आदि कैलास, ॐ पर्वत दर्शन, पार्वती सरोवर परिक्रमा. भाग - १३
सोळावा दिवस. आज २० किमीवरील बुधीला मुक्काम होणार होता.
सकाळी पावणेसहाला चालायला सुरूवात केली. बॉडी चार वाजताच पुढे गेली होती. आठ लोकांनी एवढी जड खाट खांद्यावरून वाहून नेली होती. किती त्रास होत असेल त्यांना? नुसत्या विचारानेही कसेतरी होत होते. अनिता आणि मेहुणे घोड्यावरून आमच्याच बरोबर निघाले. मौसम खराबच होता, पावसाची रिपरिप सुरू होती. रेनकोट घालून हा कठीण चढ-उताराचा रस्ता, तुटक्या फुटक्या खडांज्या. त्यातच रस्ता निसरडा झालेला, रेनकोटमुळे भयंकर गरम होत होते. डाव्या हाताला कालीमैय्याने आज आणखीच रुद्रावतार धारण केलेला होता. नुसत्या आवाजाने धडकी भरत होती.
मिसळपाव
१.