Skip to main content

वरुण राजाला सांगड

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 01/09/2014 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावण सगळा सरला टिपूस नाही पडला. बळीराजाच्या अश्रूंनी धरती जळून गेली. सांगड घातल इंद्राला वरुणराजा धावत आला वादळ फोडून पाऊस बरसला. गुरं-ढोरं पुरात गेली वाहून पीक सगलं खलास झालं बळीराजाच नशीब फुटलं. वरुण राजा तू तर देव आकाशाचा का वागतो लहरी सारखा? गत जन्मांच्या कर्मांचा का हिशोब घेतो आता? झाल्या चुका माफ कर कृपा कर पामरांवर सांगड घालतो तुच्या चरणी पुढच्या वर्षी तरी पाऊस पाड नेमान.

आदिकैलास, ओमपर्वतदर्शन,पार्वती सरोवर परिक्रमा भाग-५

लेखक खुशि यांनी सोमवार, 01/09/2014 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
आज सोसा-नारायण आश्रम मार्गे सिर्खा. अंतर १६ किमी. उंची ९००० फूट. पहाटे ५-३० वाजता पराठे, बोर्नव्हिटा असा नाश्ता करुन चालायला सुरूवात केली. पांगूचा अवघड डोंगर उतरून खाली आलो, तर सोसाच्या डोंगराला जोडणारा नदीवरचा पूल पडला आहे असे दिसले. मराठी गाईड सुनील पित्रे आणि पांडेजी यांनी नदीचा उतार शोधला, आणि मग एकमेकांच्या आधाराने सर्वांनी नदी ओलांडली. घोड्यावरुन जाणारे लांबच्या रस्त्याने गेले होते. खरे म्हणजे घोडे गेले तो मोटार रस्ता आहे नारायण आश्रमापर्यंतचा, पण निगम वाहनाची व्यवस्था करत नाही म्हणून डोंगर चढून रस्त्यावर आलो.

भक्तीमार्गातील अडथळे.

लेखक प्रभाकर पेठकर यांनी सोमवार, 01/09/2014 00:33 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी जन्माष्टमी झाली. जन्माष्टमीच्या आधी झी-२४ तास वर अत्यंत उद्बोधक चर्चा (रोखठोक) ऐकायला मिळाली. गेल्या जन्माष्टमीला मानवी मनोरा कोसळून, खालच्याच थरावर असलेला, एकजण जबर जखमी झाला होता. मानेला दुखापत झाल्याने कमरेखाली लुळा पडला होता. ६ महिन्यांच्या उपचारांनंतर कुबड्याघेऊन चालण्याइतपत परिस्थिती सुधारली तरीपण कोणाच्या आधाराविना जगू शकत नाही. २० वर्षाचा मुलगा त्याच्या पुढे डोंगराएव्हढे आयुष्य आहे. चर्चेत तो आणि त्याची आई आले होते. त्याच्या आईला एकंदर प्रकाराबद्दल मत विचारले असता ती म्हणाली, 'ह्याच्या आयुष्याची वाट लागली आहे.

बटाटेवडे आणि चिंच-खजूर आंबटगोड चटणी (फक्त फोटो...)

लेखक एस यांनी रविवार, 31/08/2014 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
थांबा, थांबा, थांबा. ही काही पाककृती नाही. एकच फोटो टाकणार आहे. पाककृतीबिती टाकायला मी काही बल्लवाचार्य नाही. बटाटेवड्यांची पाककृती Mrunalini यांनी आधीच मिपावर देऊन ठेवली आहे. उत्सुकांनी ती आवर्जून वाचा. इथे फक्त एक फोटो पहायला मिळेल. तोही अजिबात धड नाहीये. तेवढा धीर धरवला नाही आणि सर्व वडे + चटणी गट्टम केले गेले. ;-)

Batatewade&Chutney
हो, चिंच-खजुराच्या चटणीबद्दल चार ओळी निश्चितच खरडू शकेन.

मला माहीती असलेली महाराष्ट्रातील गणेश देवस्थाने

लेखक मित्रहो यांनी रविवार, 31/08/2014 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
मयुरेश्वर - मोरगाव महागणपती- रांजणगाव चिंतामणी- थेउर बल्लाळेश्वर- पाली विघ्नहर- ओझर लेण्याद्री सिद्धटेक वरदविनायक - महड सिद्दिविनायक - दादर महागणपती- टिटवाळा सारसबाग पुणे दगडूशेठ हलवाइ - पुणे मोरया - चिंचवड दशभुजा- पौंड फाटा पुणे पर्वती पुणे गणपतीपुळे टेकडी गणपती - नागपूर सिद्धीविनायक - केळझर (वर्धा) चिंतामणी - कळंब(यवतमाळ) माझी यादी फार छोटी आहे. एक दोन सोडले तर बहूतेक ठिकाणी मी स्वतः गेलेलो आहे. आपण भेट दिलेली गणेश देवस्थाने? मित्रहो

स्मार्ट्फोन

लेखक vikramaditya यांनी रविवार, 31/08/2014 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, स्मार्ट्फोन विकत घेण्याचे ठरत आहे. एका बाजुला बजेट (१०,००० च्या आत) आणि दुसरीकडे कार्बन, मायक्रोमेक्स ते samsung असा brand and model selection चा नुसता घोळ झाला आहे. ड्युअल सिम, ५ इन्च किंवा अधिक स्क्रीन, Android OS अश्या माफक (!) अपेक्षा आहेत. फेसबुक थोडेफार वापरले जाइल. आणि हो, नेट वर काहि कंपन्यांच्या आफ्टर सेल्स सर्विस विषयी फार वाईट अनुभव वाचले. काहि मार्गदर्शन करा की राव.

आदिकैलास ओमपर्वतदर्शन, पार्वती सरोवर परिक्रमा भाग-४

लेखक खुशि यांनी रविवार, 31/08/2014 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी गडबड,लगबग सुरु झाली घोडेवाले पोर्टर आले.पुन्हा एकदा बरोबर नेण्याचे प्रत्येकाचे सामान तागडीत टाकुन बरोबर २५ किलो असल्याची खात्री त्यानी केली आपले सामान नेण्यासाठी निगम घोडा-पोर्टर देते,पण स्वतःसाठी घोडा हवा असेल तर त्यासाठी ३५०० रुपये लागत होते.तो घोडा पुर्ण यात्रेत आपल्या बरोबर राहतो दोघाना ७००० रुपये लागले असते आम्ही आपल्या दोन दोन पायांचेच घोडे ठरवले. आज फक्त १९कि.मि. बसचा प्रवास होता.तवाघाट आले. हा डोंगरमाथ्या वरचा सपाटीचा भाग पार्वतीचा तवा.काली आणि गोरी गंगा या नद्यांचा सन्गम आहे.

माझ्या घरचा बाप्पा!

लेखक संपादक मंडळ यांनी रविवार, 31/08/2014 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. काहीजणांकडे बाप्पांना पुढच्या वर्षी यायचे निमंत्रण देऊन निरोपही दिला आहे. सगळी मंडळी मोदकांवर ताव मारून सुस्त झालेली असणार! गेल्या वर्षी आपण घरोघरच्या गणेशासाठीच्या सजावटी, मखरे यांच्या फोटोंची स्पर्धा आयोजित केली होती आणि तिला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. यावर्षी मात्र छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त "महास्पर्धा" चालू असल्याने श्रीगणेश सजावटीची स्पर्धा रद्द करत आहोत. मात्र घरबसल्या सर्वांना इतर मिपाकरांच्या घरच्या गणपतीबाप्पाचे दर्शन व्हावे म्हणून हा धागा काढत आहोत.

परदेशातला संस्कृती संगम

लेखक कल्पक यांनी रविवार, 31/08/2014 01:44 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या अनेक शतकांपासून माणूस हा शिक्षण, नोकरी, व्यवसाय, समृद्धी ह्या कारणांसाठी स्थलांतर करतोय आणि नविन प्रदेशाशी जुळवून घेताना आपले खाद्यपदार्थ, भाषा, संगीत, कला आणि संस्कृती ह्यांचं आवर्जून जतन करतोय. आज तंत्रज्ञानामुळे आणि प्रगतीच्या संधींमुळे देशादेशातील अंतर कमी होऊन अनेक संस्कृती एकमेकांमध्ये मिसळत आहेत. आणि जागतिक खेड्यातील ह्या संस्कृतीसंगमामध्ये प्रगतीसाठी धडपड हा एक समान धागा आहे. अशा संस्कृतीसंगमामध्ये खाद्य पदार्थ, भाषा, संगीत, कला, ज्ञान यांची देवाणघेवाण होते आहे.