Skip to main content

शिक्षण क्षेत्रात येवू घालतोय सिंधूदुर्ग पॅटर्न

लेखक शनआत्तार यांनी बुधवार, 04/09/2013 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
शिक्षण क्षेत्रात येवू घालतोय सिंधूदुर्ग पॅटर्न परशुरामाचा प्रदेश म्हणजे बुद्दीवंताचा प्रदेश अशी ओळख कोकणाची आहे. याच कोकणातून विचारवंत खेळाडू, शास्त्रज्ञ, समाजसेवक, स्वातंत्रसेनानी, कलाकार, लेखक अशा अनेक क्षेत्रांत कोकणपुत्रानी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे हे सर्वांना ज्ञात आहे. अशी ओळख असलेल्या कोकणाची मुंबई ला चाकरमाणी पुरवीणारा प्रदेश अशीही ओळख होती. मनिऑर्डवर चालणारी घरे आठवली तर आजची कोकणाची प्रगती पाहता आपसूक तोंडात बोटे जातात. शिक्षणामूळे व्यक्तीची , समाजाची व अनुशंगाने देशाची प्रगती होत असते.त्याच बरोवर दिशा देणारा पालकही असावा लागतो.

आम्हां घरी धन.....(३)

लेखक मोदक यांनी बुधवार, 04/09/2013 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
आम्हा घरी धन... आम्हां घरी धन ...(२) ---------------- धन्यवाद मंडळी! पहिल्या आणि दुसर्‍या धाग्याला उदंड प्रतिसाद मिळाला. अनेक उत्तमोत्तम उतारे, कविता सर्वांना वाचायला मिळाले. पण आता तिथे नव्या प्रतिक्रिया, नवे उतारे शोधणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे या धाग्याचा पुढचा भाग सुरू करत आहे. चला.. आपल्याला आवडलेल्या कविता, ओळी, छोटेखानी लेख, वन लाईनर्स, टॅन्जंट्स, सुभाषिते..

कहे कबीरा (१)

लेखक शरद यांनी बुधवार, 04/09/2013 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
कहे कबीरा (१) संत कबीरावर तीन लेख लिहण्याचा विचार आहे. पहिल्या लेखात कबीराचे चरित्र, दुसर्‍यात त्याचे विचार व तिसर्‍यात काही भजने/दोहे यांचा परिचय पहिला भाग लिहणे फार सोपे आहे. अगदी सोपे. मी काहीही लिहले तरी बिघडत नाही कार॒ण आज आपल्याला कबीराबद्दल काहीही विश्वसनीय माहिती नाही !

स्प्लेंडर : शतशब्द-सत्यकथा

लेखक उद्दाम यांनी बुधवार, 04/09/2013 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
माझी स्प्लेंडर होती. कोरी करकरीत होती. बरीच वर्षे गावात वापरली. मग अखेर एक दिवस मुंबई गाठली. तिथेही छान करियर मिळाले. पण मुंबईची लोकल, बेस्ट, रिक्षा, टॅक्सी , वेळोवेळी कंपनीने घडवलेल्या विमानयात्रा .... यात स्प्लेंडर घरीच धूळ खात बसली. चार पावसाळेही पाहिले तिने -- माझ्याशिवाय. आणि एक दिवस मग ठरवलं. "आता मला स्प्लेंडरची अजिबात गरज नाही. " होना! लोकल, ट्याक्सी, विमान .... आता स्प्लेंडर कशाला हवी? .. स्प्लेंडर विकली. त्यानंतर चारच दिवसात अपघात झाला. माझा डावा पाय चार ठिकाणी फ्रॅक्चर झाला.

ध्यासबावळी

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 04/09/2013 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
आस मिटे ना मन हो चातक थेंब मिळे ना स्वाती तृषा पाशवी अंतर्यामी असून पाणी भवती फिरे एकटा मेघ अंबरी आतुर सुकली माती छळते सावट रंध्रे अनवट ठाव न लागे चित्ती अंकुर चिंतातूर; दिसे ना किरण सोबती अवती गुदमर विळखुन विरह दाटला स्तब्ध जाहली नाती एक साद पवनास विनवते छेड बांधले मोती झुलव आपला झुला; तोषव ध्यासबावळी धरती …………………. अज्ञात
काव्यरस

आमचे असतील लाडके (सच्याची २००वी कसोटी)

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी बुधवार, 04/09/2013 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
फार फार वर्षांपूर्वीची (पूर्णपणे काल्पनिक) गोष्ट बरंका. तेव्हा ना पृथ्वीवर कोणीच राजा नव्हता. लोकं आपाआपली कामं जबाबदारीनी करायची. सचोटी, प्रामाणिकपणा, नीतिमत्ता वगैरे प्रकार तेव्हा खरोखरच अस्तित्वात होते. पण अर्थातच हे सगळं फार दिवस टिकलं नाही. लोकं षड्रिपूंच्या आहारी जाऊ लागली. खोटं बोलू लागली, एकमेकांचा द्वेष करू लागली, चोर्‍या मार्‍या करू लागली... म्हणजे थोडक्यात "वाईट" वागू लागली. आणि तेव्हा अर्थातच माणसांचं देवांशी डायरेक्ट कनेक्शन होतं. म्हणून मग काही जाणते नेणते लोक सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले "हे चतुरानन, तुझीच ही लेकरं आता अधर्माचरण करत आहेत.

मक्याचा उपमा

लेखक kalpana joshi यांनी सोमवार, 02/09/2013 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
मक्याचा उपमा साहित्य -मक्याची ४ कणसे, चांगले तूप २ चमचे ,जीर चवीनुसार ,२ हिरव्या मिरच्या ,थोडी कोथिम्बिर,दुध १ कप .मीठ चवीनुसार , (वाफवलेले मटार ,गाजर ,फ्लावर ई . घालू शकतो). कृती -मक्याची कणस किसणीवर किसून घेणे . मिरची बारीक चिरू नये ,तिखट लागल्यास काढून टाकता येते . कोथिंबीर बारीक चिरणे ,gas on करून ,कढइत तूप जीर व मिरच्या घालून या फोडणीत किसलेला मका घाला व उलथल्याने नीट परतवून घ्या,मका शिजत असतांना एक कप दुध घालावे ,चवी नुसार मीठ घालावे ,नीट परतत रहावे ,एक ताटली ठेवून वाफ आणावी . gas बंद करावा व serve करावे . ही कृती ४ झणांसाठी आहे.

हैराण इराण !!

लेखक सुधीर मुतालीक यांनी रविवार, 01/09/2013 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
14 जुन ला इराणच्या नवीन म्हणजे ११ व्या अध्यक्षांसाठी निवडणुका झाल्या. इराणी जनतेने भरभरून मतदान केले. पाच कोटी पाच लाख मतदारांपैकी घसघशीत ८०% मतदारांनी मतदान केले. अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकी पेक्षा प्रचंड मतदान झाल्याने इराण मध्ये लोकशाही नाही असे म्हणणा-यांची तोंडे काही काळासाठी तरी बंद झाली होती. अमेरिकेच्या निवडणुकीत ५०% च मतदान झाले होते. निवडून आलेल्या हासन रोहानी यांना ५०% हून थोडे अधिक मतदान झाले. रोहानी अध्यक्ष होणार हे समजल्यावर इराणी जनतेने एका अर्थाने सुटकेचा नि:श्वास टाकला होता. कारण इराणी जनता आता एकूणच त्यांच्या सद्य परिस्थितीला पकली आहे.

भारतीय सणांमागचे (खरे) शास्त्र !!

लेखक ब़जरबट्टू यांनी रविवार, 01/09/2013 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच एक लेख डोळ्याखालुन गेला, भारतीय सण हे शेतक-यांसाठी नाही...आमचेपण हेच मत आहे,. पण मग हे सण नेमके कुणासाठी असावे, या प्रश्नाचे उत्तर शोधून काढल्याशिवाय आम्हाला चैन पडेना, . अखेर सगळे पट मांडुन ह्या प्रश्नाचे उत्तर आम्ही शोधून काढले आहे. आमच्या घोटुन घोटून, खोदून खोदुन (निट वाचा, पा नाहीये) केलेल्या या अभ्यासावरुन आम्ही जाहीर करतोय की सण हे " आय टी" मधील लोकांना डोळ्यासमोर ठेऊनच योजिले आहेत… नको नको, एव्हड्यात आम्हाला दंडवत घालू नका व आमचा उदो उदो पण करु नका, आम्ही अतिशय संशोधन करूनच हे भाष्य केलेय बरं का… विचार न करता कोकलायला आम्ही काय दिग्गी आहोत का ?

लाभांश मिळवा.....मिळवतच राहा.

लेखक ज्ञानव यांनी रविवार, 01/09/2013 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या शेअर मार्केट निपचित पडले आहे. पण जे dividand साठी शेअर घेत असतात त्यांना त्याचा फारसा परिणाम होत नाही. उलट आताच्या पडलेल्या मार्केटमध्येच हे शेअर खरेदी करण्याची उत्तम वेळ म्हणावी लागेल. पण मी इथे एक वेगळ्या कारणाने अश्या कंपन्यांची लिस्ट देत आहे जिचा लाभांश घोषित झालेला आहे आणि दोन चार दिवसात त्याची रेकॉर्ड डेट आहे.