निमित्त कॉफीचं
वैभवला कशाचा तरी आनंद साजरा करायचा होता, कसला ते तो मला आधी सांगायला तयार नव्हता. पण त्यासाठी तो मला एका प्रसिद्ध ‘कॉफी शॉप’मध्ये घेऊन गेला.
वैभवने मला हुकूम सोडला. “साधं-सरळ वाच. तुझं उर्दू वाचन इथं आत्ता दाखवायची गरज नाही.”
छे! मला उर्दू वाचता येत नाही. पण ‘जनरेशन नेक्स्ट’च्या या मुलाला आमच्या पिढीची सवय माहिती आहे. हॉटेलमध्ये मेन्यू कार्ड वाचताना आधी उजवीकडची पदार्थाची किंमत वाचायची आणि मग नेमकं काय आपल्या खिशाला परवडतंय याचा अंदाज घ्यायचा ही माझी (आणि माझ्या पिढीतल्या अनेकांची) सवय. वैभवचे आई-बाबा माझे मित्र आहेत.
मिसळपाव
तिथल्या सरदारांनी आपापल्या हवेल्या आता हॉटेल म्हणुन वापरायला सुरवात केल्याने आम्ही शाही पाहुणचार घेत फिरत होतो अस म्हणायला हरकत नाही. तर चितोड मध्ये एका रिक्षावाल्याला मी आपल माझ्या बडबड्या स्वभावानुसार विचारल राजस्थानात त्यांच अस वैशिष्ट्यपुर्ण अस खाणं कोणत? म्हणजे आपली कशी झुणका-भाकर तस काही? तर त्याने सुचवली दाल-बाटी.