Skip to main content

पुस्तक परिचय: कोल्हाट्याचं पोर - लेखक: किशोर काळे

लेखक सुजित जाधव यांनी सोमवार, 09/01/2023 18:27 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या वर्षी वाचनालयात पुस्तक शोधत असताना माझ्या हाती किशोर शांताबाईं काळे यांचं कोल्हाट्याचं पोर नावाचं पुस्तक लागलं. पुस्तकाच्या मलपृष्टावरील ओळी वाचल्यानंतर दुःख झालं आणि किशोर काळे व त्यांच्या आईबद्दल मनात उत्सुकता निर्माण झाली. त्याच दिवशी हे पुस्तक मी घरी नेलं आणि एका बैठकीत मी ते वाचून काढलं होत.. काही दिवसांपूर्वी मी ते दुसऱ्यांदा वाचलं आणि त्याबद्दल लिहण्याचा मोह आवरला नाही… कथेची सुरुवात होते जिजीपासून.. जिजींच खर नाव ताराबाई, त्यांचा जन्म साळी समाजात होतो. जिजींची आई लक्ष्मीबाई व वडील महादेव सोलापूरला राहत असतात. महादेव हा थोडा वेडसर असतो.

खचलेले शेजारी

लेखक सुधीर मुतालीक यांनी सोमवार, 09/01/2023 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
सुप्रीम कोर्टात नोटबंदीवर घटनापीठाने काल परवा शिक्कामोर्तब केले असले तरी नोटबंदी किती परिणामकारक होती याचा एक स्पष्ट पुरावा पाकिस्तानच्या आख्ख्या अर्थव्यवस्थेने दिला होता. लोकसभेच्या वेबसाईटवरच दिलेली आकडेवारी थरकाप उडवणारी होती. सन २०११ ते २०१५ मध्ये सव्वीस लाख पाचशे आणि हजारच्या खोट्या नोटांचे तुकडे भारतीय चलनात घुसवले गेले होते. NIA ने प्रयोगशाळेमध्ये या खोट्या नोटांचे तुकडे तपासून हे सिद्ध केले होते की चक्क पाकिस्तानच्या सरकारी पाठिंब्यावरच या खोट्या नोटा तिकडे छापल्या जायच्या. आता एखादे सरकार असले धंदे का करेल ? याचे उत्तर केवळ अतिरेक्यांना मदत देणे इतकेच नव्हते.

रानडुकराचं मटण

लेखक नूतन सावंत यांनी रविवार, 08/01/2023 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षापूर्वी डुकराच्या किंवा सशाच्या मटणाची पाककृती हवी असल्याचे वाचलं होतं.

खजिना

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 07/01/2023 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
होतात निरुत्तर प्रश्न त्या तिथे अचानक जावे शब्दांचा मांडुनी खेळ तर्कास जरा डिवचावे तर्काचे पडतील मोडून मग सुघड, नेटके इमले पडझडीत येईल हाती शब्दांच्याही पलिकडले तो अनवट खजिना येता हातात क्षणार्धापुरता मागणे अधिक ना उरते चांदण्यात सचैल भिजता

परदेशस्थ भारतीय

लेखक पराग१२२६३ यांनी शुक्रवार, 06/01/2023 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
लोगो इंदोरमध्ये 8 ते 10 जानेवारी 2023 दरम्यान पार पडत असलेल्या 17व्या प्रवासी भारतीय दिवसाच्या #pravasibharatiyadivas संमेलनात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

काय होते अंतरी...

लेखक Deepak Pawar यांनी शुक्रवार, 06/01/2023 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
पाहुनी हसताच तू काय होते अंतरी बावरा हा जीव माझा भिरभिरे कोठेतरी. चांदण्यांचे तेज गाली या फुलांची ओठी लाली तू बटांना कुरवाळता बघ हवेची झुळूक आली वादळे तू कुंतलाना सोडता वाऱ्यावरी. चाहुलीनं या तुझ्या बघ पान पान बहरतं दव भिजले गवत तव पावलानं बिलगतं गंध लेवूनी तनूचा बघ फुले ही बावरी.
काव्यरस