Skip to main content

ST ची लाल जनिका : जगातील १० वे आश्चर्य

लेखक सुज्ञ माणुस यांनी मंगळवार, 05/03/2013 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
ST ची लाल जनिका : जगातील १० वे आश्चर्य bus ( हे छायाचित्र स्पष्ट दिसत नसेल तर ह्या दुव्यावर टिचकी मारा.: http://sagarshivade07.blogspot.in/2013/01/st.html ) हीच ती वेळ ...आणि हीच ती जागा ...( जेव्हा मी हे छायाचित्र टिपले आणि ) जेव्हा माझ्या मनात आले कि ST चा लाल डबा म्हणजे खरच जगातले १० वे आश्चर्य असावयास हवे. वास्तविक, छायाचित्रात टिपलेली ST

प्रश्न

लेखक तिमा यांनी मंगळवार, 05/03/2013 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
हे यक्षाचे प्रश्न नाहीत. एका सश्रद्ध आदरणीय व्यक्तीने एका विज्ञाननिष्ठाला म्हणजे (माझ्यासारख्या माणसाला) विचारलेले बेसिक प्रश्न आहेत. त्याला मी माझ्या बुद्धीला झेपेल अशी उत्तरे दिली आहेत. संभाषण वैयक्तिक निरोपातून असल्यामुळे आत्तापर्यंत अप्रकाशित आहे. त्यावर चर्चा व्हावी या हेतूने इथे देत आहे. १. मन खंबीर नसेल तर माणसाने अश्या प्रसंगी काय करावे? मन खंबीर नसेल तर माणसाने परमेश्वराचा जरुर आधार घ्यावा. २. विज्ञानाभिमुख होण्याने मन खंबीर होते काय? माझे तरी झाले आहे. ३. कर्मकांड करणार्‍या सर्व लोकांची मने खंबीर नसतात काय? असे मी म्हणणार नाही.

तंदुरी पॉंफ्रेट

लेखक मी_देव यांनी मंगळवार, 05/03/2013 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
खुप दिवसांत तंदुरी पॉंफ्रेट खाल्लेला नव्हता, आणि तंदुरी चिकनप्रमाणे सहजही न मिळणरा प्रकार म्हणून हा घाट..

धावती भेट . . . . गणपती बाप्पाची ! ! !

लेखक पूनम शर्मा यांनी मंगळवार, 05/03/2013 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी शिकवणीला प्रथम शब्द शिकवतात तो “श्री” म्हणून म्हटलं प्रथम लेख लिहावा तो “श्री” चे नाव घेऊनच. आपले म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पा. पूर्वी देवपूजा शास्त्रोक्त पद्धतीने केली जायची परंतु आता मात्र देवदर्शनाचे किंबहुना देवाचेच मार्केटिंग सुरु झाले आहे. गेल्याच आठवड्यात सासू-सासरे मुंबईस आले तेव्हा म्हटलं मुंबई दर्शनाची सुरुवात “श्री” चे नाव घेउनच करू. १२ वा. सुमारास सिद्धिविनायक, दादर येथे पोहोचलो. गाडीतून पाय काढला तोच दुकानाचे मार्केटिंग अधिकारी मागे लागले त्यांचा ससेमिरा चुकवत नेहमीच्याच दुकानात गेलो. बाप्पांसाठी प्रसाद घेतल्यानंतर मंदिराच्या गेट पाशी आलो.

भो पंचम जॉर्ज, भूप

लेखक अत्रन्गि पाउस यांनी मंगळवार, 05/03/2013 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या प्रसिद्ध कवनाची चाल ठाउक आहे का? असल्यास कृपया इथे अपलोड करावी... भो पंचम जॉर्ज, भूप, धन्य धन्य ! विबुधमान्य सार्वभौम भूवरा !

काचेचा लोलक

लेखक सुज्ञ माणुस यांनी मंगळवार, 05/03/2013 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
काचेचा लोलक कळून येता जगण्याची हि इवलीशी त्रिज्या, उडून जाती अत्तरापरी जगण्याच्या मौजा .... दारी नाही फिरकत कुठला नवा छंद चाळा,राखण करीत बसतो येथे सदैव कंटाळा ..... कंटाळ्याचा ..देखील आता कंटाळा येतो ........... अरे...वाजणारा भ्रमणध्वनी कसा काय बंद झाला ????? अरे....त्याला सुध्धा तेच ते गाणे वाजवायचा कंटाळा आला असणार बहुतेक .... मी मात्र उठलो जागेवरून आणि म्हंटले काहीतरी स्वतासाठी केले पाहिजे यार !! रविवार हा छंद जोपासण्यासाठी आयोजित करून ठेवलाय असे वाटले ...लगेच जाणवले कि कित्येक रविवार आपले पाऊलच घरात नाहीये ....

श्रीराम

लेखक अनिल आपटे यांनी मंगळवार, 05/03/2013 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव साठी रामाचे भजन केले आहे पहा तुम्हाला आवडते का श्रीराम विसावले मन माझे श्रीराम चरणी भास मात्र होतो खास माउलींचा मनी राम नाम घेता वाचे काया शुद्ध होई अमृताची गोडी अनुभवास येई वाल्याचा वाल्मिकी झाला राम नाम घेउनी १ नामाचा महिमा आहे अनंत अपार सारी सारी दुखे विघ्ने पळती फार दूर मोक्षं प्राप्ती होते तेव्हा नाम संजीवनी २. दिनांचा दयाळू मनाचा मवाळू तसा माझा सदगुरु नेई पैलपारू सदगुरुसी स्मरता नित्य राम दूर नाही ३. जय श्रीराम
काव्यरस

आठवणीतले ग्रीस - भाग ६

लेखक nishant यांनी मंगळवार, 05/03/2013 04:05 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ दिवस ५ आजचा पहिला ट्प्पा, कामारी समुद्रकिनारा पाहणे आणि तेथे पोचवणारी बस हॉटेल समोरील थांबावर येताच आम्ही त्यात सावर होऊन निघालो..

-पारिजातक -

लेखक फिझा यांनी मंगळवार, 05/03/2013 03:26 या दिवशी प्रकाशित केले.
-पारिजातक - तुझ्या अंगणातली ती फुले, ओंजळ भरून घ्यायचे मी ... तू मात्र ती मोजून बघायचास , आणि त्या खोडावर लिहून ठेवायचास..... मग रागाने फेकून फुले ती, तुझ्याच अंगावर .. मी निघून जायचे .. तशीच ..!! दिवस बदलत गेले, अल्लडपणा संपत गेला ... मग चुकून समोर आलोच; तर अडखळत बोलायचो ... नाहीतर….एरवी नजरही टाळायचो आपण... ..पारिजातक मात्र बहरत राहिला ...तसाच ..!! मग बाबांची बदली झाली तेव्हा, "काहीतरी राहतंय " म्हणून; सामान भरत बसले होते मी ... "त्या " दिवसभर .. आणि तुझ्या घरातला एक दिवा सतत चालू बंद होत होता ...

चला "मायक्रोसॉफ्ट एक्सेल" शिकूया.. (भाग २) - Basics आणि Format Cells

लेखक मोदक यांनी मंगळवार, 05/03/2013 02:30 या दिवशी प्रकाशित केले.
चला "मायक्रोसॉफ्ट एक्सेल" शिकूया.. (भाग १) पहिल्या भागावर मिळालेल्या सर्वांच्या उत्साहपूर्ण प्रतिसादांबद्दल आभार्स. एक सूचना - आपापल्या संगणकावरती एखाद्या सहज सापडणार्‍या ठिकाणी / Desktop वरती एक एक्सेल फाईल तयार करून त्यामध्ये डमी डेटा तयार करून यापुढील सर्व प्रयोग त्यामध्ये साठवून ठेवले तर सर्व संदर्भ लगेचच मिळतील. आज शिकूया एक्सेलच्या काही मूलभूत बाबी. कोणतीही एक्सेल शीट समोर आल्यानंतर पुढील कांही गोष्टी सर्वप्रथम तपासून पाहिल्या गेल्या तर आपल्याला एक्सेलशीट समजण्यास खूप सोपे जाते.