Skip to main content

बागलाण भटकंती - भाग १

लेखक सह्यमित्र यांनी बुधवार, 30/04/2014 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
सह्याद्री मध्ये भटकंती सुरु करून ८-९ वर्षे झाली तरी बागलाणात जायचा योग काही जुळून येत नव्हता. त्यामुळे ह्या वेळेस पावसाळ्याच्या सुरुवाती पासूनच सप्टेंबर च्या सुमारास बागलाणात जायचे नक्की केले होते. बागलाण हा प्रदेश नाशिक-धुळे जिल्ह्यांच्या सीमेवर येतो. भौगोलिक दृष्ट्या सह्याद्री पर्वतरांगेची सुरुवात ह्या प्रांतातून होते. साल्हेर हा महाराष्ट्रातील सर्वोच्च गिरिदुर्ग (आणि दुसऱ्या क्रमांकाचे शिखर) ह्याच भागात येतो. सालोटा, मुल्हेर, हरगड, मांगी-तुंगी, न्हावीगड ही ह्या भागातील इतर काही शिखरे आहेत.

पैसा म्हणजे ...

लेखक असहकार यांनी बुधवार, 30/04/2014 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
पैसा म्हणजे साधन , पैसा म्हणजे साध्य , पैसा म्हणजे सुःख , पैसा म्हणजे दुःख , पैसा म्हणजे अश्रू , पैसा म्हणजे हसू , पैसा म्हणजे शांती , पैसा म्हणजे अशांती , पैसा म्हणजे दुधाची वाटी , पैसा म्हणजे शाळेची पाटी , पैसा म्हणजे तरूणाची लाठी , पैसा म्हणजे म्हाताऱ्याची काठी , पैसा म्हणजे मरणानंतरची ताटी , पैसा म्हणजे प्रगती, पैसा म्हणजे अधोगती, पैसा म्हणजे मालक, पैसा म्हणजे नोकर, पैसा म्हणजे घामाचा दाम , पैसा म्हणजे हाताचा मळ , पैसा म्हणजे शोषितांचे रक्त , पैसा म्हणजे इंधन , पैसा म्हणजे वंगण , पैसा म्हणजे मित्र, पैसा म्हणजे शत्रू, पैसा म्हणजे देव, पैसा म्हणज

विवाहांतर्गत बलात्कारांचा प्रश्न

लेखक arunjoshi123 यांनी बुधवार, 30/04/2014 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
या संदंर्भात सद्य भारतात ही माहिती उपयुक्त ठरावी. http://timesofindia.indiatimes.com/india/Treat-marital-sexual-abuse-as-r... नि http://www.indialawjournal.com/volume2/issue_2/article_by_priyanka.html नि http://timesofindia.indiatimes.com/india/Govt-justifies-exclusion-of-mar... अन्यायाचे स्वरुप - १.

अंडी पालक

लेखक जागु यांनी बुधवार, 30/04/2014 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः ६-७ अंडी एक जूडी पालक दोन छोटे किंवा एक मोठा कांदा चिरून १ चमचा आल, लसुण, मिरची, कोथिंबीर पेस्ट अर्धा चमचा हळद १ चमचा मसाला पाव चमचा हिंग अर्धा चमचा गरम मसाला चवी नुसार मिठ अर्धा किंवा पाव लिंबू फोडणी पुरते तेल. कृती १) प्रथम अंडी उकडून, साले काढून त्याला सुरीने हलक्या हाताने वरून चिरा द्या. २) पालक गरम पाण्यात थोडा वाफव

नाचणीचे लाडू

लेखक चिन्मयी भान्गे यांनी बुधवार, 30/04/2014 13:59 या दिवशी प्रकाशित केले.
नाचणीचे पीठ - २ वाट्या पीठी साखर - १ वाटी तूप - ३/४ वाटी कृती: कढईत ३/४ वाटी तूप घालून, नाचणीचे पीठ भाजून घ्या. नाचणीचे पीठ दिसण्यास लालसर असल्यामुळे, भाजल्यानंतर पिठाचा रंग फारसा बदललेला कळत नाही, पण खमंग वास नक्कीच कळतो. भाजलेल्या पिठात, (पीठ) गरम असतानाच, पीठी साखर घालावी व मिश्रण नीट एकजीव करवे. हाताला थोडेसे तूप लावून, लगेच लाडू करावेत.

ओव्या

लेखक मालविका यांनी बुधवार, 30/04/2014 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
ओव्या हा गाण्याचाच एक प्रकार आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.आजकाल ओव्या या फक्त मराठी सिनेमात दाखवण्यापुरत्याच उरल्या आहेत.माझी आजी छान ओव्या म्हणायची.आजीला कदाचित गाण्याची आवड असावी. कारण बर्याच वेळा कोणताही काम करताना ती गुणगुणत असायची. या गुणगुण्यात बर्याच वेळ ओव्या , जुनी घरगुती गाणी आणि आरत्या मुख्य करून असायच्या.आजीचा दोन वेळेला रंगत येऊन ओव्या म्हणत असे. एक म्हणजे सिनेमात दाखवतात तसे जात्यावर दळताना आणि दुसरे म्हणजे ताक घुसलताना.आमच्या घरी दूध दुभते भरपूर होत. एक मोठा घडाभरून दही विरजलेल असायच आणि आजी त्याच छान ताक करायची .

केंद्र परिघाचं नातं

लेखक आतिवास यांनी बुधवार, 30/04/2014 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
(लेख फार पूर्वी अन्यत्र प्रसिद्ध झाला आहे; सहज आठवला म्हणून मिपाकरांशी शेअर करत आहे) वैशाखातलं रणरणतं उन शहरातल्या कार्यालयात टेबल-खुर्चीवर बसताना जास्त जाणवतं. त्या दिवशी कळवण तालुक्यातल्या एका आदिवासी पाड्यावर उंबराच्या झाडाखाली मस्त गारवा होता. दहा बारा स्त्रिया त्यांच्या उत्सुक चेह-यावरचा संकोच लपवत माझ्याभोवती बसल्या होत्या. बुटक्या झोपडीच्या दारात एक पोर हाताशी आणि एक कडेवर घेऊन एक मुलगी उभी होती. दूरच्या खाटेवर एक आजोबा ‘कशातच अर्थ नसल्याच्या’ अविर्भावात बसले होते. तो होता स्त्रियांचा बचत गट. मी त्यांच्याशी गप्पा मारत होते. नेहमीसारखीच ओळख करून घेण्यापासून सुरुवात.

तुती, कैर्‍या आणि संत्री

लेखक मनिष यांनी बुधवार, 30/04/2014 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
परवा अचानकच फळांच्या दुकानात दोन तुतीचे बॉक्स दिसले आणि मी एकदमच खुष झालो. मध्यंतरी महाबळेश्वरला खाल्ल्या होत्या, पण एकुणच नाजूक फळ आणि त्यामानाने नॉन-ग्लॅमरस, त्यामुळे स्ट्राबेरीसारखे सहजपणे मिळत नाही. त्या तुती अचानकच मिळाल्याने हरखूनच गेलो आणि उड्या मारतच लहानपणीच्या तुतीच्या झाडांवर पोहोचलो. ९-१० वर्षांचा होतो तेंव्हाची गोष्ट आहे…आम्ही रहायचो आणि त्यानंतर २-३ घरे सोडून उपाध्यांचा बंगला होता…मला वाटते ते तेंव्हा गाणे आणि violin शिकवायचे.