Skip to main content

शंका निरसन.

लेखक गणपा यांनी शुक्रवार, 22/02/2013 19:38 या दिवशी प्रकाशित केले.
"आई, तू HIV पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?" भर रस्त्यात चालताना लेकीने आईला विचारले. अनपेक्षीत ठिकाणी, अनपेक्षीत प्रश्न विचारलेला असला तरी लेकीच्या चेहेर्‍यावर चिंता स्पष्ट दिसत होती आणि त्याचच नाही म्हटलं तरी आलेलं हसू दाबत आई म्हणाली "निगेटिव्ह." तिचा जीव काहीसा भांड्यात पडला. मग पुढचा प्रश्न "HIV पॉझिटिव्ह म्हणजे काय?" "HIV.. Human immunodeficiency virus हा एक प्रकारचा व्हायरस आहे.

कठोर (पण सभ्य) टिका कशी करावी ?/ करतो ?/ करतात ?

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 22/02/2013 18:15 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, हा मिपावर मी सुमारे ५ वर्षांपुर्वी काढलेला चर्चा धागा . पाच एक वर्षे उलटून गेली आहेत तेव्हा चर्चेचा अजून एक राउंड करुन पाहू , या वेळी विकि हे टार्गेट नाही मिपाच राहू देऊ, 'रचनात्मक टिका कशी स्विकारावी' (How to accept constructive criticism) आणि 'रचनात्मक टिका कशी करावी' (How to do constructive criticism) या बद्दल आंतरजालावर इंग्रजी भाषेत बरच मार्गदर्शन उपलब्ध दिसत, पण कठोरतेचा टच कसा द्यावा या बद्दल फारशी माहिती वाचण्यास मिळाली नाही.

अध:पतन

लेखक खटासि खट यांनी शुक्रवार, 22/02/2013 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
चंद्रकांत, माझ्याशी लग्न करशील ? नाही मधू.. आपला फक्त हनीमून होऊ शकतो. असले जोक्स एकमेकांना सांगणे ही हाईट असलेल्या काळातल्या झंपूतात्यांच्या हातात ती आमंत्रणपत्रिका पडताच ते तीनताड उडाले. हल्ली उडण्यात नवलाई अशी राहीलीच नव्हती. परवा रणछोडदास वाण्याच्या अमेरिकेतल्या मुलीने लग्न न करताच तसंच कुणाबरोबर रहायला सुरूवात केल्याची बातमी कानी पडली तेव्हां पण ते असेच उडालेले. रणछोडदास मात्र अरे बाबा त्येला लीव्ह इन रिलेशनशिप म्हणतेत, इटस लीगल असं कसंनुसं हसत सांगत होता. याच सज्जन गृहस्थानं याच पोरीचा देशी मित्र खालच्या जातीचा होता म्हणून त्याला गायब केल्याचं बोललं जात होतं.

प्रतिसादांची कविता !!

लेखक फिझा यांनी शुक्रवार, 22/02/2013 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
प्रतिसादांची कविता !! ‘आवडलेली ‘ कविता फार आवडली ! शेवटची ओळ जास्त भावली ! कल्पना आहे मस्त ! वाचतांना ४ जिलेब्या केल्या फस्त ! ..............." धन्यवाद !!!!" ‘ खूप आवडलेली ‘ Best ! super like !

माणूस

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 22/02/2013 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
खगांचे थवे, पाखरे ही निरागस काय कसे रज, कण संचिताचे थकेनात पंख, खळे ना भरारी रिते मोकळे सोस, निळ्या अंबराचे न हेवे न दावे, न साठे कशाचे हवेसे नितळ, पारदर्शी उसासे ढळे दिवस कोरा, रात्र आणि काळी जगाची तमा ना, असे खेळ सारे माणूस मी, भूक, व्याधी उपाधी मुळी मूढ ईर्षा, अंध, अंग जाळी परा, बुद्धी-प्रज्ञा, असूनी उपाशी अवकाळ मोठा, सदा मोह पाशी .........................अज्ञात
काव्यरस

संसद: बजेट सत्र २०१३

लेखक ऋषिकेश यांनी शुक्रवार, 22/02/2013 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
याआधी आपण २०१२ च्या हिवाळी अधिवेशनात काय प्रस्तावित होते, काय झाले याचे वार्तांकन इथे वाचले. काल, २१ फेब्रुवारी २०१३ पासून बजेट सत्र सुरू झाले आहे. अर्थातच या सत्रात वित्तविषयक घडामोडींना प्राधान्य दिले जाते असा पायंडा आहे. यातील काही ठळक प्रस्तावित विधेयके अशी आहेतः १. रेल्वे बजेट २०१३-१४ २. सर्वसाधारण बजेट २०१३-१४ ३. इन्शुरन्स आणि पेन्शन मध्ये थेट परकीय गुंतवणुकीच्या योजनेत बदल करणारी विधेयके ४. अन्न सुरक्षा बिल ५. फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट (सुधारणा) विधेयक आणि द कंपनीज् बिल जी.एस.टी.

....बर...!!!

लेखक फिझा यांनी शुक्रवार, 22/02/2013 07:32 या दिवशी प्रकाशित केले.
......बर .....................!! गर्दी जमलीये कसलीतरी बघू बघू काय झालं ... "अगं धरपडशील कुठेतरी मुली …..हो मागं तू ....." ......बर .....................!! बाई मी सांगू ,मी सांगू ... जमलंय मला ….. “आलंय तुला उत्तर तर शांत बस , बाकीच्यांना विचार करू दे जरा ......” ......बर .....................!! व्वा मस्त पाऊस पडतोय सगळे चाललेत भिजायला ....... “हे बघ.... मुलीच्या जातीनं जास्त उंडारु नये ... बस ….वाचत काहीतरी ......” ......बर .....................!! हेही नाटक मीच लिहिलंय ...सर यावेळी एखादा रोल पण करेन म्हणते .... "good good .....

यावे दुर्गपूजेला..!-शिवाजी ट्रेल

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 22/02/2013 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
......गेल्या वर्षी मी शिवाजी ट्रेल या संघटने बद्दल माहितीवजा लेखन इथे केलं होतं... http://misalpav.com/node/20831 ... तसा दरवर्षी नवा गड असतो..पण गेल्याच वर्षी क्षिरसागर सर(शिवाजी ट्रेलचे प्रमुख आणी सर्व काही...) म्हणाले होते,की हा गड अतिशय दुर्लक्षित आणी विषेश निधि न मिळालेला असल्यानी याचं काम २/३ वर्ष चालेल...त्यामुळे गेल्या वर्षीच्या धाग्याची लिंक मुद्दामच डकवली आहे...कारण या वर्षीही तोच किल्ला आहे...

नूतन - एक सुंदर स्वप्न.

लेखक नानबा यांनी गुरुवार, 21/02/2013 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
आज २१ फेब्रुवारी, हा ज्येष्ठ हिंदी अभिनेत्री नुतनचा स्मृतीदिन. आजच्याच दिवशी १९९१ रोजी नुतनने या जगाचा निरोप घेतला.