मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ध्यासबावळी

अज्ञातकुल · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
आस मिटे ना मन हो चातक थेंब मिळे ना स्वाती तृषा पाशवी अंतर्यामी असून पाणी भवती फिरे एकटा मेघ अंबरी आतुर सुकली माती छळते सावट रंध्रे अनवट ठाव न लागे चित्ती अंकुर चिंतातूर; दिसे ना किरण सोबती अवती गुदमर विळखुन विरह दाटला स्तब्ध जाहली नाती एक साद पवनास विनवते छेड बांधले मोती झुलव आपला झुला; तोषव ध्यासबावळी धरती …………………. अज्ञात

वाचने 1771 वाचनखूण प्रतिक्रिया 5

मिसळलेला काव्यप्रेमी 05/09/2013 - 13:04
ध्यासबावळी... हा शब्दच सुंदर आहे, आवडली.