काळजातली धग विझु देउ नकोस.......
एक प्रश्न विचारावासा
वाटतो देवा तुला
असा कसा संसाराचा
गाडा तु उभा केला
कुणी न जिंकती कुणी न हारती
कुणी न हसती कुणी न रडती
सारेच अभिमन्यु इथे
नशिबाच्या चक्रव्युहात अडकती
पैजांचा असतो डाव
तीन पत्त्यांत रंगतो खेळ
इथे कुणाचे कुणीच नसती
फक्त असतो हाता-तोंडाचा मेळ
क्षितीजाच्या वाटेवरती
डोळे सारेच लावुन बसतात
तोच सूर्योदय पुन्हा सूर्यास्त
मनातल्या मनात हसत राहतात
ठिणग्यांची कमतरता इथे
अगदीच आहे असे नाही
पण सारे रानच पेटुन उठावे
असे काही घडतच नाही
अद्याप घंटानाद होतोय
गाभारी देवा तुझ्या
अद्याप आस लावुन बसलोय
पायरीशी देवा तुझ्या
तुच आता ओढुन आण
लाट वादळांची एखादी
मुठी वळु दे नसा तापु दे
होउन जाउ
मिसळपाव
सर्वसाधारणपणे लोकांमध्ये असा समज आहे कि अमिताभचा “अँग्री यंग मॅन” हा “जंजीर” या सुपरहिट चित्रपटातुन जन्मला. या समजात तथ्य आहे. मात्र याचा अर्थ असा नाही कि “जंजीर” पूर्वी अमिताभने त्याच्यातली आग पडद्यावर दाखवलीच नाही. “जंजीर” पूर्वी फार अगोदर अमिताभने “परवाना” चित्रपटात खलनायक साकारला होता. मदनमोहनचं संगीत लाभलेल्या या चित्रपटात “सिमटी सी शरमायी सी” हे किशोरचं आणि “यू ना शरमा फैलादे अपनी गोरी गोरी बाहें” हे रफी-किशोरचं द्वंद्व गीत होतं.