झीचा तद्दन टुकार आचरटपणा…….
आपलं टोकीज म्हणून मिरवणाऱ्या झीनं आता अक्षरशः डोक्याची मंडई करायला सुरुवात केलेली आहे. नाविन्यपूर्ण संकल्पना घेऊन हे चायनल सुरु करण्यात आले ते खूप छान वाटले होते. सुरुवातीला बरे वाटलेले सिनेमे दाखवून "ह्यांनी मराठीच्या पुनरुत्थानासाठी फार चांगली सुरुवात केली " असे म्हणणार होतोच पण तेवढ्यातच "प्रेक्षकांनी चायनलबद्दल असा काही विचार देखील मनात आणणे पाप आहे" असा ग्रह करून घेतलेल्या झीने स्वताच्या कार्यक्रमाचा बट्ट्याबोळ करायला सुरुवात केली आहे. काही ठराविक सिनेमे पुन्हा पुन्हा झळकू लागले पण एकदा चुकला तर परत लागतो म्हणून आम्ही आनंदाने ते स्वीकारले.
मिसळपाव