Skip to main content

सचिनची निवृत्ती आणि क्रिडा रसिकांच्या प्रतिक्रिया

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 11/11/2013 03:25 या दिवशी प्रकाशित केले.
दै. बातमीपत्र (बातमीपत्रच म्हणजे बातमीपत्र) सचिनची निवृत्ती आणि क्रिडा रसिकांच्या प्रतिक्रिया आमच्या वर्तमानपत्राकडे आलेल्या असंख्य प्रतिक्रियांपैकी काही निवडक प्रतिक्रिया खाली देत आहोत. गोपाळ सुंदर, अमरावती: सचिन म्हणजे क्रिकेटचा देव आहे. देव कधी रिटायर होतो का? लागू म्हणतात देवाला रिटायर करा. पंकज मोरे, कारसुळ बु.: सचिनची निवृत्तीची बातमी ऐकून डोळ्यात पाणी आले. वडील म्हटले शेतावर जा अन कांद्याला पाणी दे. मी गेलो नाही, घरीच माळ्यावर रडत बसलो. अवनी बापट, पुणे: सचिनसरांचा खेळ मी लहाणपणापासून पाहते आहे. त्याचे रेकॉर्डचे मी बुक केले आहे.

वचन

लेखक स्पा यांनी रविवार, 10/11/2013 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
तसे हे लहानसेच खेडे,जेमतेम वस्ती असलेलं,आंबा-फणस,चिंच,नारळ-पोफळी यांच्या गर्दीत लपलेलं,वर्षानुवर्षे त्याच स्थितीत असलेलं,आधुनिकीकरणाचा स्पर्शही न झालेलं,गावात ठराविक पाच पन्नास घरं,सताठ दुकाने असलेला जुनाट बाजार,एक छोटी शाळा, एक ग्रामपंचायतीचे घर,त्याला लागून पोस्ट. गावाला दुभागून जाणारा लाल मातीच्या लोटाने भरलेला रस्ता.हि सडक सरळ पार तालुक्यापर्यंत जाते.याच रस्त्याने पुढे गेलं कि हळूहळू गाव मागे पडतं, आपण सड्यावर येतो,भणाणत्या वाऱ्याने बरं वाटतं.एखाद दोन किलोमीटर अजून पुढे गेलो कि दोन फाटे फुटतात. एक सरळ तालुक्याला, आणि एक छोटी सडक खाली.

अव्यक्तांच्या समिधा

लेखक सांजसंध्या यांनी रविवार, 10/11/2013 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
आज ना उद्या वटवृक्षांची जोडी..आपोआप ढासळेल, उन्मळून पडेल.. तग धरून उभारलेली अंग चोरून वाळलेली आज ना उद्या घाव बसतील कु-हाडीचे.. फांदीफांदीवरती काही शिल्लक उरणार नाही, जमिनीवरती पण एकमेकांत गुंतलेल्या पारंब्या तुटता तुटणार नाहीत.. नाग-नागिणीसारख्या मिठ्या सुटता सुटणार नाहीत खोल खोल गेलेल्या..एकमेकांत गुंतलेल्या कितीही खणलं तरी पुरून उरतील.. तुझ्या माझ्या वेदनांसारख्या !! जगाच्या अंतापर्यंत खणत राहीलं तरी अव्यक्ताचा गुंता सुटायचा नाही.. शेजारी उगवूनही जपलेल्या विरहाची माती व्हायची नाही जोडी अचेतन झाल्यावर कुणी पाहीलंच जर..

बदला

लेखक तुमचा अभिषेक यांनी रविवार, 10/11/2013 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
दूरवर मोकळे आकाश आणि त्या पलीकडे काहीच न दिसणार्‍या एका ओसाड माळरानावर अगदी मध्यभागी धापा टाकत मी एकटाच उभा होतो. पायातना कळा निघत होत्या, जणू काही नुकतेच एखादी मॅरेथोन मी जीव तोडून संपवली होती. पण अजूनही उराची धडधड काही थांबली नव्हती, जणू अजूनही ती जीवघेणी शर्यत बाकी होती. आणि हो, खरेच. पुन्हा क्षितिजावर धुळाचे लोट उठताना दिसू लागले. काहीच सुस्पष्ट दिसत नव्हते, एक किनार ती काय, पण मी समजून चुकलो की पुन्हा ती जनावरे माझ्याच दिशेने चाल करून येत आहेत. मी वळून त्यांना पाठ करून पळायला सुरूवात केली. पुढे कुठवर पोहोचायचे आहे याची काहीच कल्पना नव्हती.

स्वच्छ मन

लेखक mohite jeevan यांनी रविवार, 10/11/2013 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
मी आँफीसमधुन घरी जात होतो,पुढे काही आतंरावर ट्राफीक जाम होते,मी माझ्या बाईकचा वेग़ कमी केला आणि माझी बाईक एका फोर व्हीलर ग़ाडी माग़े थाबवली. तेथे प्रत्येकजण त्या ट्राफीक मधुन बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता,ग़ाडीचा आवाज,लोकांच्या बोलण्याचा आवाज येत होता.त्यातुनच एक आवाज येत होता,तेथे जवळच्याच एका मशीदीत नमाजचा आवाज येत होता.त्या थांबलेल्या जागेवरच मी विचार केला,'प्रत्येक लोकांचा देव वेग़ळा आसतो,मला ते काय म्हणतात याचा आभ्यास करुन जाणुन घ्यायची इच्छा झाली,'त्यावेळी आनेक विचार मनात येत होते. शेवटी त्या ट्राफीकमधुन मी बाहेर पडलो व त्या विचारात आसल्याने सहजच माझे लक्ष नेहमीच्या मार्गा वरील त्या चर्चवरी

आनंद - कार्लसन - डाव २

लेखक चतुरंग यांनी रविवार, 10/11/2013 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
माफ करा मंडळी, यायला उशीर झाला. आज झोपेनं दगा दिला आणि वाजलेल्या गजरावर मात केली! असो डावाकडे वळतो. बाप रे यावेळी डावाने केवळ १५ मिनिटात भन्नाट प्रगती केली आहे.

मोदींच्या स्तुतीची किंमत?

लेखक हुप्प्या यांनी रविवार, 10/11/2013 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
भारतरत्न लता मंगेशकरांनी मोदींचे जाहीर कौतुक केले आणि त्यांनी पंतप्रधान व्हावे अशी सगळ्यांची इच्छा असल्याचे वक्तव्य केल्यापासून सरकारी वक्रदृष्टी त्यांच्याकडे वळली आहे की काय असे वाटते. ही बातमी पहा http://maharashtratimes.indiatimes.com/nation/VIPs-named-kin-for-Padma-… पद्म पुरस्कारासाठी लताबाईंनी उषा मंगेशकराच्या नावाकरता वशिला लावल्याचा आरोप आहे. आता ह्या पुरस्काराकरता लोक आपले वजन वापरतात हे एक उघड गुपित आहे. नाहीतर सैफ अली खान ह्याला पद्मश्री मिळण्याचे काय कारण?

मधल्यामध्ये....

लेखक ज्ञानव यांनी रविवार, 10/11/2013 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
परवा एक नाग पलंगाच्या डोक्याकडच्या भागाकडे वळवळत होता आणि खाली सासूबाई फुल टू पसरल्या होत्या. फुल डेडली सिचुएशन, माझ्या डोळ्यात आनंद मावत नव्हता. नागाला शुक शुक केले... एक क्षण दुर्वासमुनींना जसा समाधी भंग केल्यावर आला असता तसा त्याला राग आला जोरात फुत्कारून काय घेतले, शेपाटीपण वेळावली पण मी जीवावर उदार होऊन त्याला म्हंटले "अरे हीच संधी आहे चाव त्यांना (हो मी त्यांच्या मागेही आहोजाहोच करतो ) डसून घे".... पण ह्याक....तो शांत होता जरा वेळाने निघाला तेव्हा त्याला म्हंटले " तू पण घाबरलास ना ??!!!!! मग कशाला बसलास जाऊन त्यांच्या डोक्यावर ?

प्रवास

लेखक भारी समर्थ यांनी रविवार, 10/11/2013 00:28 या दिवशी प्रकाशित केले.
धुक्यात अंधुक दिसते वाट कठिण अशक्य प्रचंड घाट परि न टेकुनी किंचीत पाठ एकच बांध तु निश्चयगाठ चालत रहा रे चालत रहा रविकिरणांची घेऊन साथ अडेल तेथे घालून लाथ फुलात शोधुन न्यारी बात फळे यशाची चाखीत खात चालत रहा रे चालत रहा इथे प्रवासी तु न एकटा नवे सवंगडी, नविन वाटा गाठलेस जरी अपुल्या ध्येया नवशिखरे तु चढुनी जाया चालत रहा रे चालत रहा

HARRY HARLOW ची माकडं आपल्याला काय शिकवितातं !

लेखक कुमारकौस्तुभ यांनी शनिवार, 09/11/2013 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
हॅरी हार्लो ची थोडी पार्श्वभुमी हॅरी हार्लो या महान मानसशास्त्रज्ञाचा जन्म १९०५ मध्ये फ़ेअरफ़ील्ड काउंटी आयोवा येथे झाला.याने ग्रॅज्युएशन रीड कॉलेज मधुन पुर्ण केल्यावर हा स्टॅनफ़ोर्ड या प्रसिद्ध युनिव्हर्सीटी त मानसशास्त्राच्या उच्च शिक्षणासाठी दाखल झाला.हार्लोने सुरुवातीला लेविस टर्मन या प्रसिद्ध संशोधकाच्या हाताखाली उमेदवारी केली. लेविस हा त्या काळात gifted child मध्ये असलेल्या बुद्ध्यांका वर I.Q.