Skip to main content

विजयोत्सव!

लेखक स्वाती दिनेश यांनी बुधवार, 16/07/2014 03:37 या दिवशी प्रकाशित केले.
.
१५ जुलै २०१४... बर्लिनचे ब्रांडेनबुर्ग गेट माणसांनी गच्च फुलले होते, हातात जर्मनीचे झेंडे,गळ्यात झेंड्याच्या रंगाच्या प्लास्टिकफुलमाळा, अंगात जर्मनीचा शर्ट..

बाउमकुखन (ट्री केक)

लेखक Mrunalini यांनी बुधवार, 16/07/2014 01:45 या दिवशी प्रकाशित केले.
"बाउमकुखन" (Baumkuchen) मधे Baum म्हणजे जर्मन भाषेत झाड आणि Kuchen म्हणजे केक. हा केक originally rotisserie मधे बनवला जातो आणि जेव्हा हा केक कापतात तेव्हा त्यात झाडाच्या खोडामधे जश्या rings किंवा layers दिसतात, तसे ते वाटते. म्हणुन ह्याला झाडाचा केक (Baumkuchen) असे म्हणतात. माझ्याकडे rotisserie नसल्यामुळे मी तो केक पॅनमधे बनवायचा try केला आहे. I hope तुम्हाला सगळ्यांना आवडेल.

पुस्तक परिचय – विज्ञानाच्या दृष्टीकोनातून चार्वाकवाद आणि अध्यात्म

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 15/07/2014 22:32 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तक परिचय – विज्ञानाच्या दृष्टीकोनातून चार्वाकवाद आणि अध्यात्म लेखक– प्राचार्य (नि) अद्वयानंद गळतगे. मोबाईल क्रमांक –०990200258 वेदान्तविवेक प्रकाशन. भोज, जि. बेळगाव कर्नाटक.591263. पाने- 156. किंमत – रु. 150/-. हे पुस्तक पुर्वीविविध नियतकालिकातून प्रसिद्ध झालेल्या लेखाचा संग्रह आहे. लेखांचे विषय वेगवेगळेअसले तरी सर्वांचे सूत्र विज्ञान हेच आहे. अध्यात्मात विज्ञान कुठे आले? असा काही जणांना प्रश्न पडेल. विज्ञानम्हणजे पाश्चात्यांचे आधुनिक भौतिक विज्ञान अशी अनेकांची समजूत आहे. पण वस्तुतःसत्यशोधनाच्या पद्धतीला विज्ञान असे म्हणतात.

CID एपिसोड: आईच्या गावात अंन बाराच्या भावात

लेखक पगला गजोधर यांनी मंगळवार, 15/07/2014 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
३ दिवसांपूर्वी सुषमाचा फोन आला, मी म्हटले - बोल सुशे, कशी आठवण काहाडली ? सुषमा म्हणाली - तुमची मदत हवी, ACP प्रद्युम्न, आम्ही विनंती करू करू दमलो, पण हाफिजचा पत्ता लागत नाही. मी म्हणालो - तुम्ही चुकीच्या जागी शोधू राहू लागले न बाप्पा, तो तुम्हाला पाकिस्तानात सापडेल. सुषमा म्हणाली - तेवढ बघा न भाऊ. माझा पाकिस्तान्यांवर भरोसा नसल्याने, मी आपल्या टीमबरोबर, जुन्या क्वालीसमधून पाकिस्तानात गेलो. (या भारतात काही लोक आहेत कि जी जगात कोणालाही कुठेही कधीही जाऊन भेटू शकतात, त्यांना पासपोर्ट विसा प्लानिंग असं काही लागत नाही ) .

हमशकल्स - एक मैलाचा दगड

लेखक समीरसूर यांनी मंगळवार, 15/07/2014 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
हो हो, 'हमशकल्स' हा एक मैलाचा दगडच आहे. 'हमशकल्स'ला नाके मुरडणार्‍या तमाम अभिजनांच्या चित्रपटीय जाणीवांची मला अक्षरशः कीव येते. अहो, असं धाडसच कसं काय करू शकतात ही लोकं? 'हमशकल्स' हा चित्रपट म्हणून उच्च दर्जाचा तर आहेच परंतु माणसाच्या अंतरंगाचा इतका तपशीलात धांडोळा घेणारी, माणसाच्या मनाच्या बहुपेडी जडण-घडणीची नुसतीच दखल घेणारी नव्हे तर इतक्या सुबक पद्धतीने ती जडण-घडण दुनियेसमोर निर्भीडपणे मांडणारी ही कलाकृती अजरामर आहे यात शंकाच नाही. कल्पनाविलास ही संकल्पनाच तोकडी पडेल अशी कल्पनाउड्डाणांची आणि कल्पनाभरारीची विस्मयकारक किमया 'हमशकल्स' या चित्रपटात अनुभवायला मिळते हे कसं विसरू शकतो आपण?

पाकातल्या (आमरसाच्या) पुर्‍या

लेखक सानिकास्वप्निल यांनी सोमवार, 14/07/2014 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
मितानताईने दिलेले पाकातले चिरोटे बघून तोंडाला पाणी सुटलेय :) . त्यात पाकातल्या पुर्‍या व चिरोटे म्हणजे विकपॉईंट आहे . ताईने दिलेल्या पाककृतीला आम्ही पाकातले चिरोटे म्हणतो आणि रवा-मैद्याच्या किंवा कणकेच्या पुर्‍यांना साखरेच्या पाकात घोळवून तयार केला जाणारा पदार्थ म्हणजे पाकातल्या पुर्‍या .

फ्राईड मटण चॉप्स

लेखक भिंगरी यांनी रविवार, 13/07/2014 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
फ्राईड मटण चॉप्स साहित्य---------- मटण चॉप्स---६ आलं लसूण पेस्ट २ लहान चमचे. १० हिरव्या तिखट मिरच्या आणि एक कप निवडलेली कोथिंबीर यांची पेस्ट ३ अंडी फोडून चांगली फेटलेली मीठ रवा किंवा ब्रेड क्रम्स तळण्यासाठी तेल. कृती----- मटण चॉप्स घेताना खाटकाकडून दाबून थोडे चपटे करून घ्यावे. स्वच्छ धुवून त्यांना आलं लसणाची पेस्ट व मीठ लावून कोरड्या भांड्यात ठेवावे. कुकरमध्ये हे भांडे ठेवून तीन शिट्या होऊ द्याव्या. कुकरची वाफ गेल्यावर चॉप्स बाहेर काढून थंड होऊ द्यावे.

शाही अंडा मसाला

लेखक स्वाती दिनेश यांनी रविवार, 13/07/2014 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य- ४/५ अंडी उकडून, २/३ टोमॅटो किवा १ वाटी तयार टोमॅटो प्युरे, २/३ मध्यम कांदे, १ मोठा चमचा गरम मसाला,१ मोठा चमचा धनेजिरे पूड,१ चहाचा चमचा तिखट, १ चहाचा चमचा कसूरी मेथी, १तमालपत्राचे पान ७/८ काजूबिया, साधारण अर्धी वाटी सुके खोबरे, १ मोठा चमचा हेवी क्रिम किवा साय,२ मोठे चमचे तेल,१चमचा बटर, मीठ चवीनुसार, १/२ चहाचा चमचा साखर थोडी कोथिंबिर गार्निशिंग साठी. कॄती- खोबरे किंचित लालसर कोरडेच भाजून घ्या व बाजूला ठेवा. एक चमचाभर तेलावर चौकोनी चिरलेले कांदा व टोमॅटो परतून घ्या. त्यात गरम मसाला, तिखट, धनेजिरे पूड घालून परता, कसूरी मेथी घाला आणि काजूतुकडे घाला व थोडे परता.