Skip to main content

माय मराठीचे श्लोक...!! (ध्वनीफ़ित)

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 28/02/2013 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
माय मराठीचे श्लोक...!!

नमो मायभाषा! जयोस्तुss मराठी!
तुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी
जडो ध्यास हा छंद व्यासंग बोली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

तुझे शब्दलालित्य सूरास मोही
तसा नादब्रह्मांस आनंद होई
सुरांच्या नभी सूरगंगा नहाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

जरी वेगळी बोलती बोलभाषा
अनेकांत एकत्व ही प्राणभाषा
असे भाग्य आम्हां मराठी मिळाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

असा मावळा गर्जला तो रणाला

आठवण

लेखक विदेश यांनी गुरुवार, 28/02/2013 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
तू लाजतेस जेव्हां आठवण लाजाळूची अबोल होतेस जेव्हां आठवण अबोलीची आरक्त होतेस जेव्हां आठवण गुलाबाची मिठीत असतेस जेव्हां आठवण कमलदलाची तू नसतेस तेव्हां - साठवण निवडुंगाची ! .

दगड

लेखक विदेश यांनी गुरुवार, 28/02/2013 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
इकडून एक दगड फेकला तिकडून दगड वर्षाव आला दगडालाही भाव आहे दगडापासून भिती आहे दगडाने डोके फोडतात दगडातून देव घडवतात दगड हाताळावा तरी कसा ज्याचा त्याचा प्रश्न तसा वेळेवर फेकला- जीत आहे वेळ गेल्यावर- फजीत आहे दगडात शहाणपणा नसतो फेकणाऱ्यात नक्कीच असतो दगडांची इमारत का बांधायची दगडांची नुसती रास का रचायची दगडा दगडाची गोष्ट फळली दगड नसेल त्यालाच कळली ! .

शिकवण

लेखक विदेश यांनी गुरुवार, 28/02/2013 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
किनारा स्तब्ध मीही स्तब्ध ! अजस्त्र लाटा लाटामागून लाटा मोठ्या लाटेत लाट लहान लहान लाटेत तिच्याहून लहान.... शेवट एकच , मोठी कोणती अन् लहान कोणती कोण करू शकणार गणती ? रुबाबदार लाट फेसाळणारी येतात परततात विचारलहरी - एकच शिकवण मिळते मनाला तू दिसणार नाहीस नंतर कुणाला ! क्षणभंगुर अस्तित्व होईल पारखे जगून घे छानसे मनासारखे ! .

मोजमापं आणि त्रुटी - १

लेखक राजेश घासकडवी यांनी गुरुवार, 28/02/2013 04:38 या दिवशी प्रकाशित केले.
(आज भारतीय विज्ञान दिनानिमित्त मोजमापं आणि त्रुटी या विषयावर लिहितो आहे. प्रत्येकाला करून बघण्यासारखा मोजमाप करण्याचा प्रयोग आहे. त्यात सहभाग घ्यावा ही विनंती.) आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी मोजतो. मुलाला आलेला ताप थर्मोमीटरने मोजतो. डाएट करत असो वा नसो, अधूनमधून आपलं वजन मोजतो. स्वयंपाक करताना पोळ्यांसाठी कणीक मोजून घेतो. काही वेळा प्रत्यक्ष मोजत नाही, नुसताच अंदाज घेतो. म्हणजे आरशात बघून 'पोट सुटलंय आताशा' असं म्हणतात. किंवा बाहेर पडल्यापडल्या 'काय थंडी आहे' म्हणतो. हे अंदाज घेणं हेही एक प्रकारे मोजमापच असतं.

आठवणीतले ग्रीस - भाग ५

लेखक nishant यांनी गुरुवार, 28/02/2013 04:03 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ दिवस चौथा: 1 * अथेन्स ते सँटोरिनी सकाळी ४.३० लाच हॉस्टेल सोडले, टॅक्सीचा संप अजुन चालुच असल्यामुळे, मेट्रो स्टेशन गाठले.

ये कहां आ गये हम

लेखक रामदास यांनी बुधवार, 27/02/2013 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी भाषा दिनानिमीत्त आणि या प्रतिसादासाठीन्माझी काही टिपणे गविच्या चरणी अर्पण पैसाआजी, आय डिसअग्री बरं का.. अधुनमधून केले यूज इंग्लिश वर्ड्स तर काय इश्यू आहे. मराठी भाषेनेच नव्हे तर कोणत्याही लँग्वेजने नेहमी अडाप्टेबल राहिलं पाहिजे, तरच सर्व्हायवल आहे. इंग्लिश वर्ड्स रोजच्या भाषेत मिंगल झाले आहेतच तेव्हा प्रत्येकवेळी डिक्शनरी घेऊन त्याचं ट्रान्स्लेशन करावं असं मी नाही इन्सिस्ट करणार बुवा.
हे माझे रीसेंट थॉट्स आहेत.

विकसित भारत ?

लेखक जोशमनिष यांनी बुधवार, 27/02/2013 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्याच आठवड्यात मी पद्मालय येथे गाडीवर गेलो होतो. सकाळची वेळ होती. गाडीवरून मी एका छोट्याशा गावाजवळून चाललो होतो. कुठल्याही भारतीय खेडे गावाबाहेर रस्त्याच्या बाजूलाच प्रातर्विधीसाठी बसलेले लोक दिसणे यात आपल्याला नाविन्य / आश्चर्य / खेद वाटत नाही. पण त्यादिवशी मला एक नववधू परततांना दिसली. नवीनच लग्न होऊन आलेली ती चिसौकां मोठ्या बावरलेल्या नजरेने चालली होती. कपाळावर बांधलेल्या मुंडावळ्या व अंगाची हळद नवीन लग्नाची साक्ष देत होते.

आज हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांचा हौतात्म्यदिन

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 27/02/2013 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
आज दिनांक २७ फेब्रुवारी. आजपासून ८२ वर्षांपूर्वी याच दिवशी,हिंदुस्थान समाजवादी प्रजासत्ताकसेनेचे सेनापती हुतात्मा चंद्रशेखर आजाद (चंद्रशेखर सीताराम तिवारी) यांना आल्फ्रेड पार्क, अलाहबाद येथे वीरमरण प्राप्त झाले होते. हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांना त्यांच्या हौतात्म्यदिनी विनम्र अभिवादन.