डिसेंबर........
ऐन डिसेंबरात आभाळ दाटून आलंय. ते तसे नेहमी एखाद्या दिवशी होतंच. "डिसेंबर" खरं तर मासानां मार्गोशीर्षोहमः म्हणावा असा. डिसेंबर म्हणजे नुकतीच दिवाळीची सुट्टी संपलेली असते. सुट्टी संपवून शाळा कॉलेजे रुळावर येत असतात. गॅदरिंग चे वेध लागलेले असतात. दिवाळीच्या सुट्टीचा म्हणा की मस्त थंड हवेचा परीणाम म्हणा बहुतेक जण दुपारी सुद्धा उत्साही असतात. घरी कसाबसा एखादा कप चहा पिणारे मस्त पैकी आलं टाकून केलेल्या वाफाळत्या चहाचे दोन तीन राउंड सहज करतात.
सकाळचे कॉलेज असणारांची तर एक वेगळीच मजा असते. भल्या पहाटे अंथरुणावरुन बाहेर पडायची इच्छा नसते.
मिसळपाव
तसे एखाद्या संस्थेला पन्नास वर्षे पूर्ण होणे आता विशेष वाटत नाही. अनेक संस्थांनी शंभर किंवा दीडशे वर्षे पूर्ण केल्याचे आपण वाचत असतो. इतकेच काय आता आयटी कंपन्या पण रौप्य महोत्सव करू लागल्यात. पण हा कालखंड खरे तर सापेक्ष असतो. कुठल्या परिस्थितीत ती संस्था सुरु झाली, कशी चालविली आणि आता कशी आहे, यावर बरेच अवलंबून असावे.
आमचे पहिले-वहिले महाविद्यालय म्हणजे लातूरचे शासकीय तंत्रनिकेतन. पुरणमल लाहोटी शासकीय तंत्र निकेतन (पी. एल. जी.