Cognitive Dissonance ची थेअरी
सानंदा चा कल्ट
मानसशास्त्रज्ञ लिऑन फ़ेस्टींजर ने ही कॉग्नीटीव्ह डिसोनन्स ही थियरी विकसित केली. त्याच्या उगमाची कथा इंटरेस्टींग आहे, १९५६ मध्ये प्रकाशीत त्याच्या व्हेन प्रॉफ़ेसी फ़ेल्स या पुस्तकात ही विस्ताराने दिलेली आहे ती अशी. मारीयो कीच या लेकसीटी मिनिओपोलीस मध्ये राहणारया एका साध्या गृहीणीला अचानक एक दिवस एक मेसेज सानंदा नावाच्या देवाकडुन आला, की २१ डीसेंबर च्या मध्यरात्री अटलांटीक महासागरात प्रलय होईल आणि संपुर्ण जग त्यात बुडुन जाईल, अवघा रशिया तर एक समुद्र होऊन जाईल इ.
मिसळपाव