Skip to main content

स्वतःशी मी कधीतरी आडमुठा वागतो

लेखक वैभव कुलकर्नि यांनी बुधवार, 24/07/2013 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
लागे कस जीवनाला,तेव्हा कात टाकतो आधाराची काठी म्हणून,हाती रेषा बघतो देवाला ती लाच थोडी,मोठी भीक मागतो दुसऱ्याच्या दुखावर थायथया नाचतो स्वतःशी मी कधीतरी आडमुठा वागतो …………१ ……… कधीतरी स्वतःशीच स्वतःवर त्रागतो देवळात उभा मी प्रसादाला सोकतो नको तिथे उगी उगी शब्द मी ओकतो ओकण्याचे फळ म्हणून प्रसंगही भोगतो स्वतःशी मी कधीतरी आडमुठा वागतो …………२ ……… खोटी स्वप्ने बाळगुनी , बळे शड्डू ठोकतो गळे स्वप्न कधी जर नशिबाला टोकतो पुण्यायीच्या तराजूत पापाला मी जोकतो आयुष्य न कळे मला , जगणेच मुकतो तरी स्वतःशी मी कधीतरी आडमुठा वागतो …………२ ………

मी खरच योग्य केल का?

लेखक saishwari यांनी बुधवार, 24/07/2013 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
जवळ जवळ १५ दिवस झाले मला नोकरी सोडून . पण अजूनही या बाबत मला खात्री नाही. साधारण ३ वर्षांपूर्वी मला हि नोकरी लागली होती. तो काळ मंदीचा होता. नुकत्याच पदवीधर झालेल्यांना नोकरी मिळत नव्हती. ८ महिने नाममात्र पगारावर घासल्यावर हि संधी चालून आली होती. अर्थातच मोठ्या कंपनीतली ही संधी सोडून देण अजिबातच शक्य नव्हत. मुलाखत इथे झाली असली तरी नेमणूक बाहेरच्या राज्यात होती. फक्त ३ दिवसात सगळ ठरलं होत. सुरवातीचे दिवस नवीन शिकण्यात,नवीन ठिकाणी हिंडण्यात गेले, पैशांची चटक लागली होती, सोबतचे लोक अगोदरच पुढे गेले होते त्यामुळे आपण पण त्या शर्यतीत असाव अस वाटत होत.

ऐक स्त्री जन्मा तुझी कहाणी..

लेखक टक्कू यांनी बुधवार, 24/07/2013 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
कसं असतं नाही आमचं असं जगणं, मुलीच्या जन्माचं कोंदणच वेगळं. कोंदणात बसतो एकच हिरा, मात्र सांभाळाव्या लागतात नाना त-हा. मिळतात नवी नाती वयाच्या पंचविशी नंतर, जुळवून घ्यायला शिकावं हेच बेहत्तर. दोन घरांचं जरी भाग्य तिला लाभतं, मन मात्र दोन्हीकडे अडकलेलं राहतं. तिचं मन म्हणजे जणू द्विदली वाल, आत दले दोन पण वरून एकच साल. पाहाणा-याला वाटावे वा काय झालयं एकरुप, डोकावलं कि कळतं आतलं खर बहुरुप. लग्नानंतर तो होतो तिच्या मनाचा राजा, बदलत राहते ती स्वत:ला न करता गाजावाजा. कुणाची काय आवड तर कुणाची सवय काय, लक्षात ठेउन सारं अंथरुण पाहून पसरते पाय. अपेक्षा असतात तिच्या ब-याच पण खास अशी एकाचकडून, त्याच्याशिव

स्वदेशात/परदेशात नोकरी न करण्याची खंत जाणवते का?

लेखक दिपक.कुवेत यांनी बुधवार, 24/07/2013 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, कामानिमित्त आपण जगभर विखुरलेले असतो. परदेशातील नोकरी स्वीकारताना तिथली सुबत्ता, आर्थिक स्थैर्य, स्वच्छता, कमी भ्रष्टाचारपणा हे तर भुरळ घालतचं पण २-४ वर्षाकरीता म्हणुन गेलोलो आपण नकळत कधी तिकडेच स्थिरावतो हे आपलं आपल्याच कळत नाहि. दर वर्षि भारतवारी केली कि ईथे बोकाळणारा भ्रष्टाचार, गलिच्छपणा, गर्दि, रोजच्या नोकरीसाठि होणारी धावपळ, दगदग पाहिली कि सध्या आहोत तिथे बरे आहोत, पुढे बघु हा विचार नकळत दृढ होत जातो. पण त्याच बरोबर आपली संस्कृती, आपले सणवार, ती मातीत खेळण्याची मजा, ती होळीची बोंब ई.

अनेक ज्योती पेटवणारी, एक पणती मालवली होती

लेखक सार्थबोध यांनी बुधवार, 24/07/2013 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक ज्योती पेटवणारी, एक पणती मालवली होती छोट्याश्या अंधाऱ्या खोलीत, काही कुरबुर चालू होती काळ्या अंधारात दुर्बुद्धीने, विवेकावर मात केली होती ll १ ll कापसावाणी मऊ पाऊले, तिथेच बांधून घातली होती हातांची ती कोमल पर्णे, बेडीमध्ये अडकवली होती ll २ ll चंद्रावाणी नितळ चेहरा, सशावाणी पिटुकले डोळे अंधश्रधेच्या विखारी बुरख्याने, मिटून झाले भळभळलेले ll ३ ll काहीच घडले नव्हते, काही अस्तित्वातच आले नव्हते एका गोजिऱ्या निष्पाप जीवावर,काळे सावट घेरले होते ll ४ ll कुणाची तरी गाढवी बुद्धी,गैरसमजाचे ओझे वाहत होती मायेची भक्कम गोधडीच, उबेऐवज

प्रलायानंतरची प्रार्थना

लेखक गोरा सौमित्र यांनी बुधवार, 24/07/2013 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
चार भिंतींच्या आत माझ्या शब्दांचा मार ती निशब्दतेने सहन करत होती. प्रत्येक शब्दाच्या प्रहाराने तिच्या अखंड तपश्चर्येचा बांध फुटतो की काय?? त्या चार भिंतींच्या पोकळी मध्ये आभाळ दाटून आलेलं मला साफ जाणवत होतं. अशा वातावरणामध्ये माझ्या शाब्दिक विजेचा ताल बेताल झाल्यावर क्षणात वादळी बरसात होणार. अवकाशाच्या कुरुक्षेत्री जेव्हा समोरचा (प्रकाश) अस्तित्वाची लढाई हरू लागतो तेव्हा माझ्या आत्मकेंद्रित मनाच्या कोपर्‍यामध्ये लपलेला अहमभाव स्वतहाचा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी तिच्या जाणिवेच्या वास्तूला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करतो.

विरंगुळा

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 24/07/2013 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
नाते नाही मीच एकला श्वासांमधुनी नाद ऐकला कान्हा कान्हा बोले राधा तूच आसरा तू विरंगुळा कोषामधले उमलू पाहे गंध आतला दाटुन आला भेद तरी पण इथला तिथला तूच आसरा यू विरंगुळा मंद कशी ही झाली मेधा अंध मती पथभर मन बाधा न कळे कोणी का लपलेला तूच आसरा तू विरंगुळा ........................अज्ञात
काव्यरस

संपर्क ईश्वराचा

लेखक सार्थबोध यांनी बुधवार, 24/07/2013 09:26 या दिवशी प्रकाशित केले.
अवघड आहे ....कलियुग आहे बाबा.........असले शब्द आजकाल फार कानावर पडत आहेत. कारण तसेच आहे; जिकते तिकडे बजबजपुरी माजल्यासारखी वाटते, बारीक सारीक गोष्टींमध्ये माणसाचा तोल ढळलाय आणि अजून ढळत चालला आहे असे स्पष्ट दिसते. कलियुग विक्षिप्तपणे ब्रह्मदेवांसमोर नाचत आले तेंव्हा त्याने विधान केले होते कि, जे लोक कलियुगात देखील परमेश्वराचे चिंतन स्मरण करतील, आणि जे सत्याची कास धरून जगतील, त्यांच्या वाटेला मी जाणार नाही. हे वाक्य खूप साधे सोपे वाटते ऐकायला, पण नक्की काय करावे हे समजत नाही. सत्याची कास; चांगले वागणे म्हणजे नक्की काय?, याच्या व्याख्या आपण कशा आणि कुठल्या बुद्धीच्या सामर्थ्यावर करणार?.

पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०५ : पहिली महाआपत्ती आणि दुसर्‍या सफरीची सुरुवात (११५,००० ते ७५,००० वर्षांपूर्वी)

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी मंगळवार, 23/07/2013 23:46 या दिवशी प्रकाशित केले.
===================================================================== पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८...

मोठीशी आरोळी

लेखक वैभव कुलकर्नि यांनी मंगळवार, 23/07/2013 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
मोठीशी आरोळी कोण मारतुया वर. यमाचा आवाज , मला कळली झालर. माझे-माझे आता कोण,सग-सगळे लांबरे. कोणीतरी म्हणेल आता नकोस जाऊरे. अंधार होताहोता,निजू लेगेल झापड. गालाचेही आता होऊ लागेल खापड. किती आले किती गेले याची यमाला कल्पना. आज मला न्यायचे ,त्याने ओकली वल्गना. रेड्यावरती स्वारी बसत, माझ्याकडे आली. रेड्याचे ते डोळे बोले , मित्रा आज तुझी पाळी. चल षडा माझ्याबरोबर,वेळ संपलाय तुझा. पाशवाच्या बंधनातील खेळ संपलाय तुझा. रडारडे होईल मुक्त हंबरडे फुटतील. हातातील हिरवे चुडे, हातात तुटतील कपाळाचे नागडेही आता विद्रूप दिसेल.