सेकंड लाईफ
नमस्कार ! मी योगेश.
ही कथा आहे माझ्या सेकंड लाईफ ची. लहानपणापासूनच मला वाचनाची फार आवड. इतकी मी ठरवूनच टाकले की मोठे झाल्यावर आपण पेपरस्टॉलच टाकायचा. का ? तर धंद्यापरीस धंदा होईल आणि सगळे पेपर, मासिके, दिवाळी अंक फुकटात वाचता येतील. मराठी लेखक वाचता वाचता नंतर कंटाळा येऊ लागला. पुढे पुढे तर मला इंग्रजीतुन मराठीत अनुवादीत झालेल्या कादंबर्याच आवडू लागल्या. त्यातल्या त्यात गुप्तहेरांच्या रहस्यमय कथांनी तर माझ्या मानाची पुरतीच पकड घेतली. त्यातील हेरांचे दुहेरी जगणे मला हळुहळू आवडू लागले.
मिसळपाव
ही अनुश्री, केदार, डॉक्टर रोहित आणि प्रज्ञा या चौघांची गोष्ट आहे.