Skip to main content

शेवटचे पान

लेखक मनीषा यांनी सोमवार, 07/10/2013 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
(प्रथितयश लेखक ओ'हेन्री यांनी लिहिलेल्या "द लास्ट लिफ" , या कथेचे हे मराठी रुपांतर. या कथेमध्ये वर्णन केलेले प्रसंग, ते प्रसंग जेथे घडतात ते स्थळ, आणि तो प्रसंग साकार करणारी पात्रे, यांचे यथातथ्य चित्रं, ही कथा वाचताना, वाचकाच्या नजरेसमोर उभी राहते. ओ'हेन्री यांच्या लेखनाचे हे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. त्यांच्या कथा वाचताना त्यांची धारदार कल्पनाशक्ती, अमाप शब्दसंपदा, आणि ते शब्द अचूकपणे वापरण्याची हातोटी याचा वेळोवेळी प्रत्यय येतो. ) वॉशिंग्टन चौकाच्या पश्चिमेकडे एक अजब वस्ती वसलेली आहे. नाव आहे ग्रीनविच. अतर्क्य वळणे घेत जाणारे रस्ते आणि आणि अनाकलनीय अशा गल्ल्याबोळांनी बनलेली ही वस्ती.

सकारात्मक भाषा

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 07/10/2013 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ ऑनलाईन छोटे पुस्तक: एक्झाम्पल्स ऑफ पॉझिटिव्ह लँग्वेज स्रोत: इंटरनेट अनुवाद : निमिष न. सोनार प्रस्तावना: महात्मा गांधी एकदा म्हणाले होते : " शब्द नेहमी सकारात्मक ठेवा . शब्दानुसार आपली वागणूक बनते. आपली वागणूक, वर्तन सकारात्मक ठेवा कारण तेच आपल्या सवयी बनतात . आपल्या सवयी सकारात्मक ठेवा कारण सवयी पुढे मूल्ये बनतात. मूल्ये आपलं नशीब होतात. जीवन चांगले जगण्यासाठी आपले नशीब सकारात्मक बनवा.

ब्लॅक आईस

लेखक निनाद यांनी रविवार, 06/10/2013 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
सारा ही चाळीशीची गायनॅक डॉक्टर आहे. तिचा नवरा लिओ हा आर्किटेक्चर विषयातला प्राध्यापक आहे. दोघेही हेलसिंकीमध्ये राहत असतात. साराच्या चाळीसावा वाढदिवस लिओने आणि तिने दुपारी रमणीय शृंगारीकपणे साजरा केलाय. आता सायंकाळी पार्टी आहे. पार्टीच्या आधी योगायोगाने साराला समजते की लिओच्या आयुष्यात अजून एक प्रकरण आहे. सारा भडकते. विमनस्क झालेली सारा पार्टी उधळून टाकते. सगळ्यांच्या समोर कंडोम्सचे फुगे करत लिओला जाब विचारते पण लिओ असे काही प्रकरण आहे हेच नाकारतो. थोड्याफार खटपटीतच तिच्या लक्षात येते की मुलीचे नाव तूली आहे आणी ती त्याची विद्यार्थिनीच आहे. तूली मार्शल आर्ट्सची प्रशिक्षिकाही असते.

हे राम...!!

लेखक सस्नेह यांनी शनिवार, 05/10/2013 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
पाच वाजत आलेले अन हापिसातल्या निम्म्या अर्ध्या स्टाफला बाहेरचे वेध लागलेले. अशा कातरवेळी काळेनाना क्लार्क केबिनमध्ये घुसले अन घुटमळत उभे राहिले. ‘का हो, नाना ?’ मी ऑफिसचा चार्ज घेऊन जेमतेम एक महिना झालेला. तेवढ्यात नानांच्या भिडस्त स्वभावाचा मला बराचसा अंदाज आलेला. ‘मॅडम..डिविजन वरून फोन आला होता...’ ‘हं, काय ?’ ‘ते..उद्या गांधी जयंती ना ?’ ‘हो. मग ?’ ‘नाही, म्हणतात सकाळी सातला ऑफिसात झेंडावंदन करा..’ ‘गांधीजयंतीला झेंडावंदन ? आणि सकाळी सातला ?’ बापरे, सकाळी उठलं कि पळत सुटावं लागणार ! शिवाय सकाळच्या प्राणायामाला फाटा द्यावा लागणार, ते वेगळंच... मी मनात विचार केला. नाना गंभीर.

ओदिशा - ५ : भुवनेश्वर परिसरातील मंदिरे

लेखक सुधीर कांदळकर यांनी शनिवार, 05/10/2013 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
ओदिशा - १ ओदिशा - २ ओदिशा - ३ ओदिशा - ४ २०-११-२०११ सकाळी जाग आली तेव्हा कळले की आपण बसमध्ये आहोत. बाहेर फटफटले होते. घड्याळात पाहिले. जेमतेम पाच वाजत होते. आणखी पूर्वेला आलो होतो. पुढचे येणारे शहर कटक होते. बसवाल्यांकडे हॉटेल, वाहन वगैरेंची चौकशी केली. कटकपेक्षा भुवनेश्वर बरे पडेल असे एक प्रवासी म्हणाला.

मिपा - घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०१३ - निकाल

लेखक संपादक मंडळ यांनी शुक्रवार, 04/10/2013 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर मित्रांनो, या वर्षी आपण मिपा - घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०१३ ही आपल्या घरच्या बाप्पाच्या भोवतीच्या सजावटीची स्पर्धा घेतली होती. मध्यंतरीच्या काळात सर्व्हर प्रॉब्लेम्समुळे निकाल तयार करायला उशीर झाला. पण आता सगळी विघ्ने दूर झाली आहेत आणि या स्पर्धेचा निकाल घोषित करताना परीक्षक आणि संपादक मंडळाला अत्यंत आनंद होत आहे. स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. मिपा मधे मधे बंद पडत असूनही एकूण ३२ लोकांकडून घरच्या गणेश सजावटीची छायाचित्रे आली. सगळीच अतिशय उत्तम होती.

मित्रास पत्र (सन 2045- एक झलक)

लेखक बबन ताम्बे यांनी शुक्रवार, 04/10/2013 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
ब. र. ता. दिनांक : 8 जानेवारी 2045 प्रिय मित्रा , आज 8 जानेवारी 2045. बघता बघता ८० वय झाले . जुलै २०१३ साली तारेची अखेर झाली आणि २०२३ साली पोस्ट ऑफिस चे ब्यान्केत रुपांतर झाले . पत्र पाठवणे वगैरे कालबाह्य झाले म्हणून सरकारने पोस्त ऑफिसच बंद करायचा निर्णय घेतला .

मला जगायचंय !

लेखक प्रमोद देर्देकर यांनी शुक्रवार, 04/10/2013 13:37 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा कधी तरी जाग आली ..... शरीर कशात तरी गुंडाळलेले .....हळू हळू नजर वर केली मला कळून चुकले मी इस्पितळात आ. य. सी. सी. यु. मध्ये आहे फक्त डोळ्यांची हालचाल शक्य ... डोक्यात विचारांचे काहूर माजलेले.... डोक्यात घणांचे घाव पडतायत..... घरुन निघालो तेव्हाच रेनकोट घालायला हवा होता माझी बाईक पुलावर आली आणि पाऊस तांडव करत बरसू लागला. बाईक बाजूला उभी करून डिकीत ठेवलेला रेनकोट काढेपर्यंत मी साफ भिजून गेलो होतो...... तेवढ्यात मागून रो रो करीत येण्यारया ट्रकचा आवाज ......अरे हे काय मी अलगद हवेत तरंगतोय ..... माझी बाईक ची सुद्धा तीच गत.....