पाकपुर्या (पाकातले चिरोटे)
पावसाळा सुरू झाला की आईचा स्वयंपाक बदलायचा. पक्वान्न पण बदलायची. आंबे संपलेत, श्रीखंड खाण्यासारखे हवामान नाही, श्रावणातला पुरणाचा रतीब सुरू व्हायचा आहे, खिरींचा खुराक सुरू व्हायला हिवाळा अजून यायचाय, बाहेर भुरभुर पावसामुळे चमचमीत नि गोड खायचा आमचा हट्ट पुरवायचा आहे.... असं सगळं असायचं. मग काय सुरू व्हायचे एकेक पदार्थ.. कधी गुळातले गडगिळे, कधी कणिक तुपावर एकदम चॉकलेटी भाजून त्याचा शिरा, गोड पुर्या, सुधारस, साखरभात आणि आमच्या अत्यंत आवडत्या पाकपुर्या. म्हणजेच चिरोटे !
आता मी तिच्या भूमिकेत गेलेय. लेक माझ्यासारखीच खवैय्यिण ( वा ! ) असल्याने तिचेही हट्ट भरपूर असतात. आजही असाच हट्ट केला तिने.
मिसळपाव