Skip to main content

चैतन्य -चूर्ण

लेखक Rahul Bhuskute यांनी गुरुवार, 02/01/2014 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्ते मंडळी माझा पेशा अध्यापन असला तरी मी समाजाच्या कष्टकरी वर्गातूनच आलेलो आहे . हा मिसळपाव . कॉम वर लिहिण्याचा माझा पहिलाच प्रयत्न आहे तर आजचा मुद्दां असा आहे की तंबाखू च्या सेवना वर नानाविध पद्धतीने बंदी आणून सरकार असे भासवण्याचा प्रयत्न करीत आहे ,की त्याना देशातील जनतेच्या आरोग्याची फारच काळजी आहे …। इत्यादी . परंतु ग्यानबाची मेख अशी की सिगारेट व दारू महाग आणि कथित उच्चभ्रू व्यसनांवर कोणी बंदीची कुर्हाड आणू इच्छित नाही .

जीर्णनगरी मुशाफिरी : पांडवकालीन कुकडेश्वर मंदिर

लेखक सुज्ञ माणुस यांनी गुरुवार, 02/01/2014 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
जीर्णनगरी मुशाफिरी : पांडवकालीन कुकडेश्वर मंदिर कुकडेश्वर शिवालय हे महाराष्ट्रातील पुरातन काळी बांधलेल्या दगडी मंदिरापैकी एक. अखंड दगडात केलेलं अप्रतिम असे कोरीवकाम आणि स्थापत्य कलेचे उत्कृष्ट उदाहरण असलेले हे मंदिर तसे फारसे प्रसिद्ध नाही. दुर्लक्षित अश्या या पांडवकालीन मंदिरापासून कुकडी नदीचा उगम होतो. पुढे याच नदीवर माणिकडोह धरण आहे ज्यामुळे जुन्नर परिसर संपन्न बनला आहे. इतिहास : शिलाहार वंशातील/ घराण्यातील असंख्य राजे जुन्नर प्रदेशात राज्य करून गेले.

हार्दीक शुभेच्छा . . .

लेखक अनंतसुत यांनी गुरुवार, 02/01/2014 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
आदरनीय व्यासपीठ ( फ़ बी ची टाईमलाईन ), कार्यक्रमास उपस्थीत प्रमुख पाहुणे (अपेक्षीत न्यु यीअर पार्टीचा पास कींवा पार्टनर न मिळाल्या मुळे नाईलाजास्तव घरी असणारी मंडळी) आणि माझ्या बंधु आणि भगिणीनो आज आपण इथे नेमके कशासाठी जमलो आहोत ह्याची तुम्हाला कल्पना आहेच (व्हॉट्स-ऍप, आणि एस एम एस ह्यांनी काल रात्रीपासुनच तसा धुमाकुळ घातलेला असेलच). तर आज ३१ डिसेंबर, म्हणजे आज नविन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा देण्याचा दिवस (खरं पाहिलंतर रात्र).

छायागीत २ - है कली कली के लब पर, तेरे हुस्न का फसाना…

लेखक Atul Thakur यांनी गुरुवार, 02/01/2014 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
हिन्दी चित्रपट संगीतात खय्यामचा बाजच वेगळा. “आप यूं फासलोंसे”, “कहीं एक मासूम नाजुकसी लडकी” पासुन ते “दिखायी दिये यूं” पर्यंत कुठलीही गाणी घेतली तरी त्यावर खय्यामची स्वतःची अशी ठसठशीत छाप जाणवते असं म्हटल्यास वावगं होणार नाही. आकर्षक माधुर्य असलेली संथ चालीची गाणी तर खय्यामच देउ जाणे. मग ते “ऐ दिले नादां” असो की “अपने आप रातोंमे”. खय्यामच्या प्रत्येक गाण्यावर लिहीण्यासारखं खुप आहे. मात्र येथे मी “है कली कली के लबपर” ची निवड केली आहे.

भ्रामक मायाजाल

लेखक मंदार कात्रे यांनी गुरुवार, 02/01/2014 06:56 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच दोन बातम्या आल्या साध्वी प्रज्ञा यांच्या वरचे आरोप NIA मागे घेणार http://articles.timesofindia.indiatimes.com/2013-12-28/india/45651589_1… 2009 मडगाव स्फोट खटल्यातून सनातन साधकांची निर्दोष मुक्तता http://www.deccanherald.com/content/377725/court-acquits-sanatan-sansth… काही महिन्यापूर्वी झालेल्या दाभोळकर हत्येबाबतही सनातन वर भरपूर गरळ मीडियातून ओकण्यात

मिपाकरलक्षणे समास द्वितीय

लेखक सस्नेह यांनी बुधवार, 01/01/2014 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरलक्षणे समास प्रथम | | श्री मिसळ पाव || | डूआयडीलक्षणनाम समास द्वितीय | मागा सांगितली लक्ष णे | मिपाकरांअंगी बाणे | आता ऐका सोंग घेणे | असोनी येक आयडी |१ | तयां नाव डुआयडी |नामे असती बहु फाकडी | खवतुनी लाडीगोडी | करिती सदा |२| घेई सोंगे कलह लावण्या | जुने स्कोर सेटल करण्या | अथवा उगा मजा बघण्या | आयड्यांची |३| बोली स्त्रीआयडींशी मधुर | मयतरी करण्या अति आतुर | प्रतिसादी जो बहु चतुर | तो येक डुआयडी |४| वाचाळ चोंबडा चौकस |कुटीळ अंतस्थ मानस | कुवत नसता भंकस | करी तो येक डुआयडी |५| शत्रुआयडीवरी खाय दाढा |संपादकांशी दीन बापुडा | निर्लज्ज ढोंग
काव्यरस

आंध्रप्रदेशातील मंदिर

लेखक सचीन यांनी बुधवार, 01/01/2014 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
आंध्र प्रदेशात सोनिया गांधी ह्यांचे मंदिर उभारण्यात आलेले आहे त्यात सोनियाजींचा फोटो लावून दररोज नियमित पूजा केली जाते. सोनियाजींमुळेच तेलंगाना राज्याचे स्वप्न साकार झाल्यामुळे तेलंगणातील जनतेला त्यांच्या बद्दल खूपच आदर वाटतो व ते सोनिया गांधीना यांना देवी मानतात. तर अखंड आंध्रच्या समर्थकांनी स्व इंदिराजींचे स्मारक उभारले आहे. या मंदिराचे करीम नगर येथील तेलंगाना चौकात उद्घाटन झाले .या मंदिराच्या शेजारीच इंदिराजींचा पूर्णाकृती पुतळा आहे.. एखाद्या व्यक्तीचे मंदिर बांधणे हि तसे पाहिले विचित्रच गोष्ट आहे.

लोकसभा निवडणुक प्रश्नमंजुषा भाग १

लेखक क्लिंटन यांनी बुधवार, 01/01/2014 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मिसळपाववर २०१४ च्या लोकसभा निवडणुकविषयक वातावरणनिर्मिती करण्यात हातभार लावायच्या उद्देशाने तयार केलेल्या प्रश्नमंजुषेला सुरवात करताना खूपच आनंद होत आहे. राजकारणात आणि विशेषत: निवडणुकांमध्ये अगदी चौथी-पाचवीमध्ये असल्यापासून अतोनात रस असल्यामुळे सगळ्या घडामोडी मी भक्तीभावाने वाचल्या/बातम्यांमध्ये पाहिल्या आहेत.आठवणीच्या कुठल्यातरी कोपऱ्यात असे कुठेतरी कधीतरी वाचलेले/बघितलेले होते ते एका चिटोऱ्यावर लिहून काढून, आंतरजालावर परत एकदा जुने संदर्भ तपासून २० प्रश्न तयार करण्याइतपत माहिती एकत्र झाली.

किल्ले हडसर - सर!

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 01/01/2014 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
‘तिनशे वर्ष.....’ वाला फेमस डायलॉग माहितीच असेल अनेकांना. अगदी तसंच... ‘तीन महिने’ असं म्हणावंसं झालेलं आम्हाला. पावसाळ्याच्या अखेरीस केलेला रतनगड पचला होता, जिरला होता. आता पुन्हा जायलाच हवं असा निर्धार झाला. दोन दिवसांचा अट्टाहास न करता २०१३ संपायच्या आत एक दिवसाचा ट्रेक तरी मारायचाच म्हणून आम्ही ठिकाणं शोधायला लागलो. घनगड, प्रबळगड, तुंग-तिकोना, असे पर्याय समोर आले. हडसर हा ही एक पर्याय होता. चावंड केला तेंव्हाच हडसर बद्दल वाचलं होतं. कुतुहल तेंव्हापासून होतंच. मग सगळ्यांना तो पर्याय पटला, आवडला.

महाभारतातील “चलाख” महापुरुष - भाग २

लेखक Atul Thakur यांनी बुधवार, 01/01/2014 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
mahabharat दुसरी घटना इरावती कर्वेंनी “युगान्त” मध्ये सांगितली आहे. मात्र या घटनेकडे लोकांनी द्यावं तसं लक्ष दिलेलं दिसत नाही. “परधर्मो भयावहः” या लेखात त्यांनी द्रोणवधाचा प्रसंग वर्णिताना द्रोण आपला पुत्र अश्वत्थामा मेला हे ऐकुन देखिल शस्त्र खाली ठेवीत नाही हे मुद्दाम नमुद केलं आहे. मात्र जेव्हा भीम त्वेषाने त्याला ही जाणीव करुन देतो कि तो ब्राह्मण असुन लढणे हा त्याचा धर्म नाही. तेव्हा त्याचे धैर्य गळते. या घटनेचा थोड्या तपशीलाने विचार आवश्यक आहे.