी त्या दौऱ्यावरी ! .
काव्यरस

नकोच शिवबा, जन्म इथे तू पुन्हा कधी घेऊ -

लेखक विदेश यांनी गुरुवार, 21/02/2013 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
नकोच शिवबा, जन्म कधी तू पुन्हा इथे घेऊ कर्तव्याची नाही जाणिव, जयघोषातच दंगुन जाऊ नाही येथे कुणी जिजाऊ- शिकवण्यास बाळा म्हणती भाऊ तरि ते टपले दाबण्यास रे गळा , येथ जाणती बळ एकीचे जरी सर्व लोक गडबडती स्वबळावर जगण्या कोपऱ्यात नेक - शिवबा, तुजसाठी जगणारे संपले मर्द मावळे आता उरले येथे सारे संधीसाधू डोमकावळे , पायपोस तो कुणास नाही उरला कुणाचा आता सत्तेसाठी केवळ सारा आटापिटा पहाणे आता ! जन्मलास जरी आता शिवबा, इथल्या तू भूवरी सिंहासन तव तुजसाठी नुरले हपापलेले भारी ऐकू येते डरकाळी शिवबाची नुस्ती सगळीकडे फलकावर झळकणे ध्येय तुजवाचुन नेत्याचे इकडे म्हणतो आहे जो तो येथे, मी शिवबाचा अनुयायी खुर्ची
काव्यरस

युद्धकथा ६ - न पुसला जाणारा कलंक - २

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 21/02/2013 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
युद्धकथा -६ न पुसला जाणारा कलंक! (१)युद्धकथा -६ न पुसला जाणारा कलंक! (१) " प्रशासकांच्या वतीने मी आपले स्वागत करतो ! आपण येथे सुट्टीवर आलेला नसून कामासाठी आपल्याला येथे आणण्यात आलेले आहे हे कृपया ध्यानात ठेवा. ज्याप्रमाण आमचे सैनिक आघाडीवर तिसर्‍या राईशच्या विजयासाठी आपले प्राण अर्पण करत आहेत त्या प्रमाण नवीन युरोपसाठी तुम्हाला येथे काम करायचे आहे. ते कसे करायचे हे तुम्हावर अवलंबून आहे. आम्ही तुमची काळजी घेऊ व केलेल्या कामाचा मोबदलाही देऊ.

शनिवारवाडा (भाग १) : इतिहास

लेखक सव्यसाची यांनी गुरुवार, 21/02/2013 08:37 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षांपूर्वी ग.ह.खरे लिखित 'शनिवारवाडा' हे पुस्तक वाचनात आले. शनिवारवाड्याची कादंबऱ्यांमधून केलेली वर्णने त्या लेखकांनी कुठून मिळवली हा एक प्रश्न मला सतावत होता. या प्रश्नाचे उत्तर पुस्तकातून मिळाले. ग.ह.खरे यांनी पेशवे दफ्तरातील सात रुमाल वाचून शनिवारवाड्यावरील हे पुस्तक तयार केले होते. त्यांच्यानुसार हे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. या पुस्तकात इतिहास आणि अवशेष वर्णन यांचा समावेश आहे.

'काव्य ' कविता स्टोअर्स Pvt . Ltd .

लेखक फिझा यांनी गुरुवार, 21/02/2013 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
'काव्य ' कविता स्टोअर्स Pvt. Ltd. * सुख दु:खाचे किरकोळ व घाऊक विक्रेते * मी : हा ....गुड मॉर्निंग मन ...कसं काय रात्री झोप लागली का गोडावून मध्ये ..... मन : हा होय मालक .....पण न्हाई इतकी ..... मी : घे च्या ....दुकानात कसं माणसानं जरा फ्रेश ऱ्हावं ...... मन: होय घेतो की .... गिऱ्हाईक : राम राम शेटजी ... मी :हा ...राम राम ..आज ...काय काम काढलंत ? गिऱ्हाईक : दु :खं द्या जरा नवीन ....... मी : ए मन्या ,,ती भारी दु :खं आन रं इकडं .... हे घ्या ...एकदम बेश्ट माल ..... गिऱ्हाईक : आत्ता कसं .........कितीला हे सगळं .... मी :अडीचशे फक्त !! गिऱ्हाईक : आवं काय सांगता राव .....

माफीनामा

लेखक विकास यांनी गुरुवार, 21/02/2013 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
रंगीत/भगवा वगैरे दहशतवाद हा विषय आता चावून चावून चोथा झाला आहे. त्यामुळे या चर्चाप्रस्तावाचा त्याच विषयावर तीच चर्चा करण्याचा उद्देश नाही... पण आज जे काही मा. गृहमंत्री श्री. सुशीलकुमार शिंदे यांनी जे काही १८० अंशाची फिरकी दाखवली ती पाहून अचंबा वाटला...

जालियनवाला बाग हत्याकांड आणि भारत- ब्रिटन संबंध

लेखक बाळकराम यांनी गुरुवार, 21/02/2013 05:06 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन सध्या भारताच्या दौर्‍यावर आहेत. मे २०१० मध्ये सत्तेवर आल्यानंतर लगेचच केलेल्या भारत दौर्‍यानंतर अवघ्या २-२.५ वर्षातला हा ब्रिटिश पंतप्रधानांचा दुसरा दौरा. १४० व्यापार आणि उद्योग प्रतिनिधींचे ब्रिटनच्या आजवरच्या इतिहासातले हे सर्वात मोठे व्यापारी शिष्टमंडळ त्यांच्यासोबत आहे. अर्थात, मागच्या प्रमाणे ह्याही दौर्‍याचा उद्देश उगवती महासत्ता असलेल्या भारताबरोबर व्यापारी संबंध दृढ करुन काही व्यापारी करारमदार करता येतील का ते पाहाणे हाच.