Thrills on Wheels तिसरा टप्पा
Thrills on Wheels
( Thane - Statue of Unity - Thane)
तिसरा टप्पा
२३ तारखेला साधारण तीन वाजता हॉटेल वर पोहोचलो. उरलेला वेळ अजिबात फुकट घालवायचा नव्हता. निवांतपणे तयार होऊन हॉटेल मधून नंबर घेवून एक रिक्षा बोलावली. आणि आम्ही गरुडेश्वरला गेलो. साधारण ५ किमी वर आहे गरुडेश्वर. १० मिनिटात तिथे पोहोचलो. छान दर्शन झालं. नर्मदा नदी किनाऱ्यावर जाण्यासाठी मोठ्या मोठ्या पायऱ्यांचा घाट बांधला आहे. डावीकडे धरणावरून येणारा पाण्याचा प्रचंड प्रवाह आहे. अतिशय सुंदर असं ते दृश्य होत. घाट उतरून पाण्यात पाय बुडवून घेतले. मैयाला मनोभावे नमस्कार केला. तिचे आशीर्वाद घेतले. मन भरून आल. सूर्यास्त होत होता.
मिसळपाव