आज ती अनाथ होती.....
लेखनविषय:
पाहुन घटना ती ही मी ही सुन्न होई.
ऐक भुकेल पोर भाकरीसाठी श्वानाशीही झगडा घेई.
माय होती बाजुस त्याच्या ती ही धाय मोकलुन रडी.
पोराची भुकेची तडफड त्या माउलीस सहन न होई.
गेल्या सालामध्ये ती भरल्या घरची मालकीण होती.
शेतात सोन पिकवणार्या शेतकरी राजाची राणी होती.
अचानक दैवाने सुखी संसारात दुष्काळाच विष कालवल
उभ्या शेतातल पिक पाण्याविना शेतात करपल.
धन्यानेही खचुन जाउन धनीपण संपवल.
आयुष्य संपवल त्याने, पण बायको लेकरास जन्मभर रडवल.
सगेसोयरानीही मग पाठ फिरवली.
सावकारानेही मग घरावर जप्ती आणली.
भरल्या घराची अशी आता राखरांगोळी झाली.
लेकरासंगे तिने मग शहरात रस्त्याकडेला चुल मांडली.
आज तिच माय धाय मोकलुन रडत होती.
लेकरास मात्र श्वानदंशाचीही भिती नव्हती.
पोटाची भुक वेदनेपेक्षा मोठी होती.
देवानेही आज त्यांच्याकडे फिरवली पाठ होती.
शेतकरी माय असुनही आज ती
ह्या जगात अनाथ होती.
ह्या जगात अनाथ होती.
वाचने
1867
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
आशय चांगला आहे; पण रचना....
आवड्ली
आवड्ली
वाहव्वा
आवडली.
चांगला आशय.. आवडली..
तुम्हा सगळ्यांचे मनापासुन आभार
कवितेचा आशय चांगला आहे.