उगवत्या सरकार समोरचा पहीला; मावळत्या सरकारचा शेवटचा आंतरराष्ट्रीय राजनितीक गूंता इटालीयन ?
भारतातल सध्याच सरकार मावळतीला असताना, एक पाश्चिमात्य राष्ट्र घायकुतीला येऊन भारत सरकारवर राजनितीक दबाव वाढवत असल्याच्या बातम्या आहेत.
१५ फेब्रुवारी २०१२ला इटालीयन तेलवाहू नौकेवरील दोघा सुरक्षारक्षकांनी केलेल्या गोळीबारात दोन केरळी मच्छिमारांचा मृत्यू झाला. भारतीय यंत्रणांनी त्या दोन इटालियन माणसांना अटक करून (भारतातच) केस टाकली. केस कोणी हँडल करायची केरळ सरकारने का भारत सरकारने, कोणते कायदे-कलम लागू करायचे यावर नेहमी प्रमाणे गोंधळ, काही साक्षीदार परदेशात जाऊन बसणे यात नेहमी प्रमाणे भारतीय चौकशी संस्था सरकारे ते न्यायालये यांची दिरंगाई.
मिसळपाव