Skip to main content

आज ती अनाथ होती.....

लेखक निश यांनी मंगळवार, 29/07/2014 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
पाहुन घटना ती ही मी ही सुन्न होई. ऐक भुकेल पोर भाकरीसाठी श्वानाशीही झगडा घेई. माय होती बाजुस त्याच्या ती ही धाय मोकलुन रडी. पोराची भुकेची तडफड त्या माउलीस सहन न होई. गेल्या सालामध्ये ती भरल्या घरची मालकीण होती. शेतात सोन पिकवणार्‍या शेतकरी राजाची राणी होती. अचानक दैवाने सुखी संसारात दुष्काळाच विष कालवल उभ्या शेतातल पिक पाण्याविना शेतात करपल. धन्यानेही खचुन जाउन धनीपण संपवल. आयुष्य संपवल त्याने, पण बायको लेकरास जन्मभर रडवल. सगेसोयरानीही मग पाठ फिरवली. सावकारानेही मग घरावर जप्ती आणली. भरल्या घराची अशी आता राखरांगोळी झाली. लेकरासंगे तिने मग शहरात रस्त्याकडेला चुल मांडली. आज तिच माय धाय मोक

विडंबन: देखो देखो पंछी उड़ रहा है.

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 29/07/2014 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
बहुतांश विज्ञापन भ्रमित करणारे असतात. काही विज्ञापनात सत्य दडलेले असतात. फक्त आपल्याला समजायला हवे. दिल्लीत बहुतेक तरुण मंडली वेडी-वाकडी आणि तुफान बाइक चालवितात एखाद्या पक्ष्या प्रमाणे. परिणाम काय होतो:
किक मारुनी बाईक तुफान त्याने फेकली . शरीर सोडूनी तत्क्षणी पंछी उडाला आकाशी. लोक ही म्हणतात कसे देखो देखो पंछी उड़ रहा है.

क्यूं के ये इश्क , इश्क है .. भाग अंतिम

लेखक चौकटराजा यांनी मंगळवार, 29/07/2014 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
नाझ ओ अंदाजसे कहते है के जीना होगा जहर भी देते है तो कहते है पीना होगा जब मै पीता हूं तो कहते है कि मरता भी नही जब मै मरता हूं तो कहते हि जीना होगा (प्राणप्रिय ) म्हणतात की आपल्या वाट्याला काहीही आले तरी आनंदाने जगले पाहिजे. मग त्यानी विष दिले त म्हणतात 'तरी ते प्राशन केले पाहिजे.' .मग मी जर ते पिउन टाकले तर म्हणतात अरे मरत नाही हा अजून, अन खरंच मरू लागलो तर म्हणतात " जगायला हवं ! " ( काय करावं काही उलगडत नाही !

चिंब भटकंती: लोहगड

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 29/07/2014 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
लोहगडला आतापर्यंत कितीवेळा गेलोय याची गणतीच नाही. दरवर्षी पावसाळ्यात किमान दोन भटकंती तर येथे हमखास असतातच. घाटमाथ्याजवळ हा सातवाहनकालीन किल्ला असल्याने येथे निसर्गाने अगदी भरभरून दिलेय. यंदा पाऊस तसा उशिराच चालू झाला, येथेही उशिरानेच पण सध्या मात्र तो अगदी धुव्वाधार कोसळतोय. मागच्याच आठवड्यात येथे पुन्हा एकदा जाउन आलो. लोहगडाचे वर्णन तसे बर्‍याच वेळा मिपावर येऊन गेल्याने फक्त पाऊस आणि हिरवाई अनुभवा. १.

एक सुगंधीत जखम…. ती…!

लेखक वटवट यांनी मंगळवार, 29/07/2014 08:56 या दिवशी प्रकाशित केले.
विधात्यानं दिलेलं हे जगणं जगताना प्राक्तनाशी भातुकलीचा खेळ खेळण्याचा खूपदा प्रसंग येतो. प्राक्तनाशी खेळला जाणारा हा खेळ भातुकलीचा म्हणायचा तो एव्हढ्यासाठीच कि तो कधी न कधी संपणारा असतो म्हणून आणि भातुकलीचा खेळ जरी संपला तरी तो तात्पुरताच संपतो... तो कधीच कायमचा संपत नाही. दिवस बदलत जातात. आपण बदलत जातो. ह्या भातुकलीच्या खेळाचं स्वरूपसुद्धा बदलत जातं. पण हा खेळ खेळण्याचं आपण टाळू कधीच शकत नाही. मग हा खेळ खेळताना आपण ठेचकाळतो, पडतो. जखम होते…. जखमाही होतात. काही बर्या होतात. काही बर्या होतायेत असं वाटतं पण नंतर डोकं वर काढतात.

लय भारीचा टाइमपास

लेखक मित्रहो यांनी मंगळवार, 29/07/2014 03:12 या दिवशी प्रकाशित केले.
हा काही लय भारी किंवा टाइमपासचा रिव्ह्यू नाही. तसेही या शिर्षकाचा आणि खालील लेखाचा काही संबंध नाही. मागे एकदा बहुदा महेश माजरेकरांनीच म्हटल्याचे आठवते मराठी सिनेमा हा कंटेन्टवर चालतो. मराठी सिनेमात कंटेन्ट फार महत्वाचे असते. हे खरेच होते. श्वास नंतर मराठी सिनेमाचा प्रवास बघितला तर हेच दिसते. श्वास कधी कोणी अरुण नलावडे किंवा अमृता सुभाष साठी बघायला गेले नाही तर एक वेगळा विषय आणि त्याची वेगळी मांडणी हे त्याचे मुख्य आकर्षण होते. ऑस्कवारी हे जरी एक कारण असले तर त्याचा विषय आणि त्याची सामान्य प्रेक्षकांना पचेल अशी मांडणी हे प्रमुख कारण होते.

हरवले ते गवसले का? व कसे? भाग 7 किस्सा चोराला धोपटल्याचा...

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 28/07/2014 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येकाच्या जीवनात काही तरी हरवते, सटकते, चोरीला जाते अन आपल्याला त्या गमावलेल्या गोष्टींची चुटपुट लागते की हे कसे व का घडले? सोन्याची चेन व इतर दागदागिने लंपास झाल्याचे ऐकताना आपण त्या पीडित व्यक्तिला वेंधळी व बेसावध या रकान्यात टाकतो. ‘आपण नाही तसे’ असे प्रशस्तिपत्रक उगीचच घेऊन टाकतो. काही वेळा हरवलेल्या गोष्टी अनपेक्षितपणे परत मिळतात त्याचा आनंद ती गोष्ट विकत घेताना झालेल्या आनंदापेक्षा जास्त असतो असे वाटते. नुकतीच अशी एक घटना माझ्या मुलीच्या बाबतीत मला अनुभवायला मिळाली. त्यावरून आठवले विविध असेच काही किस्से...

मढे मोजण्याला

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 28/07/2014 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
मढे मोजण्याला

लपेटून फासामधी कायद्याला
ससे वाकुल्या दावती पारध्याला

नको पाडसा आज कळपास सोडू
चुल्ह़ा तप्त टपला तुला रांधण्याला

जवानीत होता उतावीळ श्रावण
अता फ़ागही ना विचारीत त्याला

तुझी आत्मग्लानी वृथा-व्यर्थ आहे
कुणी येत नाही मढे मोजण्याला

करा की नका काम कोणी पुसेना
बिले चोख ठेवा; लुटा आंधळ्याला

इथे देवळाच्या चिखल भोवताली
स्मशाने चकाचक ’अभय’ तालुक्याला

मंत्रचळाच्या मागोव्यावर

लेखक आदूबाळ यांनी सोमवार, 28/07/2014 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
हा धागा प्रथम उघडला तेव्हा त्यावर एकही प्रतिसाद आला नव्हता. थोडासा वाचताच लक्षात आलं - बंदे में है दम! लहानग्या सचिनचा पहिला कव्हर ड्राईव्ह पाहून रमाकांत आचरेकरांना काय वाटलं असेल? मिसरूडही न फुटलेल्या खन्नाच्या हातची पहिली मिसळ खाऊन पहिलं गिर्‍हाईक पार्श्वभागी हात लावून बोंबललं असेल तेव्हा रामनाथ उपहारगृहाच्या तत्कालीन मालकांना मिसळीच्या लालजर्द तर्रीत भविष्य दिसलं असेल का? आम्हाला दिसलं. हा धागा इतिहास घडवणार याची खूणगाठ आम्ही मनातल्या उपरण्यास बांधली. खरडफळ्यावर तसं लिहूनही आलो.

कचरा

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 28/07/2014 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवार-रविवार म्हणजे मॉल. मॉल म्हणजे शॉपिंग. मॉल म्हणजे खादाडी, अशी समीकरणं आता रूढ झालेली आहेत. ठाणे-मुंबईसारख्या जागा म्हणजे तर या दृष्टीने मॉलामाल आहेत. मोठेच्या मोठे मॉल्स, त्यातली लखलख, चकचक, ब्रँडेड वस्तूंची दुकानं, दालनं हेच शनिवार-रविवारचं डेस्टिनेशन झालेलं आहे. या मॉल्समधून असंख्य लोक पैसे खर्च करायच्या उदात्त हेतूने ओसंडून वाहत असतात. याची ‘शहरातली जत्रा’ यापेक्षा समर्पक व्याख्या मला करता येत नाही. याच जत्रेत येणा-या प्रत्येकाला आनंद वाटावा म्हणून पडद्यामागच्या कलाकाराप्रमाणे प्रामाणिक मेहनत घेणारे अनेक लोकही असतात. उदाहरणार्थ, सफाई कामगार किंवा हाउसकीपिंग पीपल.