Skip to main content

रेशिमगाठी

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 26/02/2013 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
ती व्याकुळ होउन गाते भावार्त, निरागस गाणी तरुण व्यथांची अन् मनस्मरणीवर जपते विस्मरली नावे विरलेल्या शपथांची ती केविलवाणे हसते भरल्या डोळ्यांच्या रित्या करून पखाली दंव जसे फिकटते, विरते सुकतात आसवे तशीच थबकुन गाली ती अलिप्त होउन लिहिते कधि तिचीच असुनी नसते अशी कहाणी वाचून मनाशी म्हणते 'इतकी अगतिक का असते कुणी दिवाणी?' भिरभिरत एकटी फिरते भंगून विखुरल्या स्वप्नांच्या वाटांनी फिरफिरुन रोज सावरते घरकूल कैकदा विस्कटले लाटांनी मुखवटे कितीक घडविते लावून वर्ख ती फसव्या हास्यासाठी हट्टाने बांधत बसते तुटल्या नात्यांच्या सुटल्या रेशिमगाठी

वीर सावरकर

लेखक Dhananjay Borgaonkar यांनी मंगळवार, 26/02/2013 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
आज स्वा.सावरकरांची पुण्यतिथी. २६ फेब्रुवारी १९६६ रोजी वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांचे मुंबई येथे निधन झाले. राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना सावरकरानी सुरु केली.पुढे त्याचे रुपांतर अभिनव भारत या संघटनेत झाले. सावरकर जातीभेद नष्ट करण्यासाठी सुद्धा खुप लढले. हिंदुत्व ही संज्ञा त्यांनीच तयार केली. हिंदुत्वाविषयीचे त्यांचे विचार आजही अत्यंत प्ररणादायी आहेत. सावरकरांनी ११ वर्षे काळ्यापाण्याची शि़क्षा भोगली. तुरुंगात असताना त्यांनी अनेक महाकावव्ये लिहिली. १९२१ साली त्यांची तुरुंगातुन सुटका झाली. त्यानंतर ते हिंदु महासभेचे अध्य़क्ष अनेक वर्षे होते.

एक शांत क्षण

लेखक ई-पूर्वाई यांनी मंगळवार, 26/02/2013 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
या साऱ्या कोलाहालाचा फक्त ‘समय’ एकटाच ‘गवाह’ आहे, ’Technology’ च्या महापुरात बुडाला जनप्रवाह आहे. ‘T.V’ च्या त्या अखंड भट्टीत संस्कारांची वानवा आहे, अन ‘internet’ च्या मायाजालाचा मोह हर मानवा आहे. घरच्यांपेक्षा ‘Facebook – friends’ शी बोलणाऱ्यांची वाहवा आहे, आणि सदैव ‘messengers’ वर ‘chat’ करणारा आजचा जमाना नवा आहे. या साऱ्या जंजाळात हरवला माणुसकी चा गारवा आहे, अन ५००+ ‘FB friends’ असले तरी एकटेपणा जीवा आहे. या प्रचंड कल्लोळातून एक तरी शांत क्षण हवा आहे, आपसांतल्या उदासीनतेवर तीच एक ‘दवा’ आहे.

मतदान पध्दत

लेखक NiluMP यांनी मंगळवार, 26/02/2013 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
देशाचे प्रतिनिधित्व राजकारनी करतात हे मान्य पण मतदान करून नेता निवडून देणे ही पध्दत चुक की बरोबर. माझया मते चुक आहे कारण १ मतदान पध्दतीमुळे व्होटबॅंक ही समस्या निर्माण झाली २ व्होटबॅंकमुळे शहरे बकाल झाली आणि अनैतिक धंदे वाढले ३ अनअधिकृत बांधकामे वाढून भ्रष्टाचार वाढला ४ राजकीय घराणेशाही जोर धरू लागली ५ कायदा आणि सुव्यवस्था हतबल झाली तसेच, टिव्हीवरील रिअल्टी शो आणि मतदान यातील फरक टिव्हीवरील रिअल्टी शोमध्ये आपण प्रथम परर्फामन्स पाहतो आणि मग मतदान करतो आणि मतदान प्रक्रियेत आपण प्रथम मतदान करतो जेथे परर्फामन्सची काहीच गॅंरंटी नसते तुम्हाला काय वाटते?

मी बाई होते म्हणुनी .. भाग -०४

लेखक ५० फक्त यांनी मंगळवार, 26/02/2013 07:48 या दिवशी प्रकाशित केले.
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०१ http://www.misalpav.com/node/23333 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०२ http://www.misalpav.com/node/23439 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०3 http://www.misalpav.com/node/23664 तिच्या नजरेतली शांतता थोडीशी विस्कटलेली होती. किंचित गर्वानं भारलेला तिचा आवाज मला ऐकु आला ' क्षत्रिय' ....

असेही...

लेखक स्पंदना यांनी मंगळवार, 26/02/2013 05:50 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवार सकाळ! मुलांच्या क्लासेसची वेळ! मी न्याहरीसाठी बटाटेवडे करायला घेतलेले. त्यामुळे माझी सकाळ सोलणे, तळणे अन घोळण्यात आकंठ बुडालेली. "माझी बॅग"," माझे शुज?"," वॉटर बॉटल", अश्या आरोळ्या क्षणाक्षणाच्या अंतराने इंटेन्स होत होत्या. आम्ही दोघे किल्ला लढवण्यात गुंग. अन बघता बघता हे तिघेही बाहेर पडले. मी अजुनही वडे तळत असल्याने ते बाहेर पडल्याचे समजलेच नाही. पण मग घरातली किलबील ( हो! अस म्हणाव लागत. कितीही कलकलाट अन शब्दाशब्दाला वाद फुटत असला तरी मुल जे काही करतात त्याला किलबील अन किती गोऽऽड! असच म्हणायच असत.) बंद झाल्याच जाणवल.

दाग अच्छे होते हैं

लेखक चिखल्या यांनी मंगळवार, 26/02/2013 03:07 या दिवशी प्रकाशित केले.
मला चिखल आवडतो. दाग अच्छे होते हैं जाहिरात पण आवडते. चिखलातले कमळ देवाला चालते पण चिखल चालत नाही. मला देव(आनंद), कमळ आणि भाजपा तिन्ही आवडत नाही. कुंभार चिखलापासून भांडे बनवतो. कुंभाराचे चाक आणि बैलगाडीचे चाक दोन्ही सारखेच वाटतात मला, भांडे फुटतात पण चिखल फुटत नाही. पण माठात पाणी साठवता येते, चिखलात पाणी साठवता येत नाही, डबक्यात पाणी आणि चिखल दोन्ही साठतो, पण लोक डबक्यातले पाणी पीत नाहीत . डबक्यातले पाणी प्राणी पितात असे आई म्हणते. बाबा मला डुक्कर म्हणतात. पण मी माठातले पाणी पितो. आई माठात वाळा टाकते. वाळा वाळलेला नसतो, ओलाच असतो. पण डबक्यात घाण असते आणि चिखलसुद्धा...

आयटीच्या गोष्टी - ऑनसाईट (१)

लेखक धन्या यांनी रविवार, 24/02/2013 01:30 या दिवशी प्रकाशित केले.
आयटीच्या गोष्टी - नमन आयटीच्या गोष्टी - ऑन द बेंच शिक्षण संपलेलं असतं. नोकरीलाही आता जवळपास दोन वर्ष होत आलेली असतात. इथे आता कामात मन लागत नसतं, डोळ्यांना तिकडचे वेध लागलेले असतात. मॅनेजरला तसं आडून आडून सुचवणं चालू असतं. मनात आशा निराशेचा हिंदोळा झुलत असतो. कारण, आयटीत नोकरीला लागल्यानंतर अगदी पहिल्या दिवसापासून ज्या गोष्टीसाठी देव पाण्यात बुडवून ठेवलेले असतात ती गोष्ट वास्तवात उतरण्याची वेळ आलेली असते.

विचारणा व तोड सुचवा

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 24/02/2013 01:16 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो व विशेषतः स्मार्ट मोबाईल व टॅब वापरणाऱ्यांनो, मी एल जी इ 400 स्मार्टफोन वापरतो. त्यात ‘मल्टीलिंग की बोर्ड’ हे ऎंड्रॉईड बेस्ड ऎप वापरून मराठीत ‘इन्सक्रिप्ट’ पद्धतीने लेखन करतो. पण जाड बोटांनी बारीक चौकोनी कीज दाबताना 10 पैकी 4 वेळा नको ती अक्षरे दाबली जातात. मोठ्या आकारात इतर कंपन्यांचे टॅब घेऊन त्यावर टाईप करायला सोईस्कर होते. पण त्यात गैरसोय अशी की ज्ञ, श्री, क्ष अशी युक्ताक्षरे व प्र त्र अशी जोडाक्षरे तुटक्या प्रकाराने दिसतात व विरस होतो. शिवाय ह्रस्व वेलांटी पुढील अक्षरावर पडते. जसे शशकिांत. मित्रांनो, आपण यावर काही तोड सुचवावीत.