Skip to main content

नित्य नियम

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 29/08/2014 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
एका गावात एक शेतकरी राहतं होता. त्याने वारकरी पंथाची दीक्षा घेतली व माळकरी झाला. व त्याने एक नेम घरला तो असा की सकाळी उठायचे अंघोळ करून बुक्क्याचा टिळा लावायचा देवपूजा करून हरीपाठाच्या निदान ४ ओळी वाचायच्या व मग न्याहरी इत्यादी.करून शेतात जायचे.... त्याच्या शेजारी जो रहात असतो तो चंगीभंगी व खाणारा पिणा~यातला असतो... त्याला हि गोष्ट समजते तेंव्हा तो शेतकरी बुवाकडे जातो व नेम/नियम म्हणजे काय असे विचारतो. त्यावर बुवा सांगतात की कोणतीही गोष्ट नियमाने करणे,,, त्याने काय होते? मन शांत राहते..मनात भक्तिभाव जागतो..मनासारखे होते..बुवा उत्तरले. शेजारी घरी येतो व विचार करु लागतो,,पण त्याला देवपूजा आदी श

सुतक

लेखक स्वतन्त्र यांनी शुक्रवार, 29/08/2014 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
गणपती विद्येची देवता.विघ्न दूर करणारा.त्याचा आज पासून १० दिवस उत्साहात सर्वत्र साजरा होणारा उत्सव. आमच्या घरात दिवाळी इतक्या उत्साहाने नाही होत जितका दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतो. गणपती आज बसणार तोच आमची ऑस्ट्रेलिया ला असलेल्या चुलत चुलत आज्जी वारल्या . चुलत आज्जी म्हणजे आजोबांची चुलत भावजय. त्याच दहा दिवस सुटक पाळायच असा आदेश घरातल्या मोठ्यांकडून आले. सुटक पाळायच म्हणजे गणपती मूर्ती च्या जवळ जायचा नाही . गणपती दुसर्याकडून बसवून घ्यायचाय़. य़ा निमित्तानं बर्याच गुरुजी लोकांची मते घेतली.

पुलाव (आळशी लोकांचा)

लेखक विलासराव यांनी शुक्रवार, 29/08/2014 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
साहीत्यः गरज आण आळशीपणा. घरात जे उपलब्द्ध होते ते. मोकळा॑ शिजवुन घेतलेला भात. घरी बनवलेले गावरान तुप. मोहरी. हिरवी मिरची(एकच मिळाली). कढीपत्ता. अर्धा कांदा, अर्धा टोमॅटो बारीक चिरुन. नासपती,पेरु आनी थोडे डाळींबाचे दाणे. सजावटीसाठी काजु. पाककृती: मी लालबागला रहातो. गणपतीच्या धांदलीमुळे घरातुन खाली उतरायचा कंटाळा आल्याने घरातच काही बनवावे असे मनाने घेतले. जे असेल त्यातच भागवायचे होते. वरील साहित्य मिळाले.बनवल्यावर फोटो काढावा वाट्ला मग पुढे इथे लिहायचे ठरवले. आमच्या मंडळात खासदार्,आमदार्,नगरसेवक सकाळीच हजेरी लावुन गेलेत. रंगारी बद़क चाळीच्या गणपतीचे हे ७५ वे वर्ष आहे त्यामुळे उत्सव जोरात आहे.

आदि कैलास,ओम पर्वत दर्शन पार्वती सरोवर परिक्रमा.भाग-२

लेखक खुशि यांनी शुक्रवार, 29/08/2014 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
प्रथम आदि कैलास येथेच भगवान शिवशंकर यांचे निवासस्थान होते.कौरव-पांडवांचे युद्ध संपल्यावर विजयी पांडव भगवंताचे दर्शन घेउन पाप क्षालन करावे या हेतुने कैलासावर येण्यास निघाले,पांडवांच्या हातुन बांधव,गुरू हत्येचे पातक घडले होते त्यामुळे भगवान त्याना दर्शन न देता आणखी वर म्हणजे आत्ताच्या मोठ्या कैलास इथे निघुन गेले.अशी आख्यायिका आहे.आदि कैलास जवळ एक सहा शिखरे असलेला डोंगर आहे,ही शिखरे म्हणजे पाच पांडव आणि द्रौपदी असे मानतात. आदि कैलास भारताच्या हद्दीत असुन त्या मानाने कमी उंचीवर म्हणजे १५७००फूट आहे.मोठ्या कैलासची उंची जवळजवळ १७०००फूट आहे.पार्वती सरोवर साधारण ५कि.मि.घेराचे आहे,तर मानस खुपच

गणपती पूजेच्या मागची अवधारणा

लेखक विवेकपटाईत यांनी शुक्रवार, 29/08/2014 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
आज गणेश चतुर्थी, आज बाप्पा आपल्या घरी येतात. १० दिवस आपण बाप्पाची पूजा अर्चना करतो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाचे विसर्जन करतो. आपण बाप्पाची पूजा का करतो या मागची अवधारणा काय? हा प्रश्न मनात येतोच.

वर्धापन दिनाच्या मिपाला लै म्हणजे लै शुभेच्छा. :)

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शुक्रवार, 29/08/2014 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. मंडळी मिपा आज आठव्या वर्षात पदार्पण करीत आहे आज हे एक सदस्य म्हणुन लिहितांना मिपाच्या चांगल्या वाईट गोष्टींचा साक्षीदार म्हणुन मला मनापासून अतिशय आनंद वाटत आहे. मिपाच्या समृद्ध अशा प्रवासात मी मिपाच्यासोबत या क्षणापर्यंत सोबत आहे, त्याचाही खुप आनंद वाटत आहे. मिपाच्या सुरवातीला गणेशचतुर्थीच्या रात्रीच्या बारा वाजता निरोप आला ’मास्तर, मिपा सुरु झालंय. लवकर आयडी घ्या आणि लिहा’ मंडळी गेल्या सात वर्षात क्वचितच मी मिपापासून दूर राहीलो असेल. जमेल तसं लिहिलं आपण लोकांनी प्रतिसाद दिला कौतुक केलं. प्रसंगी टीका केल्या, भांड्लो.

थोडे अद्भुत थोडे गूढ - ४

लेखक स्पार्टाकस यांनी शुक्रवार, 29/08/2014 09:34 या दिवशी प्रकाशित केले.
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धाचा काळ. १८४० मध्ये युरोपात आयर्लंडमध्ये भयानक दुष्काळ पडला होता. आयरीश लोकांच्या जेवणाचा मुख्य भाग म्हणजे बटाटा! या बटाट्याच्या पीकावर पडलेला भयंकर रोग या दुष्काळाला मुख्यतः कारणीभूत होता. या काळात आयर्लंडमधील अनेकांवर उपासमारीची वेळ आली. बटाट्याच्या शेतीवर अवलंबून असलेली सुमारे ४० ते ५०% आयरीश जनता देशोधडीला लागली! या दुष्काळातून वाचण्यासाठी अखेरचा उपाय म्हणजे दुसर्‍या देशांत स्थलांतर करणं!

माझा गणेश मूर्ती संग्रह

लेखक अजया यांनी शुक्रवार, 29/08/2014 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच वर्षांपासुन गणेश मुर्तींचा संग्रह करण्याचा माझा छंद आहे. जिथे जातो तिथली गणेश मुर्ती आणली जायची. बर्‍याच मुर्ती जमा झाल्यावर या संग्रहाचं वर्गीकरण करायला सुरुवात केली. त्यातल्याच काही विविध माध्यमातल्या मुर्तींचे हे फोटो.

नॉन लेव्हल प्लेइंग गेम

लेखक ऋतुराज चित्रे यांनी गुरुवार, 28/08/2014 23:10 या दिवशी प्रकाशित केले.
क्रीडा स्पर्धा कोणतीही असो तेथे धर्म,जात व वंश या गोष्टींना थारा नसतो.अपवाद फक्त लिंगाचा,कारण स्त्री व पुरुषातील शारीरिक ठेवण व नैसर्गिक सामर्थ्यातील फरक हाच त्यामागील उद्देश असावा.स्पार्धा समान पातळीवर व्हावी या उद्देशाने अनेक क्रिडा प्रकारांचे गट पाडले गेले.उदा: मुष्ठीयुद्धात खेळाडूच्या वजनाप्रमाणे हेवी वेट व लाईट वेट असे गट पाडले गेले.कोणत्याही गटातील खेळाडूला आपले वजन कमी जास्त करून संबंधित गटात भाग घेता येतो. येथे वजन हे प्रमाण मानले गेले आहे.

वर्धमान ते महावीर - भाग 2

लेखक दशानन यांनी गुरुवार, 28/08/2014 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
तो काही न बोलता डोळे बंद करून पुन्हा ध्यानमग्न झाला. वृद्ध उठला, बाजूला असलेली आपली फांदीचा आधार घेत. नंतर फक्त सुक्या पाचोळ्याचा आवाज येत येत.. नाहीसा झाला आणि पुन्हा एकदा जंगलात निरव शांतता पसरली होती, ह्याच्या चेहऱ्यावर आता आधीपेक्षा जास्त नसले तरी, थोडे अधिक तेज आले होते.