Skip to main content

कवितेचे शिर्षक आहे: मिठी

लेखक जोशमनिष यांनी मंगळवार, 19/03/2013 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
कातर क्षण, अस्थिर मन द्यावे झोकून, तुझ्या मिठीत गुंतता हृदय, निष्काम प्रेममय अविरत लय, तुझ्या मिठीत अनावर प्रीती, ओढ सांगाती प्रेमधारा वर्षति, तुझ्या मिठीत श्वास गुंफले, द्वैत सरले भानही नुरले, तुझ्या मिठीत काहूर थमले, मन सावरले मेघही बरसले, तुझ्या मिठीत आधार भावनिक, बळ आत्मिक आश्वासन प्रेरक, तुझ्या मिठीत

कुणास्तव.. कुणीतरी.. (कथा)

लेखक मी_देव यांनी मंगळवार, 19/03/2013 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
भर दुपारची वेळ. डोक्यावर तळपता सुर्य आग ओकत होता. शिवाने आपला मोर्चा एका वस्तीकडे वळवला. शिवा… मध्यम वयाचा, गरीबीनी गांजलेला इसम. सतत उन्हातान्हात फिरल्यामुळे रापलेला निबर वर्ण, पायात जुनाट स्लिपर्स, अंगात कळकट्ट कपडे, डोक्यावर जीर्ण टोपी, हाताशी मोडकळीला आलेली सायकल, सायकलच्या हॅंडलला दोन्ही बाजूला लटकवलेली गोणती, कॅरियरला बांधेलेली ट्यूब आणि तोंडात ठराविक पद्धतीने घालायची साद “ए भंगार बाटली रद्दीSSSSS” आज काही मनासारखी भंगार खरेदी झाली नव्हती. संध्याकाळी आदिलशेठला काय विकणार, आणि गाठीशी पैसा कसा साठणार हिच चिंता.

घराच्या उंब-याला सांग फिरुनी

लेखक सांजसंध्या यांनी मंगळवार, 19/03/2013 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
घराच्या उंब-याला सांग फिरुनी घराच्या उंब-याशी थांब फिरुनी पुन्हा ती ओळखीची रात येता तिला सोडून येते लांब फिरुनी किती चालून गेले वाट वेडी खुणेचा येतसे का खांब फिरुनी मनी गर्दी कशाला आठवांनो इथे ना हासरी ती रांग फिरुनी थवे गं दाटले या आसवांचे जराशी काजळा तू पांग फिरुनी (*पांगणे) - संध्या १९ मार्च २०१३

जॉली एल एल बी

लेखक जयवी यांनी मंगळवार, 19/03/2013 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
काल सकाळी ह्या सिनेमाबद्दल बोलणं झालं आणि सिनेमा बघायचाच असं ठरलं. तसा आज सिनेमा बघूनही झाला. आवडला !! एक कलाकृती म्ह्णून सिनेमा आवडलाच ! कथानक काही वेगळं नव्हतं खरं तर. नेहेमीचेच गरीबांवरचे अत्याचार आणि कायदा आंधळा असल्याचा फायदा घेणारे धूर्त वकील आणि त्याविरुद्ध लढा देणारा नायक !! सोबत एक छान नायिका, साथ देणारे त्याचे मित्र आणि शेवटी त्याला मिळणारा विजय. अगदी नेहेमीच्याच वळणाने जाणारी स्टोरी. पण तरीही काहीतरी वेगळं होतं !! मला वाटतं, सिनेमा ज्या सहजतेने पुढे सरकत जातो त्यामुळे कथेत पुढे काय होणार हे आधीच समजत असूनही आपण पुढे काय होणार ह्याची वाट बघतो.

अ‍ॅपल / सफरचंदाचे चिप्स

लेखक सानिकास्वप्निल यांनी सोमवार, 18/03/2013 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः सफरचंद दालचिनी पावडर प्रमाण असे नाहीये, आवडीनुसार घ्यावे. . पाकृ: ओव्हन ११० डिग्री सें वर प्री-हीट करून घेणे. सफरचंदाच्या शक्य तितक्या पातळ चकत्या करून घेणे, बीया काढून टाकणे.

पाण्याची परवड ......बापुंची धुलवड

लेखक कच्चा पापड पक्का पापड यांनी सोमवार, 18/03/2013 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
लाखो लिटर पाणी वाया गेले आज. का तर धुळवड खेळायला … जे स्वतःला संत म्हणून घेतात तेच जर असे वागले तर सामान्य आणि त्यांच्या शिष्यानी काय करायचे? ह्या आधी कधीच असे ऐकले नाही. हा सगळा एक publicity stunt वाटतोय. अंधश्रद्धाला पण हे लोक खात पाणी घालत आहेत . का ह्या मागे पण काहि राजकीय षड्यन्त्र आहे? तुम्हाला काय वाटते?

माझी कंपुबाजी

लेखक प्रसाद गोडबोले यांनी सोमवार, 18/03/2013 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
रिकाम टेकडा ** , भिंतीला तुंबड्या लावी | अशी एक आपल्या मराठीत म्हण आहे , आणि आता तर फेसबुकने सगळ्यांनाच फुकट भिंत उपलब्ध्द करुन दिल्याने सगळेच तिला तुंबड्या लावत बसलेले असतात . ( तुंबड्या लावणे म्हणजे नक्की काय हो ? कारण लहानपणी ही म्हण घरात बोललो होतो तेव्हा धपाटे पडले होते { ते ** ह्या शब्दाच्या वापराने पडले असा आमच्या बालमनाने विचार केला होता } ) ते असो . तर आम्ही ही सध्या रिकामटेकडे असल्याने फेसबुकच्या भिंतीला तुंबड्या लावत असतो. तेव्हा आपल्या सारकेच किती जण हे करत आहे हे पाहण्या साठी आम्ही केलेला हा प्रयोग ...

प्रश्न?

लेखक भावना कल्लोळ यांनी सोमवार, 18/03/2013 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
खुप दिवसाने आज आरशात स्वतःला न्याहाळले.चेहरावरच्या सुरकुत्या खुप काही सांगून गेल्या. संसारात रमताना विसरलेल्या आठवणी जागवून गेल्या. डोळ्याखालच्या काळ्या वर्तुळात माझे मी पण दडपले होत. ते शोधताना डोळ्यातुन एक स्वप्न पटकन निसटून गेल होत. नात्याची अनेक रूपे जगताना स्वताला कधी जगले ते आठ्वु लागले. दाट काळ्या मोकळ्या केसातुन तो एक केस पांढरा स्वतःची अनुभूती करवून देऊ लागला. भरलेल्या घरात असुनही का हि एकटेपणाची सल जाणवली. डोळ्यात हजारो स्वप्न असताना शून्यात गेलेली ती नजर आठवली. कधी घेतला होता मी मोकळा श्वास, कधी स्वताला शोधण्याचा हा केविलवाणा ध्यास. आहे सर्वाची मी, पण माझे असे कोण?