Skip to main content

पुखेत-पट्टाया-बँकॉक टुर - दिवस पहिला-दुसरा/भाग १

लेखक दिपक.कुवेत यांनी मंगळवार, 26/11/2013 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, श्रीमती सोनाली मुखर्जी ह्यांचा "फुकेत-थायलंड" धागा पाहुन मी २०१२ साली मित्रासोबत केलेली टुर आठवली. त्या सफरीचे काहि निवडक फोटो येत्या काहि भागात देतोय. आशा आहे पाकॄ सारखाच हा धागाहि गोड मानुन घ्याल. फोटोंमधुन थायलंडचं सॄष्टिसौदर्य तुम्हि अनुभवाव हाच निखळ हेतु आहे त्यामूळे विस्तृत माहिती न देता फक्त फोटो देत आहे. १. बँकॉक एअरपोर्टवर उतरल्यावर जागोजागी असलेले मनमोहक ऑर्किड आपलं लक्ष वेधुन घेतात orchids २.

कसाब अजुन जिवंत आहे का ?

लेखक जेपी यांनी मंगळवार, 26/11/2013 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
२६/११ मुंबई हल्याला आज ५ वर्ष पूर्ण होतील . त्या हल्यात मृत झालेल्या लोकांना आज ठिकठिकाणी श्र्दांजली वाहिली जातेय . या पार्श्वभूमीवर एक प्रश्न मला काही दिवसा पासुन पडलाय . कसाब अजुन जिवंत आहे का ? मंजे त्याला गुपचूप फाशी दिली ,दफन हि केला . मग त्याचा एखादा फोटो किवां चित्रफित फाशी देतानाची का नाही दाखवली जात . त्या सदाम हुसेन च्या फाशीची चित्रफित पहिली होती आपण . लादेन हि मेला हे निट कळाल . मग कसाब च्या फाशीचा एखादा पुरावा का नाही .

खळबळ

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 26/11/2013 09:34 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या तीर्थरूप वडिलांचे अकस्मात निधन झाले. वयाच्या नव्वदीतही शेवटच्या क्षणापर्यंत ते कार्यरत आणि आत्मनिर्भर होते. त्यांच्या जाण्याने हरवल्यागत झालेली ही विकल मनोवस्था...................... ते समाधानाने भाग्यवंतासारखे अनंतात विलीन झाले. त्यांना सद्गती मिळेलच. त्यांची तत्परता, प्रमाणिकपणा, स्वावलंबन या आदर्श संस्कारांद्वारे ते आम्हा सर्व भावंडांत वास्तव्य करून असले तरी त्यांच्या सहवासाची पोकळी आता आमच्या अखेरपर्यंत रितीच राहील.........
काव्यरस

राजकपूरचा '' अनाडी '' आज आठवला

लेखक देशपांडे विनायक यांनी सोमवार, 25/11/2013 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
राजकपूरचा '' अनाडी '' आज आठवला आठवण्याचे कारण खालील बातमी [THE TIMES OF INDIA 25/11/2013] The state's crisis hit relief & rehabilitation department led by senior congress leader Patangrao Kadam has paid a compensation of Rs. 3,000 to chief minister Prithviraj Chavan's wife ,Satwasheela,for loss of crop in the wake of the worst ever drought in western Maharashtra in 2011-12. पानशेत धरण फुटल्यामुळे ज्यांची घरे गेली त्यांना सरकारने जागा दिली धरण फुटण्याने ज्या भागात पाणी गेले होते आणि जागेचे नुकसान झाले होते त्या भागात आमचा वाडा होता .

स्त्रियांचे राज्य

लेखक सचीन यांनी सोमवार, 25/11/2013 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
काळ झपाट्याने बदलत चालला होता बघता बघता ३००० वे साल उजाडले. ह्या एवढ्या वर्षात बरेच बदल झाले होते.आपल्या भारतात आता स्त्रियांचे राज्य आले होते.सर्व प्रमुख पदांवर स्त्रिया कार्यरत होत्या. पुरुषांनी त्यांच्यावर हजारो वर्षापासून केलेल्या अत्याचारांची सव्याज भरपाई करत होत्या. गायात्रीबाई ह्या देशाच्या मुख्य होत्या. त्या अत्यंत सनातनी वृत्तीच्या होत्या.त्यांनी सत्तेवर आल्या आल्या समस्त पुरुषांची पंचाईत करून ठेवली होती. ‘वंशाचा दिवा’ हि पुरुषांची पदवी जाऊन त्या एवजी ‘वंशाची टूबलाईट’ हि नवी पदवी स्त्रियांना मिळाली होती.

अळीवाचे लाडू

लेखक टक्कू यांनी सोमवार, 25/11/2013 07:58 या दिवशी प्रकाशित केले.
थंडीने तिचा गुलाबी रंग दाखवायला सुरुवात केली नाही तर इथे आम्हा खवय्यांची season special list तयार होऊ लागली. अहो काय काय यादी करावी तितकी कमीच. त्यात आवडत्या अळीवाच्या लाडवांचा क्रमांक प्रथम. करायला सोप्पा खायला त्याहून सोप्पा आणि एकदम healthy अशा या लाडवाने यादीची सुरुवात करूया. साहित्य: १ वाटी खवलेला नारळ ३/४ वाटी चिरलेला गूळ १/४ वाटी अळिव २ छोटे चमचे वेलची पूड कृती: १. अळीव नारळाच्या पाण्यात अथवा साध्या पाण्यात ४-५ तास भिजवावेत. साधारण अळीव भिजतील इतके पाणी घालावे व झाकून ठेवावे. २. भिजवलेले अळीव, गूळ आणि नारळ एकत्र करावे व मंद आचेवर शिजण्यास ठेवावे.

गूज

लेखक अमेय६३७७ यांनी सोमवार, 25/11/2013 07:47 या दिवशी प्रकाशित केले.
शिशिराची ती असो पानगळ गदमद किंवा दाहवणारी तुझ्या संगती कळे न काही निशा नवी की ... मालवणारी दूर राहता उमजत जाते नात्याच्या विरहाची खोली मनांसारखी उधाणलेली देहांचीही असते बोली सभोवताली निसर्गलीला चराचराचे खेळ वेगळे आज पाहता नसे स्वस्थता कर्पूरासम चित्त पेटले गंध स्मृतींचा होय अनावर हसू सांडते दारी जाई भूल घालतो तशात चाफा हिवाळ्यातही चटका देई शब्दासोबत अर्थ स्मरावा सहवासाचे आठव तैसे अंगोपांगी मोहरतो मी गूज कुणा सांगावे कैसे ! -- अमेय

दोन घोषणा

लेखक सरपंच यांनी सोमवार, 25/11/2013 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिसळपाव.कॉमच्या संपादक मंडळात नवीन संपादक यशोधरा यांचा समावेश होत आहे. त्यामुळे यापुढे संपादक मंडळात खालील संपादक सक्रिय असतील. संपादक मंडळ - १) रेवती २) प्रा.डॉ. दिलीप बिरूटे ३) गणपा ४) पैसा ५) गवि ६) वल्ली ७) किसन शिंदे ८) लीमाऊजेट ९) aparna akshay ....आणि १०) यशोधरा तसेच आज पासून सदस्यांना मिसळपाववर येणार्‍या तांत्रीक व अन्य समस्या सोडवण्यासाठी सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. सध्या तरी एक साहित्य प्रकार असेच याचे स्वरूप आहे. येत्या काळात येथे ईमेल पत्ते व वारंवार विचारले जाणारे प्रश्नांची यादी देण्यात येईल.

सांजवेळ

लेखक सचीन यांनी रविवार, 24/11/2013 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
दिगूअण्णा खिडकीच्या बाहेर बघत बसले होते. खाली जी मुले खेळत त्यांना बघणे, दिवसभर रहदारी बघणे. हा त्यांचा नेहमीचा क्रम होता .दिवस तर कसाबसा ढकलला जात असे पण संध्याकाळ मात्र उदासवाणी असे. ह्या सांजवेळी दिगूअण्णा नेहमीच अस्वस्थ असत. आतल्या खोलीत मालतीबाई जपमाळ ओढत बसे. ह्या जोडप्याची देखभाल करण्यासाठी कोणीही नव्हते. घरात पैसा होता पण मायेच कुणी नव्हत. दिगूअण्णाना मालतीबाई नि मालतीबाईना दिगूअण्णा इतकेच त्यांचे विश्व. शेजारच्या सखारामबापूंचे भरलेल कुटुंब त्यांना नेहमीच मोहवत असे.

सरकारमान्य महिष्यौच्चवंशरेतन केंद्राचे उद्घाटन

लेखक नगरीनिरंजन यांनी रविवार, 24/11/2013 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
मौजे चढेवाडी, जातिवंत प्रतिनिधीकडून: देशातल्या पहिल्या आणि एकमेव सरकारमान्य महिष्यौच्चवंशरेतन केंद्राचे काल मौजे चढेवाडी येथे भव्य उद्घाटन झाले. आपल्या म्हशींच्या पोटी जातिवंत अवलादी पैदा व्हाव्यात म्हणून व्याकुळ झालेल्या पंचक्रोशीतल्या शेतकर्‍यांना यामुळे फार मोठा आधार मिळाला आहे असे मानले जाते. हे केंद्र उभारले जाईल असे माननीय खासदार श्री. गोरक्षनाथ गोर्‍हे यांनी गेल्या निवडणुकीत दिलेले आश्वासन अशारितीने पूर्ण करून आपल्या समाजसेवेच्या व्रताचे उदाहरणच लोकांसमोर ठेवले आहे असे चढेवाडीचे सरपंच माननीय श्री. सखाराम दामोदर चढे यांनी आवर्जून सांगितले.