शरत्काल
शरदाचे चांदणे, मधुवनी फुलला निशिगंध
नाचतो गोपी जनवृंद, वाजवी पावा गोविंद
माणिक वर्माच्या गोड आवाजात हे गाणं ऐकताना
मन हरवून गेलं पण पुन्हा पुन्हा शरदाचं चांदणं शब्दाशी घुटमळत राहिलं.
'शरदाचं चांदणं' हा वाक्प्रचार आपण सहसा विशेष गोष्टींसाठीच वापरतो. त्याच्या उच्चारानेदेखील मन आनंदात न्हाऊन निघतं. अशा या शरद ऋतू विषयी मला उत्सुकता वाटली आणि त्या अनुषंगाने काही काही वाचत
गेले.
मिसळपाव
पहाटे तीन वाजता कोल्हापुरामधला पंचगंगेचा घाट गाठला. त्यावेळी घाटावर लोकांची बरीच गर्दी दिसत होती. सगळ्यात आधी पंचगंगेवरच्या ऐतिहासिक शिवाजी पुलावरून घाट पाहिला, तर अजून लोकांनी तिथं लावलेल्या पणत्यांची संख्या तशी कमीच दिसत होती. इकडे पुलावरून लेसर शो घाटाच्या दिशेने सुरू होता.