Skip to main content

मदत : वायरलेस इंटरनेट डाँगल

लेखक राजो यांनी मंगळवार, 17/12/2013 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर्स, सध्या बावधन, पुणे येथे स्थलांतरित झालो आहे. नवीन इमारत असलेने अजून वायर्ड इंटरनेटचा पर्याय (बी.एस्.एन्.एल., हॅथवे... वगैरे) आसपास उपलब्ध नाही. वायरलेस डाँगल हा पर्याय कितपत उपयुक्त आहे? ब्राऊझिंगव्यतिरिक्त डाऊनलोड करण्याचाही वापर असेल च. टाटा डोकोमो, फोटॉन, रिलायन्स, इतर ३जी प्रोव्हायडर्स पैकी कोणता योग्य ठरेल? इतर काही पर्याय असल्यास सुचवावेत. धन्यवाद.

जो भी प्यार से मिला हम उसी के हो लिये :)

लेखक Atul Thakur यांनी मंगळवार, 17/12/2013 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
किशोर कुमार बद्दल मला नेहेमी एक गोष्ट महत्वाची वाटते कि जी गाणी त्याला मिळाली त्यातला काव्यगुण लक्षात घेतला तर तो रफीला मिळालेल्या एकाचढ एक गाण्याच्या तुलनेत कमी होता. किशोरला अगदी नंतरच्या काळात गुलजार सारखा प्रतिभावंत गीतकार मिळाला. तरीही त्याची गाणी लोकप्रिय झाली यातच किशोरदांचं यश आहे असं मला वाटतं. याबद्दल भिन्न मते असु शकतात पण रफीकडे किंवा तलतकडे असलेल्या गझल किंवा इतर अनेक क्लासिक म्ह्टली जाणारी गीते बाजुला ठेवली कि उरलेली उडत्या ठायीची गाणी किशोरच्या वाट्याला आली. तरीही त्याने ती लोकप्रिय केली. गाईड हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.

Royal Palms, आरे कॉलनी, गोरेगाव

लेखक नित्य नुतन यांनी मंगळवार, 17/12/2013 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
माननीय मिपाकर महोदयांसी, विनंती विशेष ... पत्रास कारण की, मुंबईमध्ये घर (१ bhk) घेणे विचाराधीन आहे... बर्याच संशोधनांती Royal Palms, Aarey Colony, गोरेगाव चे location परवडेबल वाटते आहे ... पण आंतरजालावर या project बद्दल फारच वाईट प्रतिक्रिया दिसत आहेत ... एक दोन मित्र जे तिथे राहत आहेत त्यांच्या मते या area मध्ये ह्या किमतीत चांगले deal आहे.. पाण्याचा थोडासा problem असला तरीही ....connectivity चांगली आहे.. इत्यादी इत्यादी ... मिपाकरांपैकी कोणी या area बद्दल जाणत असल्यास फार मदत होतील ... धन्यु, - मायानगरीप्रेमी

बालपणातल्या हिरोंसोबत

लेखक नवनाथ पवार यांनी मंगळवार, 17/12/2013 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
कुठल्यान कुठल्या निमित्ताने घरात सतत साफ सफाई सुरु असते. आईने अचानक एकदा फर्मान सोडलं की, माळ्यावर पेटीत जी काही रद्दी साठवून ठेवली आहेस, ती एकदाची बाहेर काढ ! या घरात राहायला आलो त्याला आता पाच -एक वर्षे झाली. सामान आवरण्याच्या गडबडीत जुन्या घरातील माझी सर्व जुनी वह्या पुस्तके त्या पेटीत भरली होती. रविवारच्या हक्काच्या सुट्टीचा मुहूर्त साधून ती पेटी उघडली. वर्तमानपत्रांच्या कात्रणांच्या फायली, निबंध व चित्रकलेच्या वह्या आणि गोष्टींची खूप सारी पुस्तके. एक एक वस्तू मला भूतकाळात नेणारी.

कामगार कट्टा एक अस्वस्थ करणारे वास्तव :

लेखक psajid यांनी मंगळवार, 17/12/2013 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
आजच ए.बी.पी. माझा वर एक मन सुन्न करणारी बातमी पाहिली. नांदेड लातूर या ठिकाणच्या कायम विना अनुदानित कॉलेजमधील प्राध्यापक दुपारनंतर कुणी हॉटेलमध्ये वेटरचे कुणी शेतीमध्ये रोजगाराचे कुणी रिक्षा चालवण्याचे काम करत आहेत. ही बातमी पाहून मन हेलावून गेले. भारतामध्ये आज रोजगाराची फारच बिकट अवस्था निर्माण झाली आहे. आज कौटुंबिक जबाबदारी किंवा परिवाराचे पालनपोषण या साठी लोकांचा परीस्थीतिशी, महागाईशी अविरत असा न संपणारा झगडा सगळीकडे सुरु असल्याचे दिसून येईल. महाराष्ट्रामध्येही रोजगाराचे चित्र फार आशादायक नाही हे वरील उदाहरणावरून लक्षात येते.

हरिश्चंद्राचं व्हॉट्स अ‍ॅप !!

लेखक सूड यांनी मंगळवार, 17/12/2013 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर कुठेही का भेटेनात; मिपावरील आयडी, डू आयडी, खादाडी ह्या सगळ्या चर्चा संपल्या की मध्येच कोणीतरी भटकंतीचा विषय काढतं. काही वेळा हा विषय पब्लिक लैच सिरीयसली घेतं मग व्हॉट्स अॅप वर ग्रूप क्रीएट होतात भटकंतीच्या चर्चेसाठी!! अशीच एक पब्लिकने मनावर घेतलेली भटकंती म्हणजे हरिश्चंद्रगडाची. सात डिसेंबर तारीख पक्की झाली आणि मग कसं जायचं कुठे थांबायचं यावर चर्चा रंगायला लागल्या. आता जाणारे सगळेच नवखे, त्यात कळलं की गडावर जायच्या पाच (?) वाटा आहेत. त्यातली नळीची वाट म्हणजे कठीण आणि पाचनई गावातून जाणारी बर्‍यापैकी सोपी. शेवटी पाचनईच्या वाटेने जायचं ठरलं.

श्री गुरुदेव दत्त

लेखक ज्ञानव यांनी सोमवार, 16/12/2013 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
एक गृहस्थ आहेत. "पोलीस" ह्या "खात्यात" कामाला आहेत. शारीरिक उंची ५.३, बौद्धिक (तुम्ही ठरवा वाचून झाल्यावर)....वय ५०-५२ असेल, रंग ना काळा ना गोरा असा जो असतो तो, सरळ नाक, कुरळे केस, नाकावर चष्मा वगैरे. माणूस वागा बोलायला एकदम सोफ्ट. कायद्याचे विद्यापीठ असल्यागत बरीच कलमे मुखोद्गत. कसलेही व्यसन नाही इमारतीमध्ये 'ए' विंग ते 'बी' विंग पर्यंत पसरलेली सदनिका इमारतीमध्ये सर्वांशी संबंध चांगले (मेंटेनन्स थकलेला नाही,गणपतीला भरपूर वर्गणी, एखादा शेलीब्रेटी आणून कार्यक्रम करणे,अक्कलकोट, शिर्डी चालूच असते वगैरे) आणि त्याही पेक्षा आज गुरुचरित्राचे पारायण संपून उद्यापन आहे जे दरवर्षी ना चुकता तो करतो.

कोणते हे "मुल निवासी नायक" दैनिक ज्याने स्वामी समर्थ, गजानन महाराज, आणि साईबाबा संत नव्हेत असे म्हटले

लेखक प्रमोद देर्देकर यांनी सोमवार, 16/12/2013 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या वाचनात एक अनुदिनि आली की जिने फक्त ब्राह्मण ह्या जाती विरुद्ध लिहण्याचा जणु विडा उचलला आहे. या अनुदिनीने मला अजुन एक दैनिक "मुलनिवासी नायक" जे औरंगाबाद येथुन प्रसिद्ध होते या वृत्तपत्राचे एक पान डकवले ज्यात असे लिहले होते की , साईबाबा नेमके कोण होते, त्याच बरोबर श्री गजानन महाराज आणि अक्क्लकोट स्वामी महाराजाविषयी आक्षेपार्ह लिखाण केलेले आढळले त्या पानास इथे डकवले आहे. या पत्रा द्वारे ते म्हाणतात की १८५७ साली जे बंड झाले पण ते पुढे फसले.

नाही चाखली चव 'लाडू'ची- (विडंबन)

लेखक विदेश यांनी सोमवार, 16/12/2013 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
( चाल : नाही खर्चली कवडी दमडी...) नाही चाखली चव 'लाडू'ची, नाही घेतला ठाव उगिच घातला घाव, हाताने उगिच घातला घाव |धृ | कुणी आपटे 'तो' फरशीवर कुणा वाटते फुटे भिंतीवर फुटण्याचे ना घेतो इतुके फोडियले तरी नाव .. |१| 'काळ' मम मुखी लाडू घरचा जबडा न कळा सहतो वरचा हात दुखोनी तुटेल भीती दाताचा न टिकाव .. |२| जितुके लाडू तितुकी नावे हृदये चिडुनी शिव्यासी द्यावे मनीं न आवडे पत्नीपुढे मी दीन-अनाथ-'अ'भाव..|३| .
काव्यरस

आलेख

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 16/12/2013 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
अक्षर अक्षर ओघळताना झुळझुळणारे शब्द कवीता हृदयाचा आकार मनातील सुप्त सुकोमल भाव कवीता आशय गर्भित गूढ कथानक विश्लेषक तळ ठाव कवीता कळणारी न कळणारीही अंतरातली धाव कवीता कोण कुणाचा कधी न होता होता नव्हता डाव कवीता आस जनाची कणव जगाची गाभाऱ्यातील घाव कवीता मेघजळातिल गुदमरलेल्या सहवासाची हाव कवीता विलय पावलेल्या पर्वातील हळवा क्षणगुंजारव कविता सखी सोयरी जन्म तारिणी दु:ख हारिणी सरिता कविता दाहक पावक श्रावक वाहक बखर जन्म जन्मांची कविता आले गेले मुक्त जाहले मुक्त मौक्तिकांचीही कविता एकांतातील एकांताचा, द्वैताचा आलेख कवीता ……………………. अज्ञात
काव्यरस