Skip to main content

मोदकेन ताडय

लेखक शरद यांनी शनिवार, 03/08/2013 07:22 या दिवशी प्रकाशित केले.
एक दंतकथा एका राजाची कन्या उपवर झाल्यावर त्या राजाच्या प्रधानाला वाटले की राजकन्येने आपल्या मुलाशी विवाह करावा. पण राजकन्येने ते नाकारले. प्रधान अतिशय भडकला. त्याने सूड उगवावयाचे ठरविले. राजाने त्याला कन्येकरिता वर शोधावयास सांगितले. वरसंशोधनाकरिता हिंडत असतांना त्याला एक अतिशय सुस्वरूप मुलगा एका झाडाच्या फांदीवर बसून बुंध्याकडून ती फांदी तोडतांना दिसला. प्रधानाने त्याला "असे कां करतोस ?" विचारले. तो मुलगा उत्तरला "खाली उतरण्याकरिता". हा महामूर्ख तरुण पाहून प्रधानाला अतिशय आनंद झाला. त्याला खाली उतरवून, प्रधानाने त्याला आपल्याबरोबर राजधानीला आणले.

पाऊस एक चिंतन

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी शनिवार, 03/08/2013 04:29 या दिवशी प्रकाशित केले.
थोडी प्रस्तावना: पाऊस म्हणजे नेमकं काय? वाट पहाणे? मिलनाचा आनंद? एक अनामिक हुरहुर? एक अविरत सुरु असणारा काळाचा, विश्वाचा अनंत प्रवास? कि आणखी काही? असे अनेक प्रश्न मला नेहमीच पडत आलेले आहेत. या प्रश्नांची उकल करतांना स्वतःच्या बुद्धीच्या मर्यादाही ध्यानात आल्या. मग एक दिवस या तिघीजणी भेटल्या. बहुतेक प्रश्नांची उत्तरे देऊन गेल्या आणि काही नवे प्रश्नही.
काव्यरस

रायगड ट्रेक | Fort Raigad Trek

लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 02/08/2013 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
तीर्थक्षेत्री जाण्यासाठी योग यावा लागतो म्हणतात. तसंच काहीसं झालं. ट्रेकिंग ची, गड किल्ल्यांची आवड लागून दोन वर्ष झाली परंतु दुर्गदुर्गेश्वर रायगड ला जाणं झालं नव्हतं. खरं तर जून मधलाच हा प्लॅन होता. पण एक नाही दोन वेळा पुनर्नियोजित झाला होता. शेवटी तो योग आला. रायगडास जाणे झाले, शिवतीर्थाची भेट झाली. a रायगड ट्रेक योजला. तिघांची टीम जमली. आमच्यासोबत पहिल्यांदाच येत असलेला, पण आमचा शाळेपासूनचा मित्र असलेला, आणि आमच्या तिघांपैकी खरंच 'शिवभक्त' असलेला अनिकेत.

पाणी लाऊन हजामत

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 02/08/2013 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
पाणी लाऊन हजामत

गुदस्ता पाऊस आलाच नव्हता
कुठं पडला, कुठं पडलाच नव्हता
पीक उगवलंच नव्हतं
जे उगवलं ते जगलंच नव्हतं
जे जगलं ते वाढलंच नव्हतं
जे वाढलं ते फ़ळलंच नव्हतं
निसर्गानंच केली होती! हजामत केली होती!! बिनापाण्यानं केली होती!!!

सरकार आलं होतं, मुठभर घेऊन आलं होतं
आमच्या हातावर भुरका ठेऊन म्हणालं होतं
घेन्न! आता कसं वाटsssssते?
आम्ही म्हणालो होतो
मsssssस्त वाटते! गोsssssड वाटते!!

पण एक येडं होतं, सर्वांच्या पुढं होतं
Taxonomy upgrade extras

जनहित याचीकेबद्दल मदत हवी आहे .

लेखक नन्नु यांनी सोमवार, 29/07/2013 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
सामान्य माणूस वकिलाची मदत न घेता कोर्टात जनहित याचिका कशी दाखल करतो , गुगल वर सर्च केले असता साधे पोस्ट कार्ड सुद्धा पेटीशिअन म्हणून ग्राह्य धरले जाते , पुण्यात कुणी माहितीगार मिळू शकेल काय ,एक सरकारी भष्ट्याचार प्रकरण उघड करायावाचे आहे . बहुतेक जणाकडे मदत मागीतली पण सर्वांनी असमर्थता दाखवली .

प्रथम तुज पाहता.......!!!-२

लेखक स्पंदना यांनी सोमवार, 29/07/2013 06:16 या दिवशी प्रकाशित केले.
प्रथम तुज पाहता........!!! {"अग! मी तसं नव्हते म्हणतं. " खरतर कॅरोलिन हादरलीच होती. "हे बघ तुझ्याकडे पाहुन कोणीही पुरुष आकर्षीत होणे शक्य नाही, पण आपली, म्हणजे मला नकोच आहे ती, तुझ्यासाठीच आहे ती, इस्टेट जर बळकावायला जर कोणी तुला नादाला लावेल तर? मग तुझ्याकडे काय रहाणार? असा विचार करुन मी म्हणत होते." "आता ती इस्टेट तुझ्याकडे आहे तेंव्हा माझा रस्ता सोड!" सुझीने कार सुरु केली. " हे बघ!

जे के रोलिंग - गुपचूप गुपचूप

लेखक आदूबाळ यांनी सोमवार, 29/07/2013 03:34 या दिवशी प्रकाशित केले.
एप्रिल २०१३ मध्ये स्फीअर बुक्स या ब्रिटिश प्रकाशन संस्थेने एक पुस्तक प्रकाशित केलं. प्रकार नेहेमीचाच. लिहून लिहून बुळबुळीत झालेला. रहस्यकथा. लेखक नवखा - रॉबर्ट गाल्ब्रेथ नावाचा. विशेष कोणाचं या पुस्तकाकडे लक्ष जाण्याचं कारण नव्हतं. गेलंही नाही - पुढच्या तीन महिन्यांत त्या पुस्तकाच्या जेमतेम दीड हजार प्रती विकल्या गेल्या. समीक्षकांनी मात्र कादंबरीचं मुक्तकंठाने कौतुक केलं. एकाने त्याला "दैदिप्यमान पदार्पण" असं म्हटलं, तर दुसर्‍याला त्यातलं ठसठशीत पात्रवर्णन आवडलं. इंग्रजी ग्रंथप्रकाशनाचं जग मोठं क्रूर आहे. दर आठवड्याला शेकडो पुस्तकं प्रकाशित होता असतात.

मला एका कवितेच्या ओळी कुणी सांगू शकेल का?

लेखक वाचक्नवी यांनी रविवार, 28/07/2013 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
अचानक मला लहानपणच्या पाठ्य पुस्तकात असलेली जुनी कविता आठवली. अधल्या मधल्या ओळी आठवल्या, पण पूर्ण आणि सलग ओळी नाही. ती कविता कुणाच्या स्मरणात असेल तर, किंवा कुणी शोधून सांगेल? एक वडारीण किंवा तत्सम जातीची बाई आपला संसार घेऊन एका गावाहून दुसर्‍या गावाला जात आहे तिचे वर्णन या कवितेत आहे. कवितेच्या सुरुवातीच्या ओळी अशा. मूल पाठिवर विणीत चटई पेंगत पेंगत बाई जाई घोड्यावरती फुटकी भाणडी त्यावर फडफड करी कोंबडी, वगैरे. ....वाचक्नवी

सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग १)

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 28/07/2013 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रोय' (भाग १) अर्जुनाने केलेल्या ‘सुभद्राहरणा’तून सरतेशेवटी अर्जुनाचा दारूण पराभव आणि यादवांचा सर्वनाश कसा घडून आला, याची ही कथा: ------------------------------------------------------------------------ १. अभिरमन्यु उवाच: सुभद्रेला त्या नराधमापासून झालेल्या बाळाचे नाव ‘अभिमन्यु’ ठेवल्याचे कळले, तेंव्हा मी थोडासा सुखावलो खरा, पण ते क्षणभरच. त्या नराधमाविषयीचा माझा संताप लगेचच उफाळून आला, आणि माझी प्रतिज्ञा आणखीनच बळकट झाली. … माझी प्रिय सुभद्रा. माझी बालसखी.